(GI) भौगोलिक मानांकनाचे शेती विकासातील महत्व – Geographical Indication (GI) Tag In Agriculture Crops Mahiti
काय आहे Geographical Indication (GI) कायदा ?
जी.आय. कायद्याचा मूळ हेतूच असा आहे की एखादा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ हा एखाद्या विशिष्ट भागातून निर्माण होत असेल तरच त्याला हे वैशिष्ट्यपूर्ण नोंद ज्याला गुणवत्ताधारक पदार्थ किंवा ‘क्वालिटी टॅग” असेही संबोधले जाते किंवा त्याची नोंद हा गुणवत्ताधारक पदार्थ म्हणूनच करावी आणि त्याला कायद्याची जोड मिळाली पाहिजे किंवा कायदेरुपी त्याची पडताळणी करून त्याला कायमस्वरूपी महत्त्वाचे वेगळे स्थानमिळाले पाहिजे आणि त्या वेगळेपणामुळे त्याला ‘प्रीमियम प्राईस” किंवा अधिकचा मोबदला मिळणे क्रमप्राप्त ठरते. शिवाय त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा उपलब्ध होऊ शकते. या उद्दिष्टांना धरून हा (GI) कायदा भारतात स्वीकारला गेला व या कायद्याच्या माध्यमातून पहिली नोंद ‘दार्जिलिंग चहा’ या शेतीजन्य पदार्थाची झाली.
भारत सरकारने महत्वाचा कायदा २००१ मध्ये देशात लागू केला,त्याला भौगोलिक उपदर्शन कायदा म्हणजेच ‘जी.आय.’चा कायदा असे म्हटले जाते. वास्तविक पाहता जी.आय. चा कायदा जागतिक व्यापार संघटना म्हणजे डब्ल्यु.टी.ओ. च्या माध्यमातून भारताने स्वीकारला.
हा कायदा स्वीकारताना भारताने देशातील वैशिष्ट्यपूर्ण शेतीमालाला राष्ट्रीय मान्यता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल असे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
खऱ्या अर्थाने जी.आय. कायदा हा विशेषता तीन प्रकारच्या पदार्थांना लागू होतो.
- एक शेतीजन्य पदार्थ,
- दोन उत्पादित पदार्थ आणि
- तीन नैसर्गिक पदार्थ.
- शेतीजन्य पदार्थ म्हणजे शेतीशी निगडीत वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ. उदा. महाबळेश्वर स्ट्रॉबेरी.
- उत्पादित पदार्थांमध्ये साडी, खेळणी किंवा हातमाग निर्मित वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांचा समावेश होतो. उदा : पैठणी साडी, पुणेरी पगडी. तर
- नैसर्गिक जी.आय. म्हणजे निसर्गातील निर्माण होणारा वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ उदाहरणार्थ राजस्थानमधील मकराना मार्बल. कृषिजन्य पदार्थांसाठी काही किमान घटकांचा समावेश केला गेला आहे,
- जे घटक त्या पदार्थाला वैशिष्ट्य प्राप्त करून देतात. उदाहरणार्थ माती, पाणी, वातावरण किंवा निसर्गतः उपलब्ध काही देणगी जसे की सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या नैसर्गिक देणगी असलेले घटक लपलेले असतात. आणि त्यामुळे या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये उत्पादित होणाऱ्या नद्यांना देखील वेगळे वैशिष्ट्य प्राप्त होते. त्या नदीच्या जलामुळे अनेक शेतीजन्य पदार्थांना त्या वैशिष्ट्यांचा लाभ मिळतो.
उदाहरण सांगायचे झाल्यास
- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावणाऱ्या गोदावरीला वेगळ्या नैसर्गिक घटकांचा लाभ मिळतो आणि तोच पुन्हा तेथील द्राक्ष आपल्या वैशिष्ट्यांमध्ये आणतात.
