बजाज फायनान्सचे ईएम आय कार्ड आँनलाईन कसे काढायचे? -How to apply my Bajaj Finserv EMI Network Card??
आजच्या लेखात आपण बजाज फायनान्सचे ईएम आय कार्ड कुठेही न जाता घरबसल्या आँनलाईन कसे काढायचे यासाठी कोणकोणती प्रोसेस फाँलो करायची हे अत्यंत सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
बजाज फायनान्सच्या ईएम आय कार्डचा उपयोग काय होणार आहे?
बजाज फायनान्सच्या इंस्टा ईएम आय कार्डचा वापर करत आपण घरातील कुठलीही वस्तु ईएम आय वर घेऊ शकणार आहे.
यात आपल्याला नो काँस्ट ईएम आयवर वस्तु खरेदी करण्याचे सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.
बजाज फायनान्सचे ईएम आय कार्ड आँनलाईन कुठून काढायचे?
बजाज फायनान्सचे ईएम आय कार्ड आँनलाईन काढण्यासाठी आपल्याला बजाज फायनान्सच्या आँफिशिअल वेबसाइट bajajfinserv.in वर जायचे आहे.
बजाज फायनान्सच्या इंस्टा ईएम आय कार्डचे एकूण लिमिट किती आहे?
बजाज फायनान्सच्या इंस्टा ईएम आय ह्या कार्डाचे लिमिट दोन लाख इतके आहे.
बजाज फायनान्सचे इंस्टा ईएम आय कार्ड कशा पदधतीने उपलब्ध होईल?
बजाज फायनान्सचे इंस्टा ईएम आय कार्ड आपल्याला फक्त डिजीटल स्वरुपात उपलब्ध होणार आहे.हे कार्ड आपणास फिजीकली उपलब्ध होणार नही.
बजाज फायनान्सचे इंस्टा ईएम आय कार्ड काढायला चार्ज/फी वगैरे भरावी लागते का?
बजाज फायनान्सचे इंस्टा ईएम आय कार्ड काढायला आपल्याला 530 रूपये फी भरावी लागते.
बजाज फायनान्सच्या इंस्टा ईएम आय कार्डचे फायदे कोणकोणते आहेत?
● ह्या कार्डची सर्व प्रोसेस पुर्णपणे डिजीटल असणार आहे.कार्डच्या प्रक्रियेसाठी आपणास कुठेही जा ये करण्याची गरज पडणार नाही.आपण फक्त इंटरनेटच्या माध्यमातुन ही सर्व प्रक्रिया पुर्ण करू शकणार आहे.
● हे कार्ड अँप्रुव्ह व्हायला जास्त वेळ लागत नही अवघ्या तीस सेकंदात हे कार्ड वापरण्यासाठी अँप्रूव्ह होत असते.
● कार्ड अँक्टिवेशन देखील यात इंस्टंट होत असते.म्हणजेच आपले घेतलेले हे डिजीटल इंस्टा ईएम आय कार्ड लगेच अँक्टिव्हेट देखील होऊन जात असते.
● बजाज फायनान्सच्या इंस्टा ईएम आय कार्डचा वापर करून आपण एक मिलियन पेक्षा अधिक वस्तु प्रोडक्ट नो काँस्ट ईएम आयवर घेऊ शकणार आहे.
● ईएम आयचा एकुण कालावधी २४ महिने इतका आहे.
● बजाज फायनान्सच्या ह्या कार्डने आतापर्यत तीन हजारपेक्षा अधिक लोकेशन कव्हर केल्या आहेत.
● हे कार्ड आपल्याला आँनलाईन अणि आँफलाईन दोघे ठिकाणी कुठलीही जीवनोपयोगी घरगुती वस्तु ईएम आयवर काढण्यासाठी वापरता येणार आहे.
बजाज फायनान्सचे इंस्टा ईएम आय कार्ड आँनलाईन काढण्याची पुर्ण प्रोसेस –
- इथे ह्या वेबसाइट वर बजाज फायनान्सचे इंस्टा ईएम आय कार्ड आपण फक्त तीन स्टेप फाँलो करून काढु शकणार आहे.
- बजाज फायनान्सचे इंस्टा ईएम आय कार्ड आँनलाईन काढण्यासाठी आपल्याला बजाज फायनान्सच्या आँफिशिअल वेबसाइट bajajfinserv.in वर सर्वप्रथम जायचे आहे.
- बजाज फायनान्सचे इंस्टा ईएमआय कार्ड काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम व्हेरीफाय युअर नंबर मध्ये आपला मोबाइल नंबर इंटर करावा लागेल.अणि गेट नाऊ वर क्लीक करायचे आहे.
- मग आपल्या मोबाइल वर एक ओटीपी सेंड केला जातो तो आपल्याला इथे जसाच्या तसा फिल करायचा आहे.यानंतर आपली रिक्वेस्ट सबमीट होत असते.
- इंस्टा ईएम आय कार्डसाठी रिक्वेस्ट सबमीट झाल्यानंतर आपल्याला आपले पँन कार्डवरचे पुर्ण नाव जसेच्या तसे इथे टाकायचे आहे.पँन कार्डचा नंबर देखील टाकायचा आहे.
