ज्येष्ठ नागरीकांसाठी एक उत्तम योजना दरमहीन्याला मिळणार 18 हजार 500 रूपये इतकी पेंशन | Pradhan Mantri Vay Vandana Yojana In Marathi
आपले भारत सरकार नागरीकांच्या भल्याचा विचार करीत नवनवीन कल्याणकारी योजना राबवित असते.
भारत सरकारने आता ज्येष्ठ नागरीकांसाठी अजुन एक फायदेशीर योजना सुरू केली आहे.जिचे नाव प्रधानमंत्री वयवंदना योजना असे आहे.
प्रधानमंत्री वय वंदना ही योजना सर्व नागरीकांचा गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत विश्वास असलेल्या एल आयसी ह्या कंपनीद्वारे संचलित अणि केंद्र सरकारकडुन चालविली जात असलेली योजना आहे.
26 मे 2020 रोजी केंद्र सरकारकडुन ही योजना नव्याने जाहीर करण्यात आली होती.
प्रधानमंत्री वय वंदना योजना खरेदी करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.म्हणजेच एप्रिल 2023 पासुन आपणास ह्या पेंशन योजना मध्ये सभासदत्व प्राप्त होऊ शकणार नाही.
प्रधानमंत्री वय वंदना योजना ही वयाची साठ वर्षे पुर्ण झालेल्या नागरीकांसाठी सरकारने सुरू केलेली योजना आहे.हया योजनेमध्ये गुंतवणूक करणारया ज्येष्ठ नागरिक वर्गाला एक निश्चित स्वरूपाचे मासिक वेतन प्राप्त होणार आहे.
भारतातील जीवन विमा कंपन्यांची यादी | List of Life Insurance Companies in India In Marathi
प्रधानमंत्री वय वंदना योजना वर ज्येष्ठ नागरीकांना 7.40 टक्के इतके व्याज उपलब्ध करून देण्यात आले आहे.यात गुंतवणूक केलेल्या रक्कम वरील व्याज हे उत्पन्नाच्या आधारावर प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करणारया नागरीकांना मासिक पेंशनचे स्वरूपात दिले जाते.
याचसोबत ह्या योजनेचा लाभ पती पत्नी दोघे एकत्र देखील 60 वय झाल्यानंतर घेऊ शकणार आहेत.
प्रधानमंत्री वय वंदना योजना मध्ये पती अणि पत्नी या दोघांनी मिळून प्रत्येकी 15 लाख रूपये इतकी गुंतवणूक जर केली तर दोघांनी मिळून गुंतवलेल्या एकुण 30 लाख रूपयांवर त्यांना निश्चित व्याज दरानुसार 2,22,000 इतके वार्षिक व्याज उत्पन्न मिळते.
म्हणजेच दोघांना एकत्रितपणे दरमहा 18 हजार 500 रूपये मासिक पेंशन प्राप्त होते.म्हणजे पतीला 9 हजार दोनशे पन्नास रूपये अणि पत्नीला 9 हजार दोनशे पन्नास रूपये प्राप्त होतात.
पण जर ह्या योजनेमध्ये जोडीने गुंतवणूक न करता आपण एकटयानेच 15 लाखाची गुंतवणूक केली तर आपणास वार्षिक 1,11,000 इतक्या रूपयांची गुंतवणूक केल्यावर व्याज उत्पन्नाचा फायदा प्राप्त होईल.
म्हणजे एकाच व्यक्तीने ह्या योजनेत 15 लाखाची गुंतवणूक केली तर त्याला 9 हजार 250 रूपये इतकी मासिक पेंशन प्राप्त होणार आहे.
अणि प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करणारया व्यक्तीस त्याने केलेल्या गुंतवणुकीची रक्कम दहा वर्षे इतक्या कालावधीने त्याला परत देखील केली जात असते.
प्रधानमंत्री वय वंदना योजनेचा पाॅलिसी कालावधी 10 वर्षे इतका ठेवण्यात आला आहे.
देशातील वयोवृद्ध नागरीकांना आर्थिक संरक्षण प्रदान करण्यासाठी ह्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला आहे.
सदर योजनेत जर आपण 15 लाखापर्यंत गुंतवणूक न करता फक्त 1.50 लाख इतकी गुंतवणूक केली तर आपणास दरमहा फक्त 1000 रूपये इतकीच पेंशन दिली जाईल.