सायक्लाॅन मोका विषयी जाणुन घ्यायची ७ रोचक तथ्ये 7 amazing facts about cyclone mocha in Marathi
सायक्लाॅन मोका हे बंगालच्या उपसागरातुन येत्या चार पाच दिवसात येणारे भयानक चक्रीवादळ आहे.
सायक्लाॅन मोका हे २०२३ मधील पहिले चक्रीवादळ असणार आहे.
हवामान खात्याने सायक्लाॅन मोका चक्रीवादळ येण्याची याच्या प्रभावाची शक्यता बघता ६ मे २०२३ ते ११ मे पर्यंत पश्चिम बंगाल अणि ओडिसा ह्या राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मोका चक्रीवादळ हे वादळात परिवर्तित होण्याची दाट शक्यता आहे.त्यामुळे ह्या चक्रीवादळाच्या कालावधीत बंगालच्या खाडीच्या आजुबाजुला वास्तव्यास असलेल्या नाविक अणि कोळी बांधवांंना ह्या कालावधीत समुद्र किनार पट्टीपासुन दुर राहण्याचा सल्ला देखील हवामान खात्याने दिला आहे.
मोका हे चक्रीवादळ बंगालच्या दक्षिण पूर्व खाडीमध्ये तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण ह्या क्षेत्रात कमी दबावाचे क्षेत्र निर्माण होत आहे.
बंगालच्या उपसागरामधील चक्रीवादळाच्या वाढत्या प्रभावामुळे वाऱ्याचा वेग देखील वाढण्याची शक्यता आहे.
ह्या चक्रीवादळाचा वेग किती असेल याबाबत कुठलेही स्पष्टीकरण अद्याप हवामान खात्याने दिले नाहीये.