भारतातील बॅका देखील अमेरिकन बॅका प्रमाणे आर्थिक संकटात आल्या तर भारतातील बॅक ठेवीदारांच्या पैशाचे काय होईल?
नुकतीच काही दिवसांपूर्वी आपल्याला एक बातमी ऐकु आली होती की अमेरिकेतील सर्वात मोठया अणि प्रसिद्ध बॅक सिलिकाॅन व्हॅली अणि सिगनेचर बॅक ह्या बुडाल्या आहेत.
एवढेच नव्हे तर अमेरिकेतील बॅक समवेत परदेशातील अनेक मोठमोठ्या प्रतिष्ठीत बॅकावर आर्थिक संकट ओढावले आहे.
उदा, युरोपातील सर्वात मोठी बॅक क्रेडिट सुईस ही देखील आर्थिक संकटात आल्याचे सांगितले जाते आहे.
म्हणजेच परदेशातील मोठमोठ्या प्रतिष्ठीत बॅका आज आर्थिक संकटात सापडुन बंद पडण्याच्या स्थितीत आल्या आहेत.
अशा वेळी आपल्या भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात ही शंका निर्माण होणे साहजिकच आहे की जर परदेशातील एवढ्या मोठ्मोठया बॅकावर आर्थिक संकट ओढावले आहे तर आपल्या भारत देशातील बॅकावर हेच आर्थिक संकट ओढावणार नाही याची काय गॅरंटी?
तसेच आपल्यातील खुप जणांना हा प्रश्न पडला आहे की समजा आपल्या भारत देशात अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या बॅकेत गुंतवलेल्या पैशाचे काय होणार?आपले पैसे आपल्याला परत मिळतील का बुडीत जातील?
पुर्ण पैसे मिळतील का गुंतवलेल्या रक्कमेतून अर्धी रक्कमच मिळेल अणि जर पैसे परत मिळतील तर कधीपर्यंत मिळतील असे अनेक प्रश्न बॅकेत पैसे असलेल्या सर्वसामान्य नागरीकांच्या मनामध्ये निर्माण होताना दिसुन येत आहे.
कारण अमेरिकेत ज्या बॅका आर्थिक संकटात सापडलेल्या आहेत त्यात ज्या लोकांचे पैसे अडकलेले आहेत.ते पैसे त्यांना कधीपर्यंत दिले जाणार याबाबद अमेरिकन नियामक अणि शासनाने कुठलाही स्पष्टपणे खुलासा अद्याप केलेला नाहीये.म्हणुन भारतातील नागरीकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे जाणुन घेणार आहोत.
मित्रांनो भारतातील अणि अमेरिका ह्या देशातील बॅकिंग व्यवस्था अणि कायदा यामध्ये बराच फरक आहे.यामुळे भारतात अमेरिकेत घडला तसा प्रकार घडणार नाही असे तज्ञ देखील सांगत आहेत.
भारतातील बॅक ठेवीदारांच्या पैशांना सुरक्षितता प्राप्त व्हावी त्यांचे पैसे बुडु नये बँक बुडाल्या वर ठेवीदारांना आपल्या गुंतवणूक केलेल्या पैशांसाठी क्लेम करता यावा
यासाठी शासनाने काही महत्त्वाचे नियम देखील तयार करण्यात आलेले आहेत.
हे नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊया.
काही वर्ष अगोदर भारत सरकारने जे बॅकेत आपले पैसे गुंतवणारे जमा करणारे ठेवीदार म्हणजेच जे डिपाॅझर आहे त्यांच्या हितासाठी एक खास नियमावली आखली तसेच तयार केली होती.
त्यानूसार असे ठरविण्यात आले की बॅकेमध्ये जे लोकांचे पैसे जमा आहे त्यावर पाच लाखांपर्यंतचे विमा संरक्षण त्यांना प्रदान करण्यात येणार.
याआधी बॅकेत जे लोकांचे पैसे जमा होते त्यावर फक्त एक लाख रुपये इतके विमा संरक्षण दिले जात होते.म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचे बॅकेत दहा लाख जमा आहे अणि ती बॅक बुडाली तर त्याला नुकसान भरपाई म्हणून फक्त एक लाख इतकी रक्कम आधी दिली जात होती.
पण या नियमामध्ये मोदी सरकारच्या घेतलेल्या ह्या नवीन निर्णयामुळे बदल करण्यात आला अणि ही मर्यादा वाढविण्यात आली होती.एक लाखा वरून पाच लाखांपर्यंत ठेवण्यात आली होती.
आपल्या भारत देशातील क्रेडिट गॅरंटी काॅर्पोरेशन अणि ठेव विमा काॅर्पोरेशन कडुन बॅकेत जमा असलेल्या पैशांवर विमा संरक्षण प्रदान केले जाते.
म्हणजे समजा भारतातील एखादी बॅक बुडली किंवा आर्थिक संकटात सापडली तरी देखील पाच लाख इतकी रक्कम ह्या कंपनीकडुन दिली जात असते.
यात सेविंग अकाऊंट,करंट अकाऊंट,रिकरिंग अकाऊंट इत्यादी सर्व खात्यांचा समावेश असतो.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचे बँकेत एकापेक्षा जास्त अकाऊंट असतील किंवा विविध प्रकारची खाती असतील तरी सुदधा डिआयजीसीकडुन बॅक बंद झाल्यावर त्या व्यक्तीला पाच लाखांपर्यंतचीच रक्कम ही भरपाई म्हणून दिली जात असते.
उदा,राहुल नावाच्या व्यक्तीच्या एका बॅकेतील सेविंग अकाऊंट मध्ये तीन लाख इतकी रक्कम आहे.व त्याने बॅकेत तीन लाख इतकी रक्कम फिक्स डिपाॅझिट देखील केली आहे
अणि समजा अशा परिस्थितीत भविष्यात ती बॅक बुडाली किंवा दिवाळखोरीला निघाली तरी सुदधा राहुल याला बॅकेकडुन फक्त पाच लाखांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाईल.
याचसोबत बॅकेच्या नवीन नियमानुसार समजा राहुलच्या खात्यामध्ये एक लाख रूपये आहे अणि बॅक अचानक दिवाळखोरीस निघाली किंवा बंद पडली तेव्हा त्याला पाच लाख नुकसानभरपाई न देता फक्त एक लाखच नुकसानभरपाई म्हणून दिले जातील.
या नवीन नियमानुसार जर आरबीआय कडून एखाद्या बॅकेवर स्थगिती लादण्यात आली तर बॅकेत ज्या ठेवीदारांनी पैसे जमा केले आहे त्यांना त्यांचे पैसे ९० दिवसांच्या आत बॅकेकडुन परत केले जातील.
मागील वर्षी घेण्यात आलेल्या सरकारच्या ह्या नवीन निर्णयामुळे भारत देशातील ९८ टक्के ठेवीदारांच्या पैशांना विमा संरक्षण प्राप्त झाले आहे म्हणजेच ९८ टक्के ठेवीदारांना आपल्या पैशांच्या सुरक्षेची हमी मिळाली आहे.
भारतातील सर्वात सुरक्षित बॅक कोणत्या आहेत?
एसबीआय,आय आयसी आय अणि एचडी एफसी ह्या भारतातील सर्वात सुरक्षित बॅक आहेत.हया बॅका भारतात सर्वात सुरक्षित आहे असे आरबीआयने सांगितले आहे.
दरवर्षी केंद्रीय रिझर्व बँकेकडुन भारत देशातील सर्वात सुरक्षित बॅकाची यादी जाहीर केली जात असते.