ध्वज फडकवताना नागरीकांनी कोणती विशेष काळजी घ्यावी? – Har Ghar Tiranga Guidelines for the Flag code of India
मित्रांनो उद्यापासुन 13 आँगस्ट ते 15 आँगस्ट दरम्यान भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण भारतात राष्टीय उत्सव म्हणुन मोठया उत्साहाने साजरा केला जाणार आहे.
याबाबत केंद्र सरकारने जनतेला तसे आवाहन देखील केले आहे.उद्यापासुन म्हणजेच 13 आँगस्ट ते 15 आँगस्ट पर्यत संपुर्ण भारतात हर घर तिरंगा हे अभियान राबवले जाणार आहे.
या अभियाना दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे.पण तिरंगा फडकवताना देखील प्रत्येक नागरीकाने ध्वजसंहितेचे पालन काटेकोरपणे करणे खुप गरजेचे असणार आहे.
पण खुप भारतीय नागरीकांच्या मनात अजुनही हा प्रश्न आहे की तिरंगा फडकवताना देशाच्या तिरंग्याचा आपल्याकडून चुकुनही अपमान होऊ नये यासाठी आपण कुठली काळजी घ्यायला हवी.काय करावे?अणि काय करू नये?
आपल्या ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात आपण जाणुन घेणार आहोत.
ध्वज फडकवताना नागरीकांनी कोणती विशेष काळजी घ्यावी?
● प्रत्येक भारतीय नागरीकाने 13 आँगस्ट ते 15 आँगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकवून हर घर तिरंगा ह्या अभियानात सहभागी व्हावे.
● ध्वज लावत असताना केशरी ह्या रंगाची बाजु काठीच्या वरील टोकाकडे असणे गरजेचे आहे.
● आपल्याकडून ध्वज हा उलटा फडकाविला जाणार नाही याची नागरीकांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
● जो तिरंगी ध्वज आपण फडकवू त्याचा आकार हा आयताकार असणे गरजेचे आहे.
● आपण आपल्या घरावर फडकवाल त्या झेंडयाची लांबी 3*2 इतकी असावी.
● आपण फडकवत असलेला ध्वज हा कातलेल्या विणलेल्या यंत्रादवारे तयार करण्यात आलेल्या सुत,पाँलिस्टर,लोकर,सिल्क तसेच खादीपासुन तयार करण्यात आलेल्या कापडाचा असावा.
● असा ध्वज आपल्या घरावर अजिबात फडकावू नये जो अर्धा फाटलेला तसेच मळलेला तुटलेला असेल.
● जर आपण कार्यालयीन ठिकाणी ध्वज फडकवणार असाल तर तिथे देखील ध्वज संहितेचे पालन करायला हवे.ध्वज हा कधीही सुर्योदय झाल्यानंतर फडकावावा अणि सुर्यास्त झाल्यावर खाली उतरवावा.
● जर आपण आपल्या घराच्या वर तिरंगा फडकवित असाल तर रोज संध्याकाळी तो खाली उतरविण्याची अजिबात आवश्यकता नाही.
● राष्टध्वजा सोबत इतर कुठलाही धार्मिक वगैरे ध्वज फडकवायचा नही.
● ध्वज खाली उतरवून झाला की त्याची व्यवस्थित घडी घालून घ्यायची अणि तो नीट जपुन घरात एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवून द्यायचा.
ध्वज फडकविताना नागरीकांनी काय करणे टाळावे?
● नागरीकांनी प्लास्टीक पासुन तयार केलेला ध्वज अजिबात वापरू नये.
● असा ध्वज लावणे टाळावे जो फाटलेला तसेच चुरगळलेला आहे.
● ज्या काठीवर आपण ध्वज फडकविण्यासाठी लावला असेल त्यावर हार किंवा फुले चढवू नये.
● नागरीकांनी राष्टीय ध्वजापेक्षा उंच इतर कुठलाही ध्वज फडकण्याचा प्रयत्न करू नये.किंवा राष्टीय ध्वजाच्या जवळ देखील इतर कुठलाही झेंडा लावत बसु नये.
● राष्टध्वजास जमिनीवर मातीत अणि पाण्यात पडु देऊ नये.
● ध्वज बांधताना याची काळजी घ्यावी की तो फडकत असताना अजिबात फाटणार नाही.
● ध्वज अशा पदधतीने कुठेही अजिबात ठेवू नये तसेच वापरू नये ज्याने तो मळेल.
● राष्टध्वजावर पेन पेन्सिल वगैरेने काहीही लिहत बसु नये.म्हणजेच राष्टध्वजावर काहीही नाव वगैरे लिहित बसु नये.
● हर घर तिरंगा अभियान पार पडल्यावर राष्टध्वज कुठेही फेकू नये तो नीट जपुन ठेवावा.
● अभियाना दरम्यान तिरंगा फडकवून झाल्यावर राष्टध्वज कुठल्याही इतर कामासाठी वापरू नये.
● नागरीकांनी तिरंग्यामध्ये कुठलीही वस्तु गुंडाळुन ठेवु नये.