श्रीगणेशाचे आगमन,शुभ मुहुर्त,स्थापणा अणि पुजा विधी याविषयी संपुर्ण माहीती -Ganesh Chaturthi 2022 Date, Shubh Muhuart And Rituals
मित्रांनो 2022 मध्ये 31 आँगस्ट रोजी आपल्या सर्वाच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे.
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया ह्या नावाचा जयघोष 31 आँगस्ट 2022 पासुन घराघरात अणि गावागावात,चौका चौकात होताना आपणास दिसुन येणार आहे.
आपल्या सर्वाच्याच मनामध्ये सध्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बाप्पाचे स्वागत करायला जवळपास आपली सगळयांचीच तयारी झालेली सुदधा आहे.
जागोजागी सार्वजनिक गणपती बसवण्यासाठी गणेशाची मुर्ती आणायला घरोघरी जाऊन वर्गणी देखील गोळा केली जात आहे.
बाप्पाच्या नवनवीन मुर्ती बाजारात विक्रीसाठी आलेल्या आपणास पाहायला मिळत आहे.
पण मित्रांनो जेव्हा आपण श्रीगणेशाचे आगमन,स्थापणा पुजन करत असतो तेव्हा आपण काही महत्वाच्या बाबींकडे देखील लक्ष देणे खुप गरजेचे असते.
गणपतीची मुर्ती घरी आणत असताना आपण कोणते नियम पाळायला हवे?
● गणपती बाप्पाची मुर्ती घरात बसवण्यासाठी आणायला जात असताना आपल्या डोक्यावर एक पांढरया रंगाची टोपी असायला हवी.
कारण प्राचीन काळापासुनच कुठल्याही अतिथीचे स्वागत करत असताना आपल्या हिंदु धर्मात डोक्यावर टोपी घातली जात असते.हा आपल्या हिंदु संस्कृतीचाच एक महत्वाचा भाग आहे.
म्हणुन बाप्पाचे आगमन होत असताना देखील आपण हा नियम काटेकोरपणे पाळायलाच हवा.
● गणपती बाप्पाला आणायला जात असताना जवळ अक्षदा,गुलाल,जानवे,पांढरया रंगाचा रूमाल,ताम्हण,गणतीळ देखील सोबत घेऊन जायला हवे.
● गणपती बाप्पाला आणण्यासाठी जाण्याच्या आधीच बाप्पाची मुर्ती जिथे बसवायची आहे तिथे बाप्पाचे आसन तयार करून जावे.याने नंतर आपली बाप्पाचे आसन तयार करण्यासाठी धावपळ देखील होत नसते.
● ज्या दुकानातुन आपण गणपती बाप्पाला आणतो आहे तिथे अक्षदा हळद वाहुन घ्यावे मगच बाप्पाला तिथून आपल्या घरी आणावे.अक्षदा ह्या अखंड असल्याने भंग पावत नसतात.
● मग मुर्ती जिथे आहे तिथे अक्षदा हळद वाहुन झाले की गणपती बाप्पाला जानवे घालायचे.
● अणि सोबत आणलेल्या रूमालाने बाप्पाचे तोंड झाकायचे.अणि गणपती बाप्पाला रूमालाने झाकुन घरी आणायचे.बाप्पाला रूमालाने झाकुन घरी आणण्यामागे देखील एक कारण आहे जर गणेशाची मुर्ती सुंदर अणि आकर्षक मनमोहक असेल तर इतर लोकांची वाईट दृष्टी त्या मुर्तीला लागत असते.अणि असे म्हणतात की मनुष्याच्या वाईट भावनांचा प्रभाव हा वस्तुंवर देखील पडत असतो.
● गणपती बाप्पाला आणताना गणपतीचे मुख समोर असायला हवे.बाप्पाला आणताना हातात घंटी वाजवायची अणि गणपती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करायचा असतो.
● ज्याच्या हातात बाप्पाची मुर्ती असेल त्याने पायात कुठलेही वाहन चप्पल बुट परीधान करू नये.
