आपण आपले संभाषण कौशल्य कसे वाढवावे?how to improve communication skills in Marathi

आपण आपले संभाषण कौशल्य कसे वाढवावे? How to improve communication skills in Marathi

आज आपल्याला प्रत्येकालाच वाटत असते की आपण आपल्या जीवनात तसेच कार्यक्षेत्रात यशस्वी व्हायला हवे आपल्याला उत्तम यश प्राप्त व्हायला हवे.

पण दैनंदिन जीवनात तसेच इतर कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपल्या अंगी एक चांगले संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे.

जो पर्यंत आपण उत्तम संभाषण कौशल्य आपल्या व्यक्तीमत्त्वात आत्मसात करत नाही तोपर्यंत आपण जगाचे नेतृत्व करू शकत नाही.जीवनात कुठल्याही क्षेत्रात पाहिजे तसे यश देखील प्राप्त करू शकत नाही.

म्हणून आजच्या लेखात आपण आपले संभाषण कौशल्य कसे वाढवावे अणि त्यासाठी आपण काय करायला हवे?

आपल्या संभाषण कौशल्यात वाढ होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात कोणत्या गोष्टी करणे टाळायला हवे हे जाणुन घेणार आहोत.

how to improve communication skills in Marathi
how to improve communication skills in Marathi

१)निरर्थक अणि अर्थहीन बोलणे टाळले पाहिजे-Dont talk senseless and meaningless

जर आपणास आपल्या संभाषण कौशल्यात वाढ करायची असेल तर आपण निर्रथक अणि अर्थहीन बोलणे टाळले पाहिजे.

समोरची व्यक्ती काय बोलते आहे हे आधी समजून घ्यायला हवे मग बोलायला हवे.

कारण कधी कधी असे होते की समोरचा व्यक्ती एखाद्या वेगळ्या विषयावर बोलत असतो.अणि आपण कुठल्या तरी दुसरयाच विषयावर बोलत असतो यामुळे आपल्या मध्ये अणि समोरच्या व्यक्तींमध्ये उत्तम संभाषण संवाद घडुन येत नाही.

म्हणून समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे हे समजुन न घेता आपण निर्रथक अणि अर्थहीनपणे काहीही बोलणे टाळायला हवे.आधी समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे हे नीट व्यवस्थित ऐकून समजून घ्यायला हवे मगच काही बोलायला हवे.

जेव्हा दोन व्यक्ती आपापसात संभाषण करीत असतात तेव्हा त्यांच्यात जाऊन कुठल्याही विषयावर बोलणे टाळले पाहिजे आधी ते व्यक्ती कोणत्या विषयावर संभाषण करीत आहेत हे ऐकून समजून घ्यायला हवे मगच पुढे काही बोलायला हवे.

See also  मानवी मेंदु खाणारया अमिबा विषयी माहिती Brain eating amoeba information in Marathi

2) बोलताना आपले वर्चस्व आपले मत गाजवण्याचा प्रयत्न करू नये –

काही जणांना बोलताना आपले वर्चस्व गाजविण्याची सवय असते.फक्त मेरी सुनो मी सांगेन ती पुर्वदिशा अशा प्रकारचा काही व्यक्तींचा स्वभाव असतो.

म्हणुन समोरची व्यक्ती काय बोलते आहे हे समजून न घेता ते आपलेच स्वताचे गाजवत असतात.

म्हणजे समजा जेव्हा दोन व्यक्ती एखाद्या विषयावर चर्चा करीत असतात प्रांजळपणे संभाषण करीत असतात तेव्हा एखादा तिसरा व्यक्ती जातो अणि त्यांच्या बोलण्यात आपलेच स्वताचे वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करू लागतो.
आपलेच मत इतरांपेक्षा किती योग्य आहे हे दाखवू लागतो.

अशा आपलेच वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तींसोबत संभाषण करायला लोक टाळाटाळ करतात, त्यांच्यापासून दूर पळतात.

म्हणुन कधीही बोलताना आपले स्वताचे वर्चस्व मत गाजविण्याचा प्रयत्न करू नये इतरांवर ते लादण्याचा प्रयत्न करू नये समोरच्या व्यक्तीचे मत देखील आपण प्रांजळपणे ऐकुन घ्यायला हवे.याने आपल्याला समोरच्या व्यक्तींसोबत उत्तम रीत्या संवाद साधता येईल.

3) बोलण्यासोबत ऐकण्याची देखील सवय हवी-

आपल्याला जर आपल्या संभाषण कौशल्यात वाढ घडवून आणायची असेल तर समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे हे आपणास नीट व्यवस्थित ऐकून समजून घेता यायला हवे.

जर आपणास आपले संभाषण कौशल्य उत्तम करायचे असेल तर याकरीता आपल्याला समोरच्याचे बोलणे ऐकून घेणे आवश्यक आहे.बोलण्यासोबत ऐकण्याची सवय बाळगणे देखील गरजेचे आहे.

कारण एखादी गोष्ट ऐकून समजुन घेऊन जर आपण बोललो तर आपल्या बोलण्यात तथ्य राहत असते अणि अशा वेळी समोरचा देखील आपले बोलणे ऐकून घेत असतो.आपल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत नाही.

4) ऐकण्याची रूची वाढवावी –

आपण इतरांचे बोलणे तेव्हाच नीट व्यवस्थित उत्तमरीत्या शांतपणे ऐकुन घेत असतो जेव्हा आपल्याला त्यांचे बोलणे ऐकून घेण्यात विशेष रूची आवड असते.

म्हणुन आपण आपली ऐकुन घेण्याची रुची वाढवायला हवी याने आपणास समोरच्या व्यक्तीला काय म्हणायचे आहे हे व्यवस्थितपणे ऐकून समजुन घेता येईल अणि त्यावर योग्य ते प्रत्यूत्तर देखील देता येईल.

See also  फ्रेंडशिप डे विषयी माहीती, महत्व व इतिहास - Friendship day information in Marathi

जेव्हा आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे हे ऐकण्यात रूची असते तेव्हा आपण पुर्ण लक्षपूर्वक त्याचे सर्व बोलणे ऐकून घेत असतो.याने दोन व्यक्तींमध्ये उत्तमरीत्या संवाद साधला जातो.

5) शिकण्याची वृत्ती असायला हवी –

जेव्हा आपण कुठल्याही व्यक्तीला भेटतो तो आपल्यापेक्षा लहान असो किंवा मोठा, श्रीमंत असो किंवा गरीब, स्त्री असो किंवा पुरुष, शिक्षित असो किंवा अशिक्षित त्या व्यक्तीचे बोलणे एकदम शांतपणे पुर्णपणे रूची दाखवून ऐकण्यासाठी आपल्यामध्ये शिकण्याची वृत्ती learning attitude असायला हवी.

6) समोरच्या व्यक्तीचे बोलणे आतुन फिल करता आले पाहिजे –

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला त्याच्या एखाद्या समस्ये विषयी सांगत असतो.तेव्हा त्याची समस्या अडचण दुख भावना आपल्याला सहदयी होऊन आतुन फिल करता आल्या पाहिजे.

त्याशिवाय आपण त्याच्याशी योग्य पद्धतीने कनेक्ट करू शकणार नाही.त्याची समस्या जाणुन घेऊन त्याच्याशी उत्तमरीत्या संवाद साधु शकणार नाही.