आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशासाठी उद्या लाॅटरी काढली जाणार – RTE admission Lottery tomorrow

आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशासाठी उद्या लाॅटरी काढली जाणार

जे पालक तसेच विद्यार्थी शिक्षण हक्क कायदा २५ टक्के अंतर्गत शाळेत मोफत प्रवेशासाठी लाॅटरी निघण्याची आतुरतेने वाट बघत होते,कधी लाॅटरी लागणार याविषयी
त्यांच्या मनात उत्सुकता लागलेली होती. – RTE admission Lottery tomorrow

अशा सर्व जणांची उत्सुकता संपुष्टात येणार आहे कारण उद्या म्हणजेच बुधवारी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत मोफत प्रवेश प्राप्त करण्यासाठी लाॅटरी काढली जाणार आहे.

- RTE Lottery result date in Marathi
RTE admission Lottery tomorrow

ही लाॅटरी बुधवारी ५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता काढली जाणार आहे.जे पालक आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी लाॅटरी निघण्याची आतुरतेने वाट बघत होते त्यांना आता लवकरच निकाल हाती लागणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांना सोडतीत प्रवेश प्राप्त होईल त्यांना आपल्या प्रवेश अर्जातील रेजिस्टर केलेल्या मोबाईल नंबर वर एक मेसेज पाठविला जाणार आहे.

किंवा पालकवर्ग आरटीई पोर्टलवर जाऊन सुदधा लाॅग इन मध्ये जाऊन आपल्या बालकाला कुठल्या‌ शाळेत प्राप्त झाला आहे याचा तपशील बघु शकणार आहे.

See also  Bihar Board 10th Result 2023 link | बिहार बोर्ड १० वी निकाल २०२३ वेळ आणि तारीख