- पँन कार्डवर दिलेली आपली जन्मतारीख टाकायची आहे अणि शेवटी आपण जिथे राहतो त्या एरियाचा पिन कोड नंबर टाकायचा आहे.
- यानंतर आपला इंप्लाँईमेंट टाईप टाकायचा आहे वेतन घेत असाल सँलरीड चुज करायचे आहे अणि सेल्फ इंफ्लाँईड असाल तर सेल्फ इंफ्लाँईड हे आँप्शन निवडायचे आहे.
- या दोघांपैकी आपला जो इंप्लाँयमेंट टाईप असेल तो टाकायचा आहे.
- यानंतर आपले जेंडर टाकायचे आहे पुरूष असाल तर मेल टाकायचे अणि स्त्री असाल तर फीमेल टाकायचे आहे.अणि खाली दिलेल्या प्रोसेस बटणवर ओके करायचे आहे.
- प्रोसिड केल्यानंतर आपल्याला जे काही लिमिट मिळाल असेल ते दिसुन येईल.
- यानंतर आपल्याला केवायसी प्रोसेस करावी लागणार आहे.केवायसी मध्ये आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे.
- महत्वाची टीप :(केवायसी करण्यासाठी आपला आधार कार्ड नंबर आपल्या मोबाइल नंबरला लिंक असावा लागतो.)
- खाली एक कँप्चया कोड दिलेला असेल तो फिल करायचा आहे.अणि प्रोसिड वर ओके करायचे आहे.
- प्रोसिड केल्यानंतर आपल्या मोबाइल नंबर वर एक ओटीपी सेंड केला जातो.तो ओटीपी इथे टाकायचा आहे.
- खाली एक आपल्याला हवा तो शेअर कोड टाकायचा आहे.फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण जो शेअर कोड टाकु तो आपल्या ईकेवायसीचा शेअर कोड देखील असणार आहे.
- शेअर कोड टाकल्यावर अणि सबमीट केल्यावर यानंतर आपली सर्व माहीती फोटोसहित आपल्या समोर स्क्रीनवर दिसुन येईल.ही सर्व दिलेली माहीती बरोबर आहे की चूक याची एकदा खात्री करून घ्यायची अणि मग कंटिन्यु बटणवर ओके करायचे आहे.यानंतर आपले केवायसी देखील पुर्ण होऊन जाईल.
- केवायसी झाल्यावर आपल्याला आपले ईएम आय लिमिट अणि फस्ट ट्रान्झँक्शन लिमिट दिसुन येईल.जिथे कार्डचे फायदे देखील दिलेले असतील.
- यानंतर आपल्याला कार्डचे पेमेंट करायचे आहे म्हणजेच ५३० रूपये फी तसेच चार्ज भरायचा आहे.
- कार्डची फी भरायला युपीआय,डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड या तिघांपैकी कुठलेही एक आँप्शन सिलेक्ट करू शकतो.
- पेमेंट करून झाल्यावर म्हणजे कार्डची फी चार्ज भरून झाल्यावर पेमेंट सक्सेसफुली डन असे नाव वरती हेडिंगला स्क्रीनवर येईल.
- यानंतर आपण मँन्डेट मध्ये जाऊन व्युव्ह कार्डवर जाऊन आपण आपले कार्ड बघु शकतो.
- यानंतर आपण त्याच्या शेजारील अँक्टीव्हेट नाऊ वर ओके करायचे आहे.
- एखादी वस्तु ईएम आयवर घेतल्यावर ज्या बँक खात्यातुन आपले ईएम आयचे पैसे कट केले जातील ज्या टाईपचे आपले खाते आहे त्या टाईपमधील बँकेचा अकाऊंट नंबर आपणास टाकायचा आहे.सेव्हिंग करंट इत्यादी.आपल्या बँकेचा आय एफ सी कोड देखील येथे आपणास द्यायचा आहे.अणि खाली दिलेल्या प्रोसेस बटणवर ओके करायचे आहे.
- यानंतर आपणास तीन आँप्शन दिले जातात नेट बँकिंग कार्ड,ओटीपी यातील आपण कुठलेही एक आँप्शन निवडु शकतो.
- आपली डेट आँफ बर्थ टाकायची आहे.अणि सबमीट करायचे आहे.
- पुढे आपण जसे आँप्शन सिलेक्ट केले असेल त्यानुसार प्रोसेस करावी लागणार आहे.
- आपण जर ओटीपी आँप्शन आँप्शन सिलेक्ट केले असेल तर आपण ओटीपी टाकुन वँलिडेशन करायचे आहे.
- यानंतर ओटीपी वँलिडेशन सक्सेसफुल झाल्याचे स्क्रीनवर नाव दिसुन येईल.कोणत्या बँकेचे अकाऊंट आपण टाकले आहे अकाऊंट नंबर काय आहे ते देखील इथे दिसुन येईल.
- यानंतर प्रोसिड वर ओके करायचे आहे.प्रोसिड झाल्यानंतर आपले कार्ड अँप्रुव्ह झाले आहे असे नाव स्क्रीनवर दिसेल.
बजाज फायनान्सचे इंस्टा ईएम आय हे कार्ड आपण डाउनलोड करू शकतो का?
होय पण त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जाऊन बजाज फायनान्सचे अँप डाउनलोड करावी लागेल.