गॅस सिलेंडरच्या किंमती आहे तशाच राहणार त्यात कुठलीही वाढ केली जाणार नाही Gas Cylinder price update 2023 in Marathi
महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना अत्यंत दिलासा देणारी बातमी नुकतीच समोर आली आहे.
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या सिलेंडरच्या किंमतीत परिवर्तन घडवुन आणत असतात.
ह्या किमती पेट्रोलियम कंपनीकडून महिन्याच्या सुरुवातीला कधी वाढवल्या जात असतात तर कधी कमी देखील केल्या जात असतात.
पण नुकत्याच हाती आलेल्या एका अपडेट नुसार ह्या नवीन महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नाहीये.आधी जे रेट गॅस सिलेंडरचे होते तेच ठेवण्यात आले आहेत.
म्हणून घरगुती सिलिंडर करीता जे दर आपणास आधी द्यावे लागत होते तेच दर आपणास ह्या महिन्यात देखील द्यावे लागणार आहेत.
याचसोबत अजुन एक महत्वाची बातमी म्हणजे एलपीजी सिलिंडरच्या किंमती देखील पेट्रोलियम कंपन्यांकडुन कमी करण्यात आल्या आहेत.
पेट्रोलियम कंपनीने एलपीजी सिलिंडरच्या दरात ह्या महिन्यात ९१.५० पैशांनी घट केली आहे.मागील महिन्यात पेट्रोलियम कंपनीकडून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत साडे तीनशे रुपये इतकी वाढ करण्यात आली होती.
पण आता ह्या महिन्यात दरामध्ये कपात करण्यात आली आहे.
असे देखील सांगितले जाते आहे की विशेषत ही किंमतीमधील घट व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीमध्ये केली गेली आहे.