संजय गांधी निराधार पेंशन योजना – Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana
संजय गांधी निराधार पेंशन योजना काय आहे?
ही एक शासनाने सुरू केलेली योजना आहे जी मुख्यत्वे निराधारांना गरजवंतांना आर्थिक मदत प्राप्त करून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत कुणाला आर्थिक साहाय्य केलं जाते?
संजय गांधी निराधार पेंशन ह्या योजने अंतर्गत राज्यातील जेवढेही निराधार व्यक्ती आहेत.जसे की वृदध लोक,मानसिक अणि शारीरीक आजाराने पीडीत व्यक्ती,विधवा तसेच घटस्फोटित स्त्रिया,अंध अपंग अनाथ मुले यांना आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते.
संजय गांधी निराधार पेंशन योजना कधीपासुन राबविली जात आहे?
संजय गांधी निराधार पेंशन योजना ही योजना निराधारांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्याच्या हेतुने 1980 पासून राबविण्यात येत आहे.
संजय गांधी निराधार पेंशन योजना का राबविली जात आहे?
संजय गांधी निराधार ही एक पेंशन योजना आहे जी राज्यातील सर्व गरीब अनाथ,निराधार महिला,पुरूष,मुले अणि विकारग्रस्तांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी राबविली जात आहे.
ह्या योजनेच्या माध्यमातुन गरीब निराधारांना शासनाकडुन महिन्याला पेंशन दिले जाणार आहे.जेणेकरून त्यांना थोडेफार आर्थिक साहाय्य प्राप्त होईल.त्यांचे जीवन अधिक सुखद अणि सुरळीत होईल.
सरकारकडुन दिल्या जात असलेल्या ह्या मासिक पेंशनमुळे राज्यातील जेवढेही गरीब निराधार अपंग व्यक्ति आहेत त्यांना आपल्या मुख्य जीवनावश्यक गरजा पुर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळ प्राप्त होणार आहे.
संजय गांधी निराधार पेंशन योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे?
संजय गांधी निराधार पेंशन योजना ह्या योजनेचा लाभ पुढील व्यक्ती घेऊ शकणार आहे-
● विधवा महिला यात शेकरयांच्या विधवा महिला देखील समाविष्ट होतात.
● घटस्फोट फारकती घेतलेल्या महिला
● अंध अपंग मुले
● वृदध पुरूष महिला
● शारीरीक अणि मानसिक आजाराने पीडीत व्यक्ती
● ६५ वर्षाच्या खालचे पुरूष तसेच महिला
● निराधार अनाथ पुरुष मुले तसेच महिला
● असे पुरुष तसेच महिला ज्यांना कुष्ठरोग कर्करोग क्षयरोग तसेच एच आयव्ही एडस असे भयंकर आजाराने ग्रासलेले आहे.
● पीडीत अत्याचारीत स्त्रिया
● तृतीयपंथीय लोक
● देवदासी महिला
● अशा गरीब निराधार महिला ज्यांचे पती तुरूंगात शिक्षा भोगत आहे.
● वेश्या व्यवसाय मुक्त स्त्रिया
संजय गांधी निराधार पेंशन योजना अंतर्गत किती आर्थिक साहाय्य प्रदान केले जाते?
संजय गांधी निराधार पेंशन योजना अंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थी व्यक्तीला म्हणजेच सर्व गरीब,अनाथ अंध अपंग तसेच निराधारांना दर महिन्याला ६०० ते ७०० रूपये आर्थिक मदत म्हणुन दिले जात असतात.
जर एका लाभार्थी व्यक्तीच्या परिवारात संजय गांधी निराधार पेंशन योजनेचे अनेक लाभार्थी पात्र व्यक्ती उमेदवार,अर्जदार असतील तर अशा वेळी त्या संपुर्ण कुटुंबाला शासनाकडुन ९०० ते १००० रूपये दर महा दिले जात असतात.
संजय गांधी निराधार पेंशनयोजनेच्या पात्रतेच्या अटी अणि नियम काय आहेत?
● योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारा व्यक्ती किमान १० ते १५ वर्ष जुना महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असायला हवा.
● अर्जदाराचे वय हे ६५ पेक्षा अधिक असु नये.
● योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणारया अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २१ हजार पेक्षा जास्त नसावे.
