हेमोटोक्रिट टेस्ट विषयी माहिती – Hematocrit test information in Marathi

हेमोटोक्रिट टेस्ट विषयी माहिती | Hematocrit test information in Marathi

हेमोटोक्रिट टेस्ट म्हणजे काय? | Hematocrit test information in Marathi

हेमोटोक्रिट टेस्ट ही एक सामान्य ब्लड टेस्ट आहे.

हेमोटेक्रिट टेस्ट हे रक्ताच्या एकुण खंडात लाल रक्तपेशींची टक्केवारी मोजण्याचे काम करते.

लाल रक्तपेशी ह्या मानवी आरोग्यासाठी खुप महत्वपूर्ण असतात.लाल रक्तपेशी आपल्या शरीराच्या विविध भागांत शरीराला आवश्यक ती पोषकद्रव्ये तसेच आॅक्सिजन पोहचवण्याचे काम करत असतात.

आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींची मात्रा योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते.

जेव्हा एखाद्या रूग्णाच्या शरीरात खुप कमी किंवा अधिक प्रमाणात लाल रक्तपेशी आढळुन येत असतात तेव्हा डाॅक्टर त्या रूग्णाला हेमोटोक्रिट टेस्ट करण्याचा सल्ला देत असतात.

जेव्हा डाॅक्टर एखाद्या रूग्णास सीबीसी टेस्ट करावयास सांगतात तेव्हा त्यात हेमोटोक्रिट टेस्टचा देखील समावेश होत असतो.

हेमोटोक्रिट टेस्ट का केली जाते?

हेमोटोक्रिट टेस्ट आपल्या रक्तामधील लाल रक्तपेशींचे प्रमाण किती आहे हे मोजते अणि लाल रक्तपेशीचे प्रमाण समजून घेण्यास मदत करते.

हेमोटोक्रिट टेस्ट द्वारे डाॅक्टरांना हे समजुन घेण्यास मदत होते की रूग्णाचे शरीर त्यांनी केलेल्या उपचारावर कशापदधतीने प्रतिसाद देत आहे.हया टेस्ट द्वारे डाॅक्टरांना रूग्णाच्या विशिष्ट स्थितीचे निदान करता येते.

हेमोटोक्रिट टेस्ट विविध कारणांसाठी केली जाते जसे की अॅनिमिया,ल्युकेमिया,डिहायड्रेशन आहाराची कमतरता इत्यादी.

हेमोटोक्रिट टेस्टचे काही साईड इफेक्ट होत असतात का?

हेमोटोक्रिट टेस्टचे कुठलेही साईड इफेक्ट होत नसतात.फक्त रक्त काढण्याच्या जागी थोडाफार रक्तस्राव होण्याची शक्यता असते.

रक्त काढुन झाल्यानंतर काही मिनिटांनी रक्तस्राव होत असेल किंवा सूज येणे असा काही प्रकार होत असेल तर आपण त्वरीत डाॅक्टरांना कळवायला हवे.

हेमोटोक्रिट टेस्ट करण्याआधी काही पुर्वतयारी करावी लागते का?

हेमोटोक्रिट टेस्ट ही एक काॅमन टेस्ट आहे ही टेस्ट करण्याआधी आपल्याला उपवास करण्याची तसेच इतर कुठलीही विशेष तयारी करायची गरज नसते.तरी देखील आपणास अधिक माहिती हवी असल्यास आपण तज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

कलौजी म्हणजे काय? – कलौजीचे फायदे – Kalonji meaning in Marathi

हेमोटोक्रिट टेस्ट दरम्यान काय केले जाते?

  1. हेमोटोक्रिट टेस्ट साठी अल्पशा प्रमाणात ब्लड संॅपलची आवश्यकता असते हे रक्ताचे सॅपल हाताच्या बोटांच्या रक्त वाहिनी दवारे काढले जात असते.
  2. आपण जी होमोटोक्रिट टेस्ट करतो आहे ती जर सीबीसी टेस्ट मधील भाग असेल तर अशा वेळी लॅबरोटरी टेक्नीशियन रूग्णाच्या रक्तवाहिनीतुन सर्वप्रथम रक्त काढत असतो.
  3. ज्या जागेहुन रक्त काढायचे आहे ती जागा सर्वात पहिले अॅण्टीसॅप्टीकने साफ करण्यात येते.यानंतर ती जागा पटटीने बांधुन टाकली जाते.याने शिरा स्पष्टपणे दिसून येत असतात.
  4. मग रक्त काढण्यासाठी रक्त वाहिनीत सुई टोचली जाते रक्त काढुन झाल्यानंतर हातावर बांधण्यात आलेली पटटी काढुन सुईने टोचलेल्या जागी एक लहानशी पटटी किंवा कापुस लावण्यात येतो.येणे रक्त वाहत नाही.
  5. अणि मग काढलेले रक्त तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येते.ही चाचणी फक्त काही मिनिटांत पुर्ण होत असते.
  6. रक्त काढत असताना शिरेमध्ये सुई टोचली जात असल्याने रूग्णाला थोडी वेदना होऊ शकते.यात काही रूग्ण रक्त बघुन चक्कर येऊन खाली पडण्याची शक्यता असते.

यानंतर सेंटरीफ्युज या फिरणारया यंत्राच्या सहाय्याने हेमोटोक्रीटचे मोजमाप,मुल्यांकन केले जाते.

SAMPLE REPORT – Hematocrit test

https://www.lalpathlabs.com/SampleReports/V596.pdf