20 मे चालू घडामोडी -Current affairs in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

20 मे रोजीच्या महत्वाच्या चालू घडामोडी current affairs in Marathi

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील व्याजावर शुन्य टक्के टीडीएस कट असणार आहे.

केरळ सरकारने कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळ स्थापित केले आहे.महात्मा गांधी ग्रामीण रोजगार अधिनियम अंतर्गत कामगार कल्याण मंडळ स्थापित करण्यात आले आहे.

दरवर्षी सशस्त्र सेना दिवस मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जात असतो.हया वर्षी २०२३ मध्ये २० मे रोजी हा दिवस साजरा केला जाणार आहे.

सी २९५ बनवण्याची जबाबदारी टाटा ग्रुप ह्या कंपनीला मिळाली आहे.

पेट्रोलियम अणि नैसर्गिक वायु नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी पंकज कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सिद्धरामय्या यांची कर्नाटक राज्यातील नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.अणि उपमुख्य मंत्री पदी डी के शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अर्जुन राम मेघवाल यांची नवीन कायदा मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.जुने कायदामंत्री किरेन रिजूजू हे होते.

सागर परिक्रमा हा कार्यक्रम केंद्रीय मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन मंत्रालय अणि दुग्धव्यवसाय ह्या मंत्रालयाशी संबंधित आहे.केंद्रीय मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन मंत्रालय अणि दुग्धव्यवसाय ह्या मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला असे आहे.मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध योजना अणि कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.महाराष्ट्र राज्यातील रायगड येथुन सागर परिक्रमेचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे.

दक्षिण आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताने १६ सुवर्णपदके जिंकली आहेत.ही चॅम्पियनशिप इटानगर येथे झाली होती.हया स्पर्धेमध्ये शंभर हुन अधिक खेळाडू सहा देशांतून भुतान,बांगलादेश,भारत, मालदीव,श्रीलंका,नेपाळ मधून सहभागी झाले होते.

आसाम राज्यात भारतीय सैन्याने जल राहत हा एक संयुक्त पुर मदत सराव केला आहे.आसाम राज्यातील मानस नदीवर हा सराव करण्यात आला आहे.

नुकतेच निधन झालेले श्रीचंद परमानंद हिंदुजा हे हिंदुजा गृपचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.श्रीचंद परमानंद हिंदुजा यांना एसपी हिंदुजा म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.

See also  फेमिना मिस इंडिया २०२३ विषयी माहिती - Femina Miss India 2023 information in Marathi

ट्रॅक तयार करणे,बॅकिंग,रसायन,उर्जा,प्रसारमाध्यमे,आणि आरोग्यसेवा इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे.

एचपीसीएल नावाची कंपनी उना येथे पाचशे कोटी रुपयांचा इथेनॉल प्लांट उभारणार आहे.यात शासनाकडुन ५० टक्के इतकी इक्विटी गुंतवणूक देखील केली जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय एक्स्पो २०२३ चे आयोजन भारतात नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे.१८ मे रोजी ४७ वा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा करण्यात आला होता.

२०२३ मधील आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवसाची थीम museum sustainability and well being अशी ठेवण्यात आली होती.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा