राजस्थान मध्ये डाॅक्टरांचे राईट टू हेल्थ बील वरील चालु असलेले आंदोलन घेण्यात आले मागे right to health bill protest called off
नुकतेच एक ताजे अपडेट समोर आले आहे ज्यात असे दिले आहे की राजस्थान मध्ये राईट टू हेल्थ बील विरूद्ध जे आंदोलन डाॅक्टरांकडुन मागील काही महिन्यांपासून केले जात आहे.हे आंदोलन आज राजस्थान राज्यातील डाॅक्टरांनी अखेरीस मागे घेतले आहे.
याबाबत अधिक वृत असे आहे की राजस्थान सरकारने नागरीकांच्या हितासाठी राईट टू हेल्थ बील नावाचे एक बील पास केले होते.
पण ह्या बील मध्ये काही अशा तरतुदी करण्यात आल्या होत्या ज्या राजस्थान मधील डाॅक्टर यांना त्या मान्य नव्हत्या.यामुळे मागील अनेक महिन्यांपासून राजस्थान राज्यातील डाॅक्टर आंदोलन करताना दिसुन येत होते.
पण अखेरीस हे आंदोलन राजस्थान मधील डाॅक्टर यांनी मागे घेतले आहे असे सांगितले जात आहे की शासन अणि डाॅक्टर यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
ज्यामुळे राजस्थान राज्यातील डाॅक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.अखेरीस हा शासन अणि डाॅक्टर यांच्यात सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे.
आता राजस्थान हे भारत देशातील पहिले असे राज्य बनले आहे जिथे हा स्वास्थ अधिकार लागु करण्यात आला आहे.