संजय गांधी निराधार पेंशन योजनेचा कोणते महत्वाचे डाँक्युमेंट लागतील?
संजय गांधी निराधार पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते महत्वाचे डाँक्युमेंट लागतील?
संजय गांधी निराधार पेंशनयोजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे पुढील कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे.
● अर्जदार अपंग असल्यास आपण अपंग असल्याचे सर्टिफिकिट त्याने जोडावे
● अर्जदार महाराष्टाचा रहिवासी आहे याचे प्रमाण देणारे सर्टीफिकेट
● अर्जदाराचे वय प्रमाणपत्र
● बीपीएल सर्टिफिकेट
● कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखवणारे इन्कम सर्टिफिकेट
● अर्जदाराच्या कुटुंबाचे नाव हे दारिद्रय रेषेच्या खाली येत असलेल्या कुटुंबाच्या यादीत येते याचा पुरावा
● अर्जदाराला एखादा गंभीर आजार झाला असेल डाँक्टरांकडुन देण्यात आलेले मेडिकल तसेच फिटनेस सर्टिफिकेट त्याला सादर करावे लागेल.
संजय गांधी निराधार पेंशन योजनेचा अर्ज कुठे अणि कसा करायचा?
संजय गांधी निराधार पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?
● सर्वप्रथम अर्जदाराने योजनेचा फाँर्म आँनलाईन डाउनलोड करून योजनेसाठी अर्ज करायचा आहे यासाठी अर्जाचा फाँर्म न चुकता व्यवस्थित भरून घ्यायचा.त्यात विचारलेली सर्व माहीती योग्य रीत्या अचुक भरून त्याची प्रिंट काढायची फाँर्मला आवश्यक ती कागदपत्रे देखील जोडुन घ्यायची.
● योजनेचा अर्ज भरून झाल्यानंतर तो तहसिल कार्यालयात जाऊन तहसिलदारांकडे जमा करायचा आहे.
● यानंतर मग लाभार्थी व्यक्तींची यादी घोषित केली जाते.
● आपले नाव ह्या योजनेच्या लाभार्थीत आल्यास आपणास पेंशन दिले जाईल.ही पेंशनची रक्कम तहसिलदारांच्या हस्ते वितरीत केली जात असते.
अर्जाविषयी अधिक सविस्तरपणे माहीती प्राप्त करण्यासाठी आपण समाज कल्याण विभागातील अधिकारी वर्गाला भेट देऊ शकतो.किंवा तलाठी तसेच कार्यालयाशी संपर्क साधू शकतो.
संजय गांधी निराधार पेंशन योजनेची आँफिशिअल वेबसाइट कोणती आहे?
संजय गांधी निराधार पेंशन योजनेची आँफिशिअल वेबसाइटhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/ ही आहे.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास कोणत्या पदधतीने अर्ज करता येईल?
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास आँनलाईन तसेच आँफलाईन या दोघे पदधतीने अर्ज करता येईल.
संजय गांधी निराधार पेंशन योजनेसाठी आँनलाईन पदधतीने अर्ज कसा करतात?
संजय गांधी निराधार पेंशन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास योजनेची आँफिशिअल वेबसाइटhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/ वर जायचे आहे.
अणि योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाचे रेजिस्ट्रेशन करायचे आहे.अणि योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
संजय गांधी निराधार पेंशन योजनेसाठी केलेल्या अर्जाचे स्टेटस आँनलाईन कसे चेक करायचे?
संजय गांधी निराधार पेंशन योजनाचा लाभ घेण्यासाठी आपण भरलेल्या फाँर्मचे स्टेटस चेक करायला आपल्याला योजनेच्या आँफिशिअल साईटवर जावे लागेल.
होम पेजवर उजव्या बाजुला आपल्याला track your application status आँप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे.
यानंतर आपल्यासमोर अजुन एक नवीन पेज ओपन होईल तिथे आपणास आपल्या योजनेचे नाव अणि माहीती भरायची आहे.खाली विचारलेला अँप्लीकेशन नंबर टाकायचा आहे.अणि गो बटणावर क्लिक करायचे
आपल्याला आपल्या फाँर्मचे स्टेटस लगेच स्क्रीनवर दिसुन जाईल.