खलिस्तान चळवळ म्हणजे काय?Khalistan Movement Meaning In Marathi
खलिस्तान चळवळ म्हणजे काय?
1970 तसेच 1980 या दशकामध्ये पंजाब राज्यामध्ये शीख समुदायाचे एक स्वतंत्र राष्ट्र उभारले जावे या मागणीकरीता एक चळवळ सुरू करण्यात आली होती.
खलिस्तान म्हणजे खालसाची भुमी असा अर्थ होतो शिखांच्या या काल्पनिक देशाचे नाव हे पंजाबी भाषेतील खालसा ह्या शब्दावरून ठेवण्यात आले होते.पण शीख समुदायाच्या ह्या मागणीने दहशतवाद आणि हिंसाचाराचे स्वरूप धारण करण्यास सुरुवात केली होती.
हया चळवळीने भारत देशाशी एक प्रकारे जणु युदधच पुकारले होते.भारताच्या तेव्हाच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी पंजाबचे मुख्यमंत्री बेअंत सिंग,जनरल अरूण श्रीधर वैद्य भारतातील अशा अनेक प्रमुख व्यक्तींचा ह्या चळवळीमुळे बळी गेला होता.
मग पुढे जाऊन 1986 ते 1987 दरम्यान पंजाब पोलिस यांनी ह्या खलिस्तानची मागणी करणारया खलिस्तानी दहशतवादी संघटना विरूद्ध कारवाई करावयास सुरुवात केली होती.
ज्यामुळे संबंधित चळवळीला अणि ह्या चळवळीच्या दहशतीला आळा बसला होता.तेव्हापासुन ही चळवळ कॅनडा युके मध्ये राहत असलेल्या शीख समुदाय अणि सांस्कृतिक चळवळ यापुरता मर्यादित ठेवण्यात आली आहे.
आपल्या भारत देशात ह्या खलिस्तानी चळवळीचे इतके भयंकर रौद्र उग्र रूप पाहीले गेल्यानंतर संपूर्ण जगभरात ह्या चळवळीवर बंदी घालण्यात आली होती.
खलिस्तान चळवळ इतिहास –
जेव्हा आपल्या भारत देशाची 1947 मध्ये इंग्रजांकडुन फाळणी केली गेली होती तेव्हा स्वतंत्र पाकिस्तान निर्माण करण्यात आले होते.
नुकतेच पाकिस्तान देशाची निर्मिती झाली होती म्हणून स्वतंत्र राज्याची मागणी करायची हीच उत्तम अणि अतिशय योग्य वेळ आहे असे पंजाब मधील नेत्यांना देखील वाटले.
त्यामुळे ही मागणी अधिक जोर धरू लागली व काही शीख समुदायातील लोकांनी खलिस्तान ह्या नावाने एक स्वतंत्र पंजाब राज्य देखील निर्माण करण्यात आले पाहीजे अशी मागणी करावयास सुरुवात केली.भाषिक आधारावर ही मागणी केली जात होती.
शीख समुदायातील लोकांची देखील भारत अणि पाकिस्तान प्रमाणे स्वताची एक स्वतंत्र मातृभुमी मायभुमी असायला हवी या हेतुने शीख समुदायातील खलिस्तानी दहशतवादी संघटनेतील लोकांकडुन ही मागणी केली जात होती.
याकरीता जे आंदोलन करण्यात आले त्याला पंजाबी सुबा असे म्हणतात.हे आंदोलन हिंसक वळणाला पोहोचले होते ज्यात कित्येक जणांचा बळी देखील गेला होता.
खलिस्तानाची मागणी पुढे येण्याची संशोधकांनी सांगितलेले इतर कारणे –
इतिहास संशोधकांकडुन असे म्हणतात की खलिस्तान आंदोलनाची मुळ ही भारत स्वतंत्र झाल्यानंतर करण्यात आलेल्या स्वतंत्र पाकिस्तान निर्मिती मध्ये दडलेली आहेत.
स्वतंत्र पाकिस्तान देशाची निर्मिती करताना पंजाब मधील काही महत्वाचा भाग हा पाकिस्तानच्या हद्दीत निघुन गेला होता.
अणि जो भाग पाकिस्तान देशाच्या हद्दीत गेला त्या भागावर पंजाब मधील लोकांच्या वाडवडिलांच्या त्यांच्या पुर्वजांनी त्यांच्यासाठी ठेवून गेलेल्या जमीनी होत्या.
आपल्या पुर्वजांच्या वाडवडिलांनी आपल्यासाठी ठेवून गेलेल्या जमिनी असलेला भाग पाकिस्तान देशात गेल्यामुळे काही शिखांनी पाकिस्तान देशातच वास्तव करायचे ठरवले.
ज्यामुळे अर्धा शीख समुदाय पाकिस्तान देशात गेला अणि अर्धा भारतात राहीला ज्यामुळे शीख बांधवांची ताटातुट झाली.
हया फाळणीचे तत्व पंजाब मधील शीख लोकांना अजिबात पटले नव्हते म्हणून मग त्यांनी क्रोध असंतोष अणि नाराजीमध्ये स्वतंत्र खलिस्तान निर्मितीची मागणी करण्यास सुरुवात केली.