ओटी म्हणजे काय?त्याचा फुलफाँर्म काय होतो(Ot full form and its meaning in marathi)
मित्रांनो हाँस्पिटलमध्ये जेव्हा आपण उपचारासाठी जात असतो.किंवा एखाद्याची प्रकृती खुप गंभीर असताना त्याला पाहायला हाँस्पिटलमध्ये जात असतो.
तेव्हा आपल्याला हाँस्पिटलमध्ये डाँक्टरांकडुन एक शब्द आवर्जुन ऐकायला मिळत असतो.तो म्हणजे ओटी.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा गंभीर अपघात होत असतो. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असते तेव्हा त्याला उपचारासाठी हाँस्पिटलमध्ये नेल्यावर डाँक्टर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला सर्वप्रथम ओटी मध्ये घेऊन जात असतात.
आपण ओटी हा शब्द तर नेहमी डाँक्टरांच्या तोंडुन ऐकत असतो पण याचा नेमका अर्थ काय होतो हेच आपणास माहीत नसते.
आजच्या लेखात आपण ओटी म्हणजे काय?याचा फुलफाँर्म काय होतो हेच सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
याचसोबत हाँस्पिटलमध्ये,मेडिकल क्षेत्रात वापरल्या जात असलेल्या ओटी ह्या शब्दाचे अजुन कोणकोणते अर्थ होतात त्याचे फुलफाँर्म काय होतात हे देखील आपण ह्या लेखातुनच जाणुन घेणार आहोत.
चला तर मित्रांनो अधिक वेळ वाया न घालविता आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे वळुया.
ओटीचा हाँस्पिटलमध्ये फुलफाँर्म काय होतो(Ot full form hospital in marathi)
ओटीचा हाँस्पिटलमध्ये फुल फाँर्म occupational therapy असा होतो.
ओटीचा मेडिकलमध्ये फुलफाँर्म काय होतो(Ot full form medical in marathi)
तर मेडिकलमध्ये याचा अजुन फुल फाँर्म होतो तो म्हणजे शस्त्रक्रिया कक्ष(operation theatre).
व्यवसायिक थेरपी म्हणजे काय?(occupational therapy(OT) meaning in marathi)
आँक्युपेशनल थेरपीला आपण व्यावसायिक चिकित्सा असे देखील संबोधित असतो.ही सुदधा एक उपचाराचीच एक विशिष्ट पदधत असते.ह्या थेरपीचा पँरामेडिकलशी विशेष संबंध असतो
ज्यात कुठल्याही गंभीर रूग्णावर मग तो तरूण,वृदध,किंवा एखादे लहान बालक असो या सगळयांवर उपचार केले जात असतात.
इथे कुठल्याही रूग्णावर उपचार करण्यासाठी एक्सरसाईज,डाएट तसेच इतर माध्यमांचा वापर केला जात असतो.
व्यावसायिक थेरपी(occupational therapy) ही कोणाला दिली जात असते?
व्यावसायिक थेरपी कोणाला दिली जाते ह्या आपल्या प्रश्नाचे उत्तर ह्या नावातच दडलेले आहे.
जसे की ह्या थेरपीचे म्हणजेच उपचार पदधतीचे नावच व्यावसायिक उपचार पदधती असे आहे.यावरून आपल्या हे लक्षात येते की ही थेरपी अशा व्यक्तींना दिली जात असते.
जे आपले रोजचे दैनंदिन कार्य जसे की उद्योग व्यवसाय एखाद्या शारीरीक तसेच मानसिक समस्येमुळे व्यवस्थित करू शकत नसतात.अशा व्यक्तींवर ह्या थेरपीदवारे उपचार केले जात असतात.
याचसोबत अशी लहान मुले जी आपले रोजचे दैनंदिन कार्य एखाद्या शारीरीक तसेच मानसिक अडचणीमुळे पुर्ण करू शकत नाही ते करण्यास सक्षम नसतात.
उदा, रोज शाळेतील अभ्यास करणे,खेळणे,
लहान मुलांना हे रोजचे दैनंदिन कार्य यशस्वीपणे रोज का पार पाडता येत नाही.त्यामागचे कारण काय?हे शोधुन काढण्याचे काम देखील हे आँक्युपेशनल थेरपिस्टच करत असतात.
आँक्युपेशनल थेरपीस्ट बनण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता लागते?
जर आपणास ऑक्युपेशनल थेरपिस्ट बनायचे असेल तर आपण यासाठी आपण पुढील काही कोर्स करू शकतो-
बी एससी इन ऑक्युपेशनल थेरपी
बॅचलर ऑफ ऑक्युपेशन,
डिप्लोमा इन ऑक्युपेशन
वरील दिलेले कोर्स बारावीनंतर आपण करू शकतो फक्त यासाठी आपली शाखा(stream) ही पीसीबी(physics,chemistry,biology) असणे आवश्यक आहे.
ओटी,आँपरेशन थिएटर म्हणजे काय?(operation theatre meaning in marathi)
ओटी ही हाँस्पिटलमधील एक अशी जागा तसेच एक खोली असते जिथे रूग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या एखाद्या सीरीअस पेशंटवर,शल्य चिकित्सकांकडुन(सर्जनकडुन) उपचार म्हणजे शस्त्रक्रिया केली जात असते.
जेव्हाही कुठल्याही पेशंटचा मोठा सीरीअस अँक्सीडेंट होत असतो तेव्हा तातडीने त्या पेशंटची सर्जरी करायची असते तेव्हा ती सर्जरी करण्यासाठी डाँक्टर त्याला आँपरेशन थिएटरमध्ये स्ट्रेचरवर झोपवून घेऊन जात असतात.
OT विषयी वारंवार विचारले जाणारे काही अत्यंत महत्वाचे प्रश्न-
1)आँपरेशन थिएटरमधील ओटी असिस्टंटचे प्रमुख काम काय असते?
डाँक्टरने सांगितल्या प्रमाणे हाँस्पिटलमध्ये अँडमिट केलेल्या सर्व पेशंटची देखरेख करणे.त्यांच्याकडे लक्ष ठेवणे.
आँपरेशन थिएटरमध्ये ठेवलेल्या instruments ला डाँक्टरांनी सांगितल्यानुसार चालवणे म्हणजेच आँपरेट करणे हे काम आँपरेशन थिएटरमधील ओटी असिस्टंट करत असतो.