● गणपती बाप्पाला आणल्यावर घराच्या प्रवेशदवारावर गणपती बाप्पाला तांदुळ अणि पाण्याने ओवाळायचे असते अणि ओवाळुन झाल्यानंतर बाहेर टाकुन द्यायचे असते.
● यानंतर ज्याच्या हातात गणपती बाप्पाची मुर्ती आहे त्याच्या चरणांवर पाणी ओतावे.
● मग घरात येऊन गणपती बाप्पाची मुर्ती आसनासमोर खाली ठेवून द्यावी.अणि शास्त्रोक्त पदधतीने गणपती बाप्पाच्या मुर्तीची पुजा करावी अणि मग आसनाच्या जागी मुर्तीची स्थापणा करायची असते.
● समजा आपणास सुतक असेल कोणी घरातील व्यक्ती नातलगाचा मृत्यु झाला असेल तर घरातील व्यक्तींनी पुजा करू नये नैवेद्य दाखवू नये त्याजागी शेजारच्या किंवा नात्यातील ओळखीच्या एखाद्या दुसरया व्यक्तीच्या हस्ते सर्व पुजा करून घ्यावी अणि नैवैद्य दाखवून घ्यावा.
● गणपती बाप्पाची प्रतिष्ठापणा केल्यानंतर घरात वादविवाद भांडण तसेच कलह करू नये.
● घरात मांसाहार आणु नये मांसाहाराचे सेवण करणे देखील या दहा दिवसांच्या कालावधीत करणे टाळायला हवे.
गणपती बाप्पाची मुर्ती कशी असायला हवी?
गणपती बाप्पाची मुर्ती विकत घेताना शाडु मातीची मुर्ती आपण निवडायला हवी.कारण पीओपी मुर्तीने पर्यावरणास हानी पोहचत असते.अणि खुप भक्त जणांच्या धार्मिक भावना देखील याने दुखावले जाण्याची शक्यता असते.
गणपती बाप्पाची मुर्ती ही वितभर हाताची असेल तर अधिक चांगले.याने एक व्यक्ती सुदधा सहज ती मुर्ती सहजासहजी उचलू अणि घरी आणु शकतो.
गणपती बाप्पाची मुर्ती जी आपण घरात आणु ती दिसायला सुबक प्रसन्न अणि पिवळे पितांबर परीधान केलेली असावी.
अशी गणेश मुर्ती अजिबात आणु नये जी तुटलेली भंगलेली आहे जिचा रंग वगैरे उडाला आहे.कारण भंगलेल्या तुटलेल्या मुर्तीची पुजा अजिबात केली जात नसते.
गणपती बाप्पाच्या मुर्तीची स्थापणा घरात कोणत्या दिशेस करायला हवी?
आपण गणपती बाप्पाची मुर्ती ही नेहमी ईशान्य दिशेने स्थापित करायला हवी.अणि मुर्तीचे मुख पश्चिमेकडे राहील अशा पदधतीने मुर्ती स्थापित करायची असते.
काही जण आपल्या घराच्या प्रवेशदवारासमोर सुदधा गणेशाची मुर्ती स्थापित करीत असतात.अशी मान्यता आहे की याने घरात वाईट नकारात्मक शक्ती संकटे विघ्न प्रवेश करत नसतात.
गणपती बाप्पाची कशी मुर्ती घेणे अधिक चांगले असते?
गणपती बाप्पाच्या मुर्तीचे दोन प्रकार असतात एक डावी सोंड असलेला गणपती अणि दुसरा उजवी सोंड असलेला गणपती या दोघांमध्ये कोणत्या सोंडेच्या गणपतीची मुर्ती आणावी हा संभ्रम अनेक गणेशभक्तांमध्ये असतो.
उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मुर्तीची खरेदी घरासाठी कधीच करू नये अशा गणपतीचा फारच थाट सोहळा राखावा लागत असतो जे प्रत्येक घरात होणे शक्य नसते असे गणपती मंदिरात किंवा सार्वजनिक गणेश मंडळामध्ये स्थापित केले जात असतात.
