हर घर तिरंगा निबंध तसेच भाषण – Har Ghar Tiranga Essay And Speech In Marathi
मित्रांनो आज प्रत्येक देशासाठी त्याचा राष्टध्वज हा एक अत्यंत सन्मानाची अणि अभिमानाची गोष्ट आहे.
आपला भारत देश हा 15 आँगस्ट रोजी स्वातंत्रय झाला होता.तेव्हापासुन स्वातंत्रय दिनी देशाचा तिरंगा फडकवून हा दिवस साजरा केला जाऊ लागला.
15 आँगस्ट हा दिवस देशाला स्वातंत्रय मिळवुन देण्यासाठी शहीद झालेल्या शुरवीरांच्या शौर्यगाथेचा बलिदानाचे प्रतिक असलेला दिवस आहे.
कारण भारताच्या स्वातंत्रय सैनिकांनी स्वताच्या जिवाची कुठलीही पर्वा न करता आपल्या देशाला स्वातंत्रय मिळवून देण्यासाठी कडेकोट संघर्ष केला.अणि ज्यात ते देशासाठी हसत हसत फासावर चढले,शहीद देखील झाले.
ह्या वर्षी भारताला स्वातंत्रय प्राप्त होऊन 75 वर्षे पुर्ण होत आहेत.म्हणुन ह्या स्वातंत्रय दिनाच्या 75 व्या वर्धापणदिनानिमित्त संपुर्ण भारतात अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे.
ज्यात 13 आँगस्ट ते 15 आँगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान,मोहीम राबविण्यात येणार आहे.ज्यात वीस कोटीपेक्षा जास्त भारतीय लोकांचा सहभाग आपणास पाहायला मिळणार आहे.
घरोघरी ह्या मोहिमेअंतर्गत देशाच्या नागरीकांकडुन तिरंगा फडकविला जाणार आहे.
ही मोहीम राबविण्याचा भारत सरकारचा मुख्य हेतु म्हणजे देशातील जनतेच्या मनात असलेली देशप्रेमाची,देशभक्तीची भावना अधिक प्रखर करणे.
लोकांच्या मनात आपल्या देशाच्या राष्टध्वजाविषयी असलेला अभिमान अणि आदर अधिक जागृत करणे.लोकांमध्ये राष्टध्वजाविषयी जनजागृती घडवून आणने देशातील लोकांमध्ये ऐक्य निर्माण करणे हा आहे.
ह्या मोहीमेत कोणाकडुन चुकुनही राष्टध्वजाचा अपमान होऊ नये याकरीता आपण सर्वानी राष्टध्वज फडकविण्याचे नियम नीट समजुन घ्यावे अणि त्या प्रमाणे दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करत ह्या मोहीमेत सहभागी झाले पाहिजे.याने आपल्याकडुन आपल्या देशाच्या तिरंग्याचा अपमान होणार नही.
भारत देशाचे नागरीक असल्याने देशाच्या ह्या अभिमानात वाढ करणारया मोहीमेत सहभागी होणे आपल्या सर्वाचे प्राथमिक कर्तव्य आहे.
म्हणुन आपण सर्व देशवासियांनी करोडोंच्या संख्येत ह्या मोहिमेत सामील व्हायला हवे.
हर घर तिरंगा मराठी घोषवाक्ये -Har Ghar Tiranga Marathi Slogans
हरघर तिरंगा योजना तसेच अभियानाविषयी माहीती – Har Ghar Tiranga Abhiyan
Comments are closed.