- अशाच प्रकारे वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या जिल्ह्यात मग ते कोल्हापूरची पंचगंगा नदी असो किंवा जळगावची तापी नदी असो अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या जलस्रोत किंवा त्याचा नैसर्गिक घटकांमुळे तेथील अनेक पदार्थांना वैशिष्ट्यपूर्ण बनवले गेले आहे.
भारत डब्लू-टी.ओ. (५४70) चा सभासद राष्ट्र असून सुद्धा सदर बौद्धिक संपदेचा फायदा घेऊ शकला नाही. याचे महत्त्वाचे कारण –
- आपली जनता आणि जी.आय. निर्माता अस्लेला आपला शेतकरी, विणकर, कारागीर हे जी.आय. आणि त्याच्या ज्ञानापासून अनभिज्ञ आहे.
- शेतीतील उत्पादने किंवा त्या त्या भागातील विविध कारागिरांनी तयार केलेल्या क्स्तू. कलाकृती, पदार्थ, ही आपली बॉद्धिक संपदा आहे. हेच मुळी त्यांच्या लक्षात येत नाही.
- वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने घेणाऱ्या उत्पादकास या बौद्धिक संपदेचे महत्त्व आणि जी.आय. कळला तर ब्राजारपेठ त्याच्या कवेत आल्याश्वाय राहणार नाही. जी.आय. या बौद्धिक तंपदेचा फायदा घेऊन या उत्पादकांना जागतिक ढाजारपेठेवर अधिराज्य गाजवता येईल, वर्चस्व प्रस्थापित करता येईल एवद्धे सामर्थ्य जी.आय. मध्ये आहे.
- आज आपला शेतकरी आपल्या मालाला चांगला भाव मिळाला तर बरं होईल. या अपेक्षेकर जगत आहे. ही संधी त्याना जी.आय. च्या माध्यमातून मिळ्गार आहे.
- जी.आय. च्या माध्यमातून त्याचा वैशिष्ट्यपूर्ग द गुणवत्ताधारक माल/उत्पादन कोगाला विकायचे, त्याचा हमीभाव काय अत्तगार आहे हे ठरविण्याची संधी मिळते.
- तसेच याच माध्यमातून त्याला त्याच्या या गुणवत्तापूर्ग मालासाठी आंतरराष्ट्रीय ब्राजारपेठेचे दरवाजे खुले होतात. विविध वैशिष्ट्यपूर्ग आणि गुणवत्ता अस्ल्यामुळे हमीभाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळ्वून देणाऱ्या
- जी.आय. ची अनेक उदाहरणे आहेत. जर आपण बाजारात चहा आणायला गैलो आणि सहजरीत्या चहाच्या किमतीकडे बारकाईने लक्ष दिले, तर असे लक्षात येईल की ‘दार्जिलिंगचा चहा’ आगि “आसामचा चहा” वेगळ्या पद्धतीने आणि देगवेगळ्या किमतीमध्ये दाखविलेला असतो. बरेच मंडळी दार्जिलिंगचा चहा महाग असतांनाही हाच चहा घेणे पसंत करतात, कारग दार्जिलिंगच्या चहाला जी.आय. मिळालेला आहे, जी.आय. दार्जिलिंगचा क्वालिटी टॅग आहे.
- एखादा विशेष पदार्थ किंवा वस्तू एका विशिष्ट भागातूत आला असेल तर त्या पदार्थाला बौद्धिक संपदेचा दर्जा, भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत मिळतो. हा दर्जा म्हणजे केंट्र रकारने त्या पदार्थाला अथवा वस्तूला, त्या जागेला आणि तेथील कम्युनिटीला दिलेला ‘क्वालिटी टॅग” अस्तो.
- दार्जिलिंगच्या चहाला जी.आय. मिळाल्यावर त्याची गुणवत्ता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धीस आली आणि त्याचा परिणाम दार्जिलिंग चहाला प्रीमियम प्राईस मिळायला लागले.
