2022 रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधतांना भावाबहिणीचे मुख कोणत्या दिशेने असायला हवे?
रक्षाबंधनच्या दिवशी जसे बहिणीने भावाला शुभ मुहूर्तामध्येच राखी बांधने ओवाळणे महत्वपूर्ण मानले जाते.तसेच यात ज्योतिषशास्त्रात दिशेला देखील फार महत्व दिले जाते.
म्हणुन प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधतांना कोणत्या दिशेने मुख ठेवायचे हे देखील जाणुन घ्यायला हवे.
जेव्हा बहिण भावाला राखी बांधत असेल तेव्हा भावाचे मुख पश्चिम दिशेला असायला हवे.अणि बहिणीचे मुख पुर्व किंवा पश्चिम या दोघांपैकी कुठल्याही एक दिशेला असायला हवे.
रक्षाबंधन कोटस,शायरी,शुभेच्छा – Raksha Bandhan Quotes,Shayari,Wishes In Marathi And Hindi
बहिण भावाला राखी बांधत असताना कोणत्या दिशेने भावाचे अणि बहिणीचे मुख नसावे?
जेव्हा बहिण भावाला राखी बांधत असेल तेव्हा बहिणीचे अणि भावाचे मुख हे दक्षिण दिशेला असता कामा नये.
भावाला राखी बांधत असताना बहिणीने कोणता मंत्र जपायला हवा?
हिंदु धर्मामध्ये अशी मान्यता आहे की कुठलेही यज्ञ, हवन,विवाह तसेच शुभ कार्य पार पडत असताना मंत्रांचा जप करण्यात येतो.
रक्षाबंधन हा देखील हिंदु धर्मातील एक अत्यंत महत्वाचा सण असल्याने ह्या सणाच्या दिवशी देखील मंत्र उच्चारणास विशेष महत्व दिले जाते.
म्हणुन प्रत्येक बहिणीने आपल्या भावास राखी बांधतांना खालील मंत्राचा जप आवर्जुन करायला हवा.
येन बदधो बली राजा दानवेंद्रो महाबल
तेन त्वाम प्रतिबदधनामी रक्षे मांँ चल माँ चल
राशीनुसार बहिणीने भावास कोणत्या रंगाची राखी बांधायला हवी?बहिणीने भावास कोणत्या रंगाची राखी बांधने शुभ ठरेल?
ज्योतिष शास्त्रात असे म्हटले आहे की बहिणीने भावास राखी बांधताना त्याची रास जी आहे त्यानुसारच राखी बांधायला हवी.याने आपल्या भावास त्याच्या कामात नोकरी व्यवसायात यश समृदधी अणि चांगले आरोग्य लाभते.
जर आपल्या भावाची रास मेष आहे तर आपण आपल्या भावास लाल रंगाची राखी बांधायला हवी.
आपल्या भावाची रास वृषभ असेल तर आपण सफेद,क्रीम कलरची राखी त्यास बांधायला हवी.
भावाची रास जर मिथून असेल तर बहिणीने हिरव्या रंगाची राखी त्यास बांधायला हवी.
आपल्या भावाची रास जर कर्क असेल तर आपण सफेट तसेच दुधाळ रंगाची राखी त्यास बांधायला हवी.
ज्या बहिणींच्या भावाची रास सिंह असेल त्यांनी त्यास सोनेरी रंगाची राखी बांधने अधिक शुभ ठरेल.
जर आपल्या भावाची रास कन्या असेल तर आपण आपल्या भावास हिरव्या रंगाची राखी आपल्या भावास बांधायला हवी.
ज्या बहिणींच्या भावाची रास तुला आहे.तर आपण त्यास सफेद धवल रंगाची राखी बांधणे अधिक शुभ ठरेल.
भावाची रास वृश्चिक असेल तर लाल रंगाची राखी भावाला बांधावी.
भावाची रास धनु असेल तर बहिणीने त्यास पिवळया रंगाची राखी बांधने अधिक उत्तम आणि शुभ ठरेल.
जर आपल्या भावाची रास मकर असेल तर बहिणीने त्याला निळया रंगाची राखी बांधायला हवी.
भावाची रास जर कुंभ असेल बहिणीने त्याला लाईट आभाळी रंगाची राखी त्यास बांधायला हवी.
अणि समजा आपल्या भावाची रास मीन आहे तर बहिणीने आपल्या भावास पिवळया रंगाची तसेच हळदीच्या रंगाची राखी बांधायला हवी.
भावाला राखी बांधण्याअगोदर बहिणीने सर्वप्रथम कोणाला राखी बांधावी?
बहिणीने आपल्या भावास राखी बांधण्याआधी गणपतीला राखी बांधायला हवी.
बहिणीने भावाला राखी बांधताना कोणत्या देवाचे विशेष स्मरण करावे?
बहिण जेव्हा आपल्या भावास राखी बांधत असेल तेव्हा तिने सृष्टीचे निर्माता ब्रम्हा विष्णु अणि महेश यांचे स्मरण करायला हवे.
अणि देवाला सांगायला हवे की जसे तुम्ही ह्या संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करता तसाच माझ्या भावाचा देखील सांभाळ करा.त्याच्या नोकरी व्यवसायात यश लाभु द्या सुख समृदधी धन ऐश्वर्य लाभु द्या.
बहिणीने भावाला राखी बांधत असताला राखीस किती गाठ मारायला हव्यात?
राखी बांधताना प्रत्येक बहिणीने तीन गाठ बांधायला हव्यात.
पहिली गाठ बांधली जाते भावाला दीर्घायुष्य लाभावे यासाठी त्याला सुख लाभावे प्रत्येक कार्यात यश लाभावे यासाठी.
दुसरी गाठ बहिणीने बांधावी आपल्या स्वतासाठी बांधावी तिला दीर्घायुष्य लाभावे,सुख मिळावे,प्रत्येक कार्यात तिला देखील यश प्राप्त व्हावे यासाठी.
तिचे अणि तिच्या भावाच्या नात्यात सदैव प्रेम राहावे.त्यांचे भावा बहिणीचे नाते जन्मोजन्मीचे अणि अतुट राहावे.
जेव्हा बहिणीस भावाची आवश्यकता असेल तेव्हा भावाने तिच्यासाठी धावून यावे यासाठी तिसरी गाँठ बांधली जाते.
रक्षाबंधन राखी बांधण्याचा विधी,- Raksha Bandhan Shubh Muhurat 2022 In Marathi