महाराष्ट्र रोजगार हमी योजना २०२३ विषयी माहिती – Maharashtra Rojgar Hami Yojana 2023
महाराष्ट्र रोजगार हमी काय आहे?
महाराष्ट्र रोजगार हमी ही एक योजना आहे जीची सुरुवात महाराष्ट्र सरकारकडुन ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या बेरोजगार नागरीकांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी करण्यात आली आहे.
१९७७ मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात राहणारया बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी हा रोजगार कायदा जारी केला होता.
ह्या रोजगार कायद्या मध्ये बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी दोन योजना समाविष्ट करण्यात आल्या होत्या.ज्यात महाराष्ट्र रोजगार योजना देखील समाविष्ट होती.
महाराष्ट्र सरकार कडुन सुरू करण्यात आलेली ही रोजगार योजना पुढे जाऊन २००८ मध्ये केंद्र सरकारने देखील संपूर्ण देशभरात राबविली होती.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे स्वरूप –
महाराष्ट्र रोजगार योजना हया योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व बेरोजगार नागरीकांना एका वर्षाच्या कालावधीत किमान शंभर दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कमाईचे कुठलेही साधन स्रोत उपलब्ध नाहीये अशा बेरोजगार नागरीकांना ही योजना त्यांचा स्वताचा एक हक्काचा रोजगार प्राप्त करून देण्यासाठी फार लाभदायक ठरणार आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत सर्व बेरोजगार नागरीकांना आपापल्या कला कौशल्यानुसार शारीरिक श्रम असलेला रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना अंतर्गत नागरीकांना उपलब्ध करून दिले जात असलेले रोजगार पुढीलप्रमाणे आहेत –
● वृक्ष लावणे
● अधिकारी वर्गाच्या मुलांची काळजी घेणे
● आपापल्या कामात व्यस्त असलेल्या इतर लोकांना पिण्याचे पाणी देणे
● विहीर खोदणे
● इमारतीच्या बांधकामासाठी साहित्य निर्मिती करणे
● सामान वाहणे तसेच दगड वाहणे
● रस्त्यावर असलेल्या नाले गटार यांची सफाई करणे
● तलाव स्वच्छ करणे
● सिंचनासाठी खोदकाम करणे
महाराष्ट्र रोजगार योजना कधी सुरू करण्यात आली होती?
महाराष्ट्र रोजगार योजना २००५ मध्ये सुरू करण्यात आली होती.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना राबविण्यामागचा सरकारचा प्रमुख हेतू काय आहे?
जेवढेही ग्रामीण भागात वास्तव्यास असलेले बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगाराची प्राप्ती व्हावी त्यांना आपल्या दैनंदिन जीवनातील गरजांची पूर्ती करता यावी
ह्याच हेतुने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र रोजगार हमी योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा लाभ कोणकोण घेऊ शकते?
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच खेडी भागात वास्तव्यास असणारे जेवढेही बेरोजगार नागरीक आहेत ते ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
फक्त ह्या रोजगार हमी योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी नागरिकांची शारीरिक श्रम मेहनत करण्याची तयारी असायला हवी.
म्हणजेच ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी नागरीकांनी शारीरिक मेहनत करण्यासाठी शारीरीक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची आॅफिशिअल वेबसाईट कोणती आहे?
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची आॅफिशिअल वेबसाईट mahaonline.gov.in ही आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे फायदे कोणकोणते आहेत?
● महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व बेरोजगार नागरीकांना आपापल्या कला कौशल्यानुसार शारीरिक क्षमतेनुसार रोजगार प्राप्त होणार आहे.
● महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमुळे ग्रामीण भागातील बेरोजगारीचे प्रमाण कमी होणार आहे.कारण ह्या योजनेअंतर्गत सर्व बेरोजगारांना किमान शंभर दिवसांचा रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.
● ज्यांच्याकडे रोजगाराचे कमाईचे कुठलेही साधन नाही अशा व्यक्तींना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे.
● महाराष्ट्र रोजगार हमी योजना मध्ये महिलांना देखील समाविष्ट करण्यात आले आहे.म्हणजेच बेरोजगार महिला देखील ह्या योजनेचा लाभ प्राप्त करू शकतात.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या ठेवण्यात आल्या आहेत?
● महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा लाभ असेच व्यक्ती घेऊ शकतात जे ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत.अणि ज्यांच्याकडे कुठलाही रोजगार नाहीये.
● योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील मुळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
● योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारया व्यक्तीचे वय १८ पेक्षा कमी नसावे.तसेच त्याची बारावी उत्तीर्ण असायला हवी
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?
● अर्जदाराचे आधार कार्ड
● महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे प्रमाण
● अर्जदाराच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचे प्रमाण
● अर्जदाराचा जातीचा दाखला
● अर्जदाराचे बँक खाते पासबुक
● अर्जदाराचे ड्रायव्हिंग लायसन्
● अर्जदाराचे मतदार कार्ड
● दोन पासपोर्ट साईज फोटो
● संपर्क क्रमांक
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेसाठी आॅनलाईन अर्ज कसा करायचा?
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आपणास सर्वप्रथम योजनेच्या आॅफिशिअल वेबसाईट mahaonline.gov.in वर जावे लागेल.
मग महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या आॅफिशिअल वेबसाईटच्या होम पेज वर जाऊन रजिस्ट्रेशन आॅप्शन वर क्लिक करायचे.
यानंतर आपल्यासमोर एक रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल रजिस्ट्रेशन फाॅममध्ये आपली विचारलेली सर्व महत्वाची माहीती भरायची आहे.
उदा आपले नाव,गाव,राज्य,तालुका,जिल्हा,पिन कोड नंबर जेंडर इत्यादी
यानंतर आपला मोबाईल नंबर इंटर करायचा आहे अणि खाली दिलेल्या सेंड ओटीपी आॅप्शन वर क्लिक करायचे आहे.
आपल्या इंटर केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी सेंड केला जातो.
यानंतर आपण आपला युझर आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे.अणि शेवटी तिथे दिलेला कॅपच्या कोड जसाच्या तसा तिथे फिल करायचा आहे.अणि शेवटी रजिस्टर ह्या बटणावर ओके करायचे आहे.