इस्रो चांद्रयान 3 ची खिल्ली उडवल्याबद्दल अभिनेते प्रकाश राज यांची निंदा actor prakash raj slammed for mocking isro chandrayaan 3 in marathi
दाक्षिणात्य तसेच बाॅलिवुड चित्रपट अभिनेते प्रकाश राज यांनी भारताच्या सर्वात मोठी अंतराळ मोहीम चंद्रयान ३ मोहीमेची खिल्ली उडवल्याने त्यांना नेटकरयांनी चांगलेच झापले आहे.
प्रकाश राज हे त्यांच्या परखड वक्तव्यामुळे आपणा सर्वांना परिचित आहेत.अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांना अडचणींचा देखील सामना करावा लागला आहे.
देशातील कुठल्याही परिस्थितीवर सडेतोड भाष्य करण्यासाठी प्रकाश राज ओळखले जातात.
पण नुकतेच प्रकाश राज यांनी भारतासाठी अत्यंत अभिमानाची गौरवाची बाब असलेल्या चंद्रयान ३ मोहीमेची खिल्ली उडविली आहे.ज्यामुळे सर्व नेटकरयांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.
एकीकडे इस्रोने हे सांगताच की २३ आॅगस्ट रोजी भारताचे चंद्रयान ३ चंद्रावर उतरणार आहे सर्व देशांकडुन भारताच्या ह्या अंतराळ मोहीमेचे कौतुक केले जात आहे भारताला शुभेच्छांवर शुभेच्छा प्राप्त होत आहे.
भारतीय नागरिक ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून पुजा हवन करीत आहे अक्षरश देवाकडे प्रार्थना करीत आहे.
अशातच प्रकाश राज यांनी ह्या मोहीमेची खिल्ली उडवल्याने सर्व नागरिकांनी सोशल मिडिया वर संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे.
प्रकाश राज यांनी केलेल्या टविट नंतर देशातील सर्व नागरिकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.
अत्यंत कमी संसाधने अणि कमी बजेट उपलब्ध असताना देखील भारतातील अंतराळ संशोधन संस्था इस्रोने एवढी मोठी मोहीम हाती घेतली आहे.ह्या सर्व गोष्टींचा आपण अभिमान ठेवायला हवा.
कुठल्याही एका पक्षाचा किंवा सरकारचा द्वेष करणे ही वेगळी बाब आहे.
पण प्रकाश राज यांनी आपल्या देशाच्या एवढ्या मोठ्या अभिमानास्पद मोहीमेची खिल्ली उडवून चक्क आपल्या देशाच्या विकासाचाच अपमान केला आहे.
ही अत्यंत खालच्या पातळीची कृती आहे.अशा विविध प्रतिक्रिया सोशल मिडिया वर व्यक्त केल्या जात आहेत.
प्रकाश राज यांनी आपल्या टविट मध्ये इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांची खिल्ली उडविली आहे.ज्यात एक व्यंगचित्र दाखवले आहे त्यात के सिवन हे चहा ओतताना दिसुन येत आहे.
ह्या व्यंगचित्रास प्रकाश राज यांनी एक कॅपशन देखील दिले आहे ज्यात लिहिले आहे ज्यात ब्रेकिंग न्यूज वाव विक्रम लॅडर कडुन चंद्रावरील पहिला फोटो आला आहे असे लिहिले आहे.
प्रकाश राज यांनी कोणकोणत्या चित्रपटात काम केले आहे?
प्रकाश राज यांनी आतापर्यंत वाॅनटेड,सिंघम दबंग टु पोलिसगिरी इत्यादी प्रसिद्ध बाॅलिवुड चित्रपटात व्हिलनची तसेच इतरही प्रकारच्या भुमिका पार पाडल्या आहेत.