भारतातील पहिली एआय शाळा केरळ मध्ये सुरू first AI school in india
नुकतेच भारतातील केरळ येथे पहिली ए आय शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे हे उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती १४ व्या क्रमांकाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
ही आपल्या भारत देशातील पहिली ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा म्हणून ओळखली जाणार आहे.
केरळची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थिरूव अनंतपुरम मधील शांतीगिरी विदयाभवनात ही भारतातील पहिली ए आय शाळा सुरू करण्यात आली आहे.
अजुन एक महत्वाची बाब म्हणजे ह्या भारतातील पहिल्या ए आय शाळेचे उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले आहे.मंगळवारी हया ए आय शाळेचे उद्घाटन करण्यात आले होते.
भारतातील ह्या पहिल्या ए आय शाळेमध्ये इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे.हया शाळेची निर्मिती तसेच डिझाईनिंग युएस मधील आय लर्निग इंजिन तसेच वैदिक ई स्कुल दवारे करण्यात आली आहे.
ह्या भारतातील पहिल्या ए आय शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने शिकवण्यासोबत शिक्षणासाठी ए आयची प्रगत संसाधने उपलब्ध करून दिली जाणार आहे असे शाळेतील अधिकारी वर्गाने म्हटले आहे.
ए आयच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाणांसाठी तयार केले जाईल असे देखील शाळेचे अधिकारी म्हटले आहेत.
भारतातील पहिल्या ए आय शाळेची काही प्रमुख वैशिष्ट्ये –

भारतातील ही पहिली ए आय शाळा इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
ह्या शाळेत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठात स्काॅलरशिप प्राप्त करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.याने विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठातुन उच्च शिक्षण करण्याचा लाभ प्राप्त होईल.
ए आय शाळेमध्ये विद्यार्थ्यांना भविष्यातील सर्व स्पर्धांसाठी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयार करण्यात येते.
उदा,जेईई,नीट,सीएल एटी,सीयुईटी,आय ई एलटीएस इत्यादी.
ह्या ए आय शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्मरण तंत्र,करीअर नियोजन इत्यादी महत्वाच्या विषयावर माहीती प्रदान केली जाईल.करिअर विषयी समुपदेशन करण्यात येईल.एवढेच नव्हे तर विविध स्तरीय चाचण्यांची देखील माहीती देण्यात येणार आहे.
एआय आधारीत शाळेत विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता कौशल्य आधारित ज्ञान दिले जाईल.जेणेकरून त्या कौशल्याच्या आधारे विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी प्राप्त करून किंवा स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करून आपले उत्तम करीअर घडविण्यास मदत होईल.
एआय शाळेत विद्यार्थ्यांना मुलाखत कौशल्य इंटरव्ह्यू स्कील,गटचर्चा गृप डिस्कशन, लेखन कौशल्य रायटिंग स्कील,मॅनर म्हणजे शिष्टाचारा मधील सुधारणा इत्यादी बाबींचे नाॅलेज दिले जाते.
भारतातील पहिल्या ए आय शाळेचे फायदे –
विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुभवात अधिक वाढ होईल.