म्हणुन घरासाठी डाव्या सोंडेचा गणपतीची मुर्तीच आणायला हवी.यालाच वाममुखी गणपती म्हणतात.हा गणपती घरात पुजेसाठी विशेष ठेवला जात असतो.ह्या गणपतीची नियमित पुजा आरती करावी लागते.
शास्त्रानुसार गणपती बाप्पाची मुर्ती कधीही बैठी किंवा बसलेलीच असायला हवी.कारण मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना मुर्ती जिवित असते.
गणपती बाप्पाचे प्राण त्या मुर्तीत स्थापण होत असतात.अणि जेव्हा मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हाच त्या मुर्तीस दैवत्व लाभत असते.
मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापुर्वी मुर्ती जर काही कारणाने भंग झाली तर अशा वेळी आपण त्या मुर्तीला नैवैद्य दाखवायचा अणि त्या मुर्तीचे विसर्जन करायचे असते अणि त्याजागी नवीन मुर्ती आणुन घ्यायची.अणि तिची श्रदधेने प्रतिष्ठापणा करायची.
खुप जण गरूड सिंह तसेच इत्यादी वाहनांवर बसलेली एखाद्या देवी देवताच्या खांद्यावर हातावर बसलेली सिंहासनावर,विश्राम अवस्थेत बसलेली,माशावर किंवा एखाद्या प्राण्यावर बसलेली,युदध करत असलेल्या देखाव्याची,शिव पार्वती यांच्या मांडीवर बसलेल्या गणेशाची मुर्ती हौशेने स्थापित करीत असतात.पण शिव पार्वतीची पुजा ही लिंग स्वरूपात केली जाते.म्हणुन अशी मुर्ती घेणे टाळावे.
कारण मुर्ती बसवण्याच्या प्रत्येकाच्या आपापल्या भावभावना श्रदधा हौशी असतात.पण अशा मुर्ती शास्त्रोक्त मानल्या जात नसतात.
गणपती बाप्पाच्या मुर्तीसमोर कोणत्या वस्तु अजिबात ठेवू नये?
● चामडयापासुन तयार केलेली कुठलीही वस्तु बाप्पाच्या मुर्तीसमोर ठेवू नये.कारण चामडे प्राण्यांच्या कातडीपासुन तयार केले जात असते.
गणपती बाप्पाला कसा नैवेद्य दाखवायचा?
दही साखर अणि भात हा बाप्पाला दाखविण्यासाठी सर्वोत्तम नैवेद्य आहे.मोदक हे गणपती बाप्पाचे आवडते पक्वान आहे.
गणपती बाप्पाला जर आपण साधा भाजी अणि भाकर असा नैवेद्य जरी दाखवला तरी चालतो.
गणपतीच्या पुजेची मांडणी कशी करावी?
गणपतीच्या मुर्तीची स्थापणा अणि प्राणप्रतिष्ठा कशी करतात?
● सगळयात आधी जिथे आपणास गणेशाची मुर्ती स्थापित करायची आहे ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावी.डेकोरेशन हे देखील मुर्ती आणण्याच्या अगोदरच करून घ्यावे.
● मग त्या जागी एखादा चौरंग किंवा पाट ठेवावा.चौरंगावर एखादे वस्त्र घालावे.
● पाट तसेच चौरंगाच्या सभोवताली रांगोळी काढून घ्यावी.
● मग बसवलेल्या चौरंगावर पाटावर एक मुठ तांदुळ ठेवावे.किंवा त्या तांदळाचे स्वस्तिक बनवावे.
● मग त्यावर गणेशाची मुर्ती बसवावी.मुर्तीच्या समोर डाव्या हाताच्या बाजुने एक कलश पाणी भरून घ्यावे.त्यापुढे पंचपात्र पळी ठेवून द्यावे.
● चौरंगावरील मुर्तीच्या उजव्या बाजुला शंख अणि डाव्या बाजुला घंटा ठेवून द्यावी.
