SSC Gd Result 2023 in Marathi
कर्मचारीं निवड आयोगाच्या वतीने नुकताच एस एससी जीडी काॅन्स्टेबल पदासाठी घेतल्या गेलेल्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.
काल ८ एप्रिल २०२३ रोजी हा निकाल ऑनलाईन पदधतीने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.
जे उमेदवार एस एससी जीडी काॅन्स्टेबल रायफलमॅन इत्यादी पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा देत असलेले पन्नास हजार एकशे सत्तेशी उमेदवार SSC.nic.in ह्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन आपला निकाल बघु शकतात.
कर्मचारीं निवड आयोगाने जीडी काॅन्स्टेबल भरती परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांच्या एकुण चार लिस्ट प्रसिद्ध केल्या आहेत.
ह्या सर्व यादीत नाव समाविष्ट असलेल्या उमेदवारांना पीईटी/पीएसटी मध्ये समाविष्ट होण्याची संधी प्राप्त होणार आहे.
ह्या निकाला सोबत कर्मचारी निवड आयोगाने जीडी काॅन्स्टेबलच्या सर्व पदांकरीता कट आॅफ मार्कसची लिस्ट देखील जाहीर केली आहे.
एस एससी जीडी काॅन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी फिजिकल इफिशिअनसी टेस्ट ही १५ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे असे देखील इथे सांगितले गेले आहे.
एस एससी जीडी काॅन्स्टेबल लेखी परीक्षेचा निकाल कुठे अणि कसा बघायचा?
सर्वप्रथम आपणास ssc.nic.in ह्या वेबसाईटवर जायचे आहे वेबसाईटवर गेल्यावर आपणास होम पेज वर दिलेल्या रिझल्ट टॅब वर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपणास एस एससी जीडी काॅन्स्टेबल रिझल्ट २०२३ ह्या लिंकवर क्लिक करायचे आहे.
सर्व उमेदवारांना आपले नाव अणि रोल नंबर टाकुन आपला रिझल्ट पीडीएफ फाईल लिस्ट मधुन शोधायचा आहे.
एस एससी जीडी काॅन्स्टेबल २०२३ ची मेरीट लिस्ट डाऊनलोड करून घ्यायची आहे.
भविष्यात भरती प्रक्रिया दरम्यान ह्या रिझल्टची प्रिंट आवश्यक असल्याने सर्व उमेदवारांनी आपापल्या निकालाची प्रिंट आऊट काढुन घ्यायची आहे.
SSC Gd Result 2023 in Marathi