ब्रोकोली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता उत्कर्षभारती फार्मर्स ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड , दोडी बुद्रुक,तालुका सिन्नर , जिल्हा -नाशिक ह्यांनी पुढाकार घेतला असून , खालील लेखात ह्याची थोडक्यात रूपरेषा देत आहोत.
कोणतेही पीक उभे करताना लागणारे भांडवल,श्रम,माल चांगला यावा यासाठी आवश्यक चांगली खते, औषधे , बियाणे आणि ते वेळेवर देण्यासाठी आवश्यक माहिती व सल्ला,आणि पिक आल्यानंतर त्याला मिळणाऱ्या बाजारभावाची अनिश्चितता यामध्ये शेतकरी अडकून बेजार झालेला आहे. हे घटक निश्चित असले आणि योग्य खर्च होऊन आलेल्या पिकाला निश्चित भाव मिळाला तर शेतकरी या चक्रातून सुटू शकेल. यासाठी एखाद्या नगदी पिकाची आवश्यकता आहे. हे जेथे पिकाचा भाव लागवड करण्याआधी ठरविला जाईल अशा करार शेतीतून शक्य होऊ शकेल.
योजना – ब्रोकोली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग-
उत्कर्षभारती फार्मर्स ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड , दोडी बुद्रुक , आपल्या शेतकर्यांसाठी ब्रोकोलीकॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा पर्याय उपलब्ध करीत आहे.
ब्रोकोली म्हणजे हिरवी फ्लावर, ही कोबी ची एक जात आहे. या भाजीपाला पिकाला हॉटेल व्यवसायात तसेच परदेशात भरपूर मागणी आहे.एकरी तीस ते पस्तीस हजार उत्पादन खर्च असलेल्या या पिकाचे एकरी उत्पादन कमीतकमी चार टन व जास्तीत जास्त सहा ते सात टन येते.
शेतमाल निर्यात क्षेत्रात मोठं नाव असलेली कंपनी आपल्या कंपनी सोबत १०० एकर पेक्षा अधिक क्षेत्रासाठी ब्रोकोली उत्पादन पूर्णपणे वर्षभर टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यासाठी करार करण्यास तयार आहे.
करार – ब्रोकोली कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग