आयफोन 13 अणि आयफोन 14 मधील फरक difference between iphone 13 and 14 in Marathi
मित्रांनो अँपल कंपनीकडुन नुकतेच आयफोन 14 चे चार नवीन माँडेल लाँच करण्यात आले आहे.ज्यांचे नाव आयफोन 14,आयफोन 14 प्लस,आयफोन 14 प्रो,आयफोन 14 प्रो मँक्स असे आहे.
हे चारही माँडेल अँपलने भारत तसेच इतर अनेक देशांमध्ये सादर केले आहेत.पण अँपलने आयफोन 14 ला लाँच करण्यासोबत आयफोन 13 ची किंमत कमी करून टाकली आहे.
अशा परिस्थितीमध्ये खुप मोबाईल युझर्सच्या मनात एकच संभ्रम आहे की अँपलने आयफोन 13 ची किंमत कमी केली आहे याचा लाभ उठवत आयफोन 13 खरेदी करावा का आयफोन 14 ह्या नवीन फिचर अँड करून लाँच केलेल्या नव्या माँडेलची खरेदी करावी.
अणि त्यातच असे म्हटले जात आहे की आयफोन 13 अणि आयफोन 14 या दोघांमध्ये कुठलाही खास फरक नाहीये.दोघांचे फंक्शन फिचर्स सारखेच आहेत.
म्हणुन आज आपण ह्या अँपलच्या जुन्या अणि नवीन आवृत्तीचे तुलनात्मक पदधतीने वर्णन करून दोघांमधील साम्य आणि फरक जाणुन घेणार आहोत.
जेणेकरून आपल्याला हे स्पष्ट होण्यास मदत होईल की आयफोन 14 आपण का खरेदी करायला हवा असे कुठले नवीन उत्तम फिचर आपणास यातुन मिळते आहे जे आजपर्यत आयफोन 13 मध्ये आपणास मिळाले नव्हते.ज्यामुळे आपण आयफोन 14 ह्या नवीन माँडेलची खरेदी करावी.
आयफोन 13 अणि आयफोन 14 मधील साम्य –
आयफोन 13 अणि आयफोन 14 या दोघा मोबाइलचे बरेच फिचर एकदम सारखेच आहेत.त्यात कुठलाही चेंज आपणास पाहायला मिळणार नाही.
● आयफोन 13 अणि आयफोन 14 या दोघांचा डिसप्ले हा एकदम सारखाच आहे डिस्प्लेवरील ब्राईटनेस देखील दोघांचा समानच आहे.यात कुठलाही बदल आपणास दिसुन येत नाही.
● आयफोन 13 अणि आयफोन 14 दोघांचे डिझाईन,लुक,बिल्ड काँलिटी कँमेरा प्लेसमेंट कँमेरयाचा फ्लँश मागच्या साईडचे लुक पोर्ट प्लेसमेंट देखील एकदम सारखेच आहे.
● आयफोन 13 मध्ये आपणास जेवढे स्पीकर अणि माईक मिळत होते तेवढेच आपणास आयफोन 14 मध्ये मिळता आहे.
● दोघांचे आयपी रेटिंग देखील सारखेच आहे. चार्जिगचा स्पीड दोघांचा सारखाच आहे.स्टोरेज कँपेसिटी देखील सारखीच असलेली आपणास दिसुन येते.
● आयफोन 13 अणि आयफोन 14 या दोघांची हाईट विडथ सुदधा सेमच आहे.
वरील सर्व फिचर जे आपणास आयफोन 13 मध्ये उपलब्ध होत होते तेच आपणास आयफोन 14 मध्ये उपलब्ध होत आहे यात कुठलाही बदल केला गेलेला नाहीये.
फक्त दोघांच्या किंमतीमध्ये 10 हजाराचा फरक आपणास पाहायला मिळतो.म्हणजेच आयफोन 13 ची किंमत आयफोन 14 पेक्षा कमी आहे.
आयफोन 13 अणि आयफोन 14 मधील फरक :
चला तर मग मित्रांनो आता या दोघांमधील फरक जाणुन घेऊ.
● आयफोन 13 अणि आयफोन 14 या दोघांच्या वजनात फक्त दोन ते तीन ग्रँम इतका फरक आपणास दिसुन येतो.आयफोन 13 चे वजन आयफोन 14 पेक्षा दोन ग्रँम जास्त असल्याचे आपणास पाहायला मिळते.