● मुर्तीच्या दोन्ही बाजुनी समई ठेवावी.
● उजव्या बाजुस विडयांचे ताट करून ठेवावे.विडयाचे दोन पाने घ्यावी अणि देठ देवाकडे येईल अशा पदधतीने ताटात ठेवायचे त्याला एक सुटे नाणे अणि एक सुपारी ठेवावी.
● असे पाच विडे तयार करून देवासमोर दोन विडे मांडायचे.डाव्या हाताला फुलांचे ताट ठेवावे.
● फुलांच्या ताटात वेगवेगळया प्रकारची फुले थोडी थोडी काढुन घेणे.
● दुसरया एका ताटात आणलेली पत्री स्वच्छ करून निवडुन घ्यायची.
● फुलांच्या ताटाच्या बाजुस ह्ळद,गंध,अक्षदा,शेंदूर,कापसाचे वस्त्र अणि जानवे अत्तर ठेवून द्यावे.
● उजव्या बाजुला जिथे पाच विडे मांडले आहे तिथे पाच प्रकारची फळ ठेवावी.फळाजवळ नारळ पण ठेवावे त्याच्या बाजुस गुळ अणि खोबरे ठेवावे.
● देवाला वाहण्यासाठी आणलेला हार मोदक तसेच इतर मिठाई पंचामृत वगैरेची तयारी करून ठेवावी.
● समईजवळ उदबत्ती तसेच काडीपेटी ठेवून द्यावी.
● नारळ अणि तांब्यावर स्वस्तिक देखील काढुन घ्यावे.
● कलश पुजन करताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी,विडयाची पाने,सुपारी नारळ ठेवावे.
● नारळावर अणि तांब्यावर कुंकु ओला करून कुंकवाने स्वस्तिक काढुन घ्यावे.
● कलश स्थापित करत असताना म्हणावे हे कलश देवा तुझ्यात ब्रम्हा विष्णु महेश सावित्री लक्षमी सागर सप्त नदी सप्त सरोवर यांनी चारही वेद गायत्री या सगळयांनी उपस्थित राहुन ही पुजा पवित्र करावी.
● त्यानंतर गहु किंवा तांदळाने अष्टकमळ काढावा अणि त्यावर कलश स्थापित करावा.
● मग गणपतीच्या मुर्तीवर फुलाने पाणी शिंपडुन घ्यावे.आपल्या डोळयांना पाणी लावावे.चारही दिशेस पाणी शिंपडावे.
● गणपतीच्या मुर्तीच्या हदयस्थानी अंगठा ठेवून महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.याने मुर्तीत प्राणप्रतिष्ठा होत असते.नंतर मुर्तीवर फुलाने पाणी शिंपडुन घ्यावे.
● मुर्तीला चंदन,गुलाल,अष्टगंध, लावावा.
● मुर्तीला जाणवे घालावे फुलांचा हार दुर्वा लाल फुले कापसाचे वस्त्र अणि अक्षदा वाहाव्यात.
● बाप्पाला आवडणारया एकवीस नावांचा जप करावा.गणंजय,गणपती,हेरंब,धरणीधर,यक्ष,वरद,शिवप्रसादन,अमोघ,अमित,चिंतामणी,सुमंगल,बीज,आशा,पुरक,सिदधीनायक, इत्यादी
● मुर्ती जागेवर बसवुन मोदकाचा नैवेद्य गणपतीस दाखवावा.अणि मग सर्व मिळुन आरती करावी.
गणेशाच्या मुर्तीच्या स्थापणेचा शुभमुहुर्त –
● 30 आँगस्ट 2022 ला दुपारी तीन वाजुन 34 मिनिटांनी चतुर्थी तिथीस आरंभ होणार आहे.
● 31 आँगस्ट रोजी दुपारी तीन वाजुन 23 मिनिटांनी चतुर्थी तिथी समाप्त होणार आहे.
● 31 आँगस्ट 2022 रोजी व्रत पुजन केले जाणार आहे.