- त्याचबरोबर ९० देशांमध्ये त्याची निर्यात होऊ लागली. मग याच दार्जिलिंग चहाची यशोगाथा ही भारतातील इतर शेतीजन्य पदार्थांना प्राप्त होऊ शकते. आगि त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते.
जी.आय. हा आपल्या भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाचा क्वालिटी टॅग आहे, तो आपली केवळ शेती वाचवणार नाही तर तो आपली शेती वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावगार आहे.
- आपला महाराष्ट्र वैरिष्ट्यपूर्ग शेती पदार्थांनी संपन्न असे राज्य आहे. इथल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान पाच शेतीजन्य वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ लपलेले आहेत.
- आज जरी आपण देशपातळीवर शेतीजन्य पदार्थांसाठी क्रमांक एक कर असलो तरी अजून किमान पाचपट या शेती जी.आय. च्या नोंदी एकट्या महाराष्ट्रातून होऊ शकतात. असा अहवाल देखील तयार केल्या गेला आहे.
- वास्तवात शेती जी.आय. हा आपल्या पूर्वजांचा पेटंट आहे. त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून एका दिशेष भागात वैदिष्ट्यपूर्ण पदार्थाची निर्मिती होऊ शकते, याचा शोध लावला आणि त्याला दिशा देत त्या भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पदार्थाची निर्मिती सुरुवात केली. अशा अर्थाने आपल्या पूर्वजांच्या संपदेला आपण टिकवगे ही आपल्ली सामाजिक बांधीलकी आहे. त्याचबरोबर राज्याच्या दृष्टीने ती सांस्कृतिक ठेवाही ठरू शकते.
- जगभरातील जी.आय. च्या तोंदीचा जर आपण विचार केला तर असे लक्षात येईल की एकट्या युरोपमध्ये कित्येक हजार हेक्टर शेतीची जी. आय. नोंदणी केली गेली आहे. चीनमध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येने शेतीजन्य पदार्थांना जी.आय. देण्यात आला आहे.
- परंतु कृषिप्रधान देश म्हणून गौरव असलेल्या आपल्या देशांमध्ये केवळ ११२ शेतीजन्य पदार्थ जी.आय. म्हणून नोंद पावले आहेत. अशावेळी आपल्याला गरुडझेप घेत भारतातील शेती जी.आय ची नोंद वाढविण्याकडे लक्ष्य केंद्रित केले गेले पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातान आणि जिल्ह्या जिल्ह्यातून तसेच महाराष्ट्रातल्या तालुक्यातून व गावा गावातून व्हायला हवी.
- जी.आय. चा प्रसार, त्याचे महत्त्व हे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत अधोरेखित झाले तर खऱ्या अर्थाने जी.आय. चा फायदा ज्या घटकाला होणार आहे.तोच म्हणजे आपला शेतकरी तो स्मृद्ध होईल आणि त्याच्या माध्यमातून ग्राहकाला गुणवत्ता पूर्ण पदार्थ उपलब्ध होतील.
- सदर पदार्थ हे अनेक पोषक घटकांनी संपन्न असल्या कारणाते एकंदरीतच महाराष्ट्रातील जनतेला उपलब्ध झाल्याने त्यांचे आयुष्यमान वाढेल. थोडक्यात जी. आय.हा महाराष्ट्रासाठी एक मोठी सामाजिक , आर्थिक, बॉद्धिक संपती बनू शकतो आणि
- आपल्या महाराष्ट्राला विशेष करून महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला उन्नतीच्या शिखरावर पोहचविण्यासाठी जी.आय. महत्त्वाची भूमिका बजावूशकतो. ह्यात काही शंका नाही आणि त्या विचारला धरून महाराष्ट्र शेतीजन्य जी.आय. संपत्र राष्ट्र म्हणवून नावलौकिक मिळावे यासाठी प्रयत्न करायला हवेत तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र महान राष्ट्र होईल.
संदर्भ – शेतकरी जानेवारी २०२१