● आयफोन 14 ची जाडी म्हणजेच थीकनेस हा आयफोन 13 पेक्षा जास्त असलेला आपणास दिसुन येतो.आयफोन 14 मधील कँमेरा बंप हा आयफोन 13 पेक्षा अधिक स्थुल अणि जाडी असलेला आहे.
● आयफोन 13 मध्ये आपणास फक्त 4 जीबी रँम मिळते.पण आयफोन 14 मध्ये आपणास 6 जीबीपर्यत रँम मिळत आहे.
● दोघांमध्ये बरेच साम्य असुन सुदधा आयफोन 14 मध्ये आपणास आयफोन 13 पेक्षा अधिक चांगली कनेक्टिविटी मिळणार आहे.आयफोन 14 मध्ये युझरला सँटलाईट कनेक्टिविटी युझ करता येणार आहे.म्हणजे आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपरयात गेलो तरी आपण आपल्या फँमिली फ्रेंड रिलेटिव्हज सोबत कनेक्टेड राहु.तसेच ह्या सँटलाईट कनेक्शनचा युझ करून आपण कोणालाही मँसेज सेंड करू शकतो.
● आयफोन 14 विकत घेतल्यावर अजुन एक नवीन फिचरचा फायदा युझरला मिळणार आहे तो म्हणजे यात क्रँश डिटेक्शन फिचर अँड करण्यात आले आहे.म्हणजे समजा आपला अचानक अँक्सीडेंट झाला तर एमरजन्सी सेवा देणारयांपर्यत तसेच आपल्या रिलेटिव्हज फँमिलीला अँटोमँटीकली एस ओ एस सिस्टमदवारे अलर्ट पोहोचणार आहे.म्हणजे आपण एमरजन्सीला मदत प्राप्त करू शकणार आहे.
● याचसोबत आयफोन 14 मध्ये दोन नवीन कँमेरा सेंसर अँड करण्यात आले आहे.जे कमी प्रकाशामध्ये देखील अधिक लाईट कँप्चुअर करतील.आयफोन 14 मध्ये फ्रंट कँमेरा हा किमान बारा मेगापिक्झेल इतका देण्यात आला आहे.अणि हा कँमेरा आँटोफोकस टेक्नाँलाँजीला खुप सपोर्टिव्ह आहे.हे फिचर पहिल्यांदा अँपलने आपल्या मोबाइल मध्ये अँड केले आहे.
● तसेच आयफोन 14 मधील नवीन सेल्फी कँमेरा सेन्सर दवारे आपण कमी प्रकाशात सुदधा चांगले पिक्चर फोटो काढु शकतो.
● अणि आयफोन 14 मध्ये सुदधा आयफोन 13 मधील A 15 बायोनिक चीपसेटच वापरण्यात आली आहे.पण आयफोन 13 मध्ये युझरला आधी 4 कोर जीपीयु प्राप्त होत होता.आयफोन 14 मध्ये युझरला 5 कोर जीपीयु प्राप्त होणार आहे.
● आयफोन 13 मध्ये कँमेरयात एफ 1.6 इतके अँपरचर होते पण आयफोन 14 मध्ये एफ 1.5 इतके अँपरचर मिळणार आहे.
● आयफोन 14 मध्ये आपणास फोटोनिक इंजिन मिळणार आहे.याने आपणास चांगला अणि लो लाईट परफाँरमन्स मिळणार आहे.अणि हा परफाँरमन्स आपणास फ्रँट अणि रिअर दोघे कँमेरयात प्राप्त होत आहे.
● आयफोन 14 मध्ये आपणास अँक्शन मोड पाहायला मिळते.हे अँक्शन मोडदवारे आपला काढलेला फोटोमध्ये आपला व्हिडिओ स्टेबल येणार आहे.जरी आपण हात खाली वर केला तरी देखील.म्हणजे जे युझर अँक्शन व्हिडिओ काढतात त्यांना चांगले स्टीमुलायझेशन याने प्राप्त होईल.
● फ्रंट कँमेरा कँमेरा फंक्शन च्या बाबतीतही आयफोन 14 मध्ये आयफोन 13 च्या तुलनेत चांगली सुधारणा पाहायला मिळते.आयफोन 14 मध्ये एफ 1.9 अँपरचर आहे.
● आयफोन 13 मध्ये आपणास ब्लुटुथ 5.0 दिले जात आहे अणि आयफोन 14 मध्ये 5.3 इतके प्राप्त होत आहे.
● आयफोन 14 मध्ये आपणास आयफोन 13 च्या तुलनेत बँटरी लाईफ अधिक प्राप्त होणार आहे.