डिजीटल फास्टिंग -? Digital fasting meaning and its benefits in Marathi
डिजीटल फास्टिंग ही एक नवीन संकल्पना तसेच पद्धत आहे ज्या विषयी आपणास सध्या सोशल मिडिया वर फार विपुल प्रमाणात ऐकायला मिळते आहे.
सध्या डिजीटल फास्टिंगचा एक नवीन ट्रेंड सोशल मिडिया वर खुप जोरात सुरू आहे.
आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत की हे डिजीटल फास्टिंग म्हणजे काय असते?याचे फायदे कोणकोणते आहेत?
डिजीटल फास्टिंग म्हणजे काय?digital fasting meaning in Marathi
डिजीटल फास्टिंग हा सोशल मिडिया इंटरनेट मोबाईल यांच्यापासून दूर राहण्याचा यांची लत न लागु देण्याचा (आहारी न जाणे) एक उत्तम उपाय तसेच मार्ग आहे ज्याचे आपल्या आरोग्याला देखील अनेक चांगले फायदे प्राप्त होतात.
डिजीटल फास्टिंग हा एक प्रकारचा डिजीटल उपवास आहे ज्यात आपण सोशल मिडिया मोबाईल इंटरनेट यांच्यापासून दूर राहत असतो.अणि स्वताला शारीरिक आणि मानसिक विश्रांती देत असतो.
जसे उपवासात आपण जेवण करत नसतो दिवसभर उपाशी राहुन अनशन करीत असतो.
एकदम त्याचप्रमाणे डिजीटल फास्टिंग मध्ये आपण एखादा दिवस काही ठाराविक तासांसाठी इंटरनेट,मोबाईल सोशल मिडिया अशा सामाजिक प्रसार माध्यमांपासुन दुर राहुन डिजीटल उपवास करीत असतो.
डिजीटल फास्टिंग हा एक असा कालावधी आहे ज्यात आपण सोशल मिडिया इंटरनेट मोबाईल इत्यादी
पासुन दुर तसेच अलिप्त राहत असतो.
डिजीटल फास्टिंग करण्याचे फायदे कोणकोणते आहेत? digital fasting benefits in Marathi
- सोशल मिडिया,इंटरनेट,मोबाईल डिजीटल जगताची आपणास लत लागत नाही –
- डिजीटल फास्टिंग मध्ये आपण काही तास सोशल मिडिया इंटरनेट मोबाईल ह्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस पासुन काही काळाकरता का होईना दुर राहत असतो.
- याने आपण सोशल मिडिया इंटरनेट मोबाईल यांच्या अधिक आहारी जात नाही आपल्याला याचे व्यसन जडत नाही.आपण यांचा फक्त कामापुरता वापर करायला शिकतो.
- आज आपल्याला प्रत्येकाला मिनिटा मिनिटाला आपला मोबाईल चेक करण्याची, मोबाईल वर आलेले काॅल मॅसेज चेक करण्याची सोशल मिडिया अकाऊंट मेसेजेस व्हाटस अप स्टेटस चेक करण्याची सवय लागलेली आहे.
- ज्यामुळे आपण दिवसभर मोबाईल इंटरनेट आणि सोशल मिडिया मध्येच गुरफटून राहत असतो.ज्यामुळे आपण आपल्या परिवार जनापासुन देखील दूर जात आहे.त्यांना पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाहीये.त्यांच्याशी संवाद साधू शकत नाहीये.
- ज्यामुळे नात्यांमध्ये एक प्रकारचा दुरावा निर्माण होऊ लागला आहे.पण डिजीटल फास्टिंग मुळे ह्या सर्व गोष्टीला काही प्रमाणात आळा बसेल.मोबाईल इंटरनेट मुळे दुर गेलेली नाती पुन्हा जवळ येतील.
- आपण काही ठाराविक तासांसाठी इंटरनेट मोबाईल सोशल मिडिया यांच्यापासून अलिप्त होऊन स्वतासाठी स्वताच्या परिवारासाठी प्रियजनांसाठी मित्र मैत्रिणींसाठी वेळ देऊ शकतो.
- याचा अजुन एक फायदा आहे तो म्हणजे याने आपण मोबाईल इंटरनेट सोशल मिडिया ह्या टेक्नाॅलाजीचा वापर आपल्या हितासाठी अणि गरजेपुरता करायला शिकु.
- आपण पुर्णपणे त्याच्या आहारी जाणार नाही.त्याचे व्यसन लावून घेऊन त्याचे गुलाम होणार नाही.
- आपल्या दैनंदिन जीवनात थोडा मोबाईलच्या रिंगटोनचा मॅसेज टोनचा आवाज आला का आपण चटकन रात्री अपरात्री झोपेतून उठून बसत असतो.
- अणि आपला मोबाईल चेक करतो याने आपली झोप व्यवस्थित होत नाही,मोबाईलची मेसेज टोन वाजल्याने मध्येच रात्री अपरात्री झोपमोड होते अणि झोप पुर्ण होत नाही.
- डिजीटल फास्टिंगने ह्या सर्व गोष्टीला आळा बसण्यास मदत होईल.आपल्या झोपेच्या गुणवत्ते मध्ये सुधारणा होईल अणि आपल्याला रात्री चांगली शांत झोप येईल.
- डिजीटल फास्टिंग मुळे आपल्या झोपेच्या गुणवत्ते मध्ये देखील खुप चांगली सुधारणा होईल.आपल्याला उत्तम दर्जाची अणि शांत झोप लागण्यास मदत होते.हा एक डिजीटल फास्टिंग करण्याचा आरोग्यदायी फायदा आहे.
- दिवसभरात कामा निमित्त का होईना आपण प्रत्येक जण मोबाईल इंटरनेट लॅपटाॅप सोशल मिडिया वर अडकलेले असतो.अणि कधी कधी कामाच्या अतिरिक्त व्यापामुळे ताण तणावामुळे आपण खुप ताणतणावात चिंतेत येऊन लागत असतो.
- डिजीटल फास्टिंग मुळे हा मोबाईल वरील काॅल मेसेज सोशल मिडिया वर आलेले मेसेज मुळे निर्माण होणारा ताणतणाव कमी होण्यास मदत होते.अणि आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.
डिजीटल फास्टिंग केल्याने आपल्या एकाग्रता क्षमतेत प्रोडक्टी व्हीटी मध्ये देखील चांगली वाढ होते.कुठलेही कार्य आपण अधिक कार्यक्षमपणे अणि एकाग्रतेने मन लावून करता येते.