नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय?National quantum mission information in Marathi
नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने नॅशनल क्वांटम मिशनला मान्यता दिली आहे.
आजच्या लेखात आपण ह्याच नॅशनल क्वांटम मिशन विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
नॅशनल क्वांटम मिशन हे क्वांटम कॉम्प्युटर तंत्रज्ञान आणि संबंधित अनुप्रयोगांवरील संशोधनाच्या विकासासाठी 6000 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य प्रदान करणार असल्याचे प्रसारमाध्यमांद्वारे याची माहिती देताना सांगितले जात आहे.
ह्या मिशन अंतर्गत असे क्वांटम कंप्युटर विकसित केले जाणार आहे ज्यांचा वेग हा सध्याच्या वर्तमानातील बाजारात उपलब्ध असलेल्या कंप्युटर पेक्षा अधिक असणार आहे.
बाजारात येत असलेल्या ह्या क्वांटम कंप्युटर मुळे युझरचा डेटा अणि नेटवर्क आधीपेक्षा अधिक प्रमाणात सुरक्षित होईल असे म्हटले जाते आहे.
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये ह्या मिशनकरीता आवश्यक असलेले बजेट म्हणजेच आर्थिक निधी देखील जमा करून ठेवला आहे.
ह्या नॅशनल क्वांटम मिशन अभियानांतर्गत पुढील तीन वर्षांत 20-50 क्युबिटचे क्वांटम कंप्युटर विकसित केले जातील
50-100 क्युबिटचे पाच वर्षांत आणि 100-1000 क्युबिटचे क्वॉंटम संगणक आठ वर्षांत विकसित केले जाणार आहे.
क्युबिट हे एक एकक आहे.जे क्वांटम कंप्युटरची क्षमता दर्शवण्यासाठी वापरण्यात येते.याचे पुर्ण रूप क्वांटम बीटस असे होते.
याशिवाय,या मोहिमेअंतर्गत आपल्या भारत देशातील हद्दीत सुमारे दोन हजार किलोमीटर परिसरामध्ये उपग्रह-आधारित सुरक्षित क्वांटम कम्युनिकेशन विकसित केले जाईल.
याशिवाय,हे मिशन नेव्हिगेशन,अणुप्रणालीचे प्रसारण आणि अणु घड्याळांमध्ये अचूक वेळेसाठी उच्च-संवेदनशीलता मॅक्रोटोमीटर विकसित करण्यात मदत करेल.
सध्या संपूर्ण जगभरात भारत देश सहित अजुन पाच असे देश आहेत जे ह्या क्वांटम टेक्नॉलॉजी वर संशोधन करण्याचे काम करत आहे.हे पाच देश फिनलंॅड,चीन,फ्रांस, आॅस्ट्रेलिया,युएस,असे आहेत.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत चालवल्या जाणार्या हया मिशनला मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रशासकीय मंडळ आणि मिशन सचिवालयाची स्थापणा देखील करण्यात आली आहे.