सुधीर नाईक कोण होते? -Sudhir Naik
भारतीय क्रिकेट संघाकडुन खेळणारे भारताचे माजी सलामीवीर फलंदाज तसेच मुंबईचे हिरो म्हणुन ओळखले जाणारया सुधीर नाईक यांचे काल ५ एप्रिल रोजी निधन झाले आहे.
असे सांगितले जात आहे की वृद्धापकाळाने तसेच काही आजारपणामुळे सुधीर नाईक यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले आहे.
सुधीर नाईक यांच्या निधनाबद्दल संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ तसेच बीसीसीआयकडून दुख व्यक्त केले जात आहे.
सुधीर नाईक
सुधीर नाईक यांचे संपुर्ण नाव सुधीर सखाराम नाईक असे आहे.सुधीर नाईक यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४५ मध्ये मुंबई शहरात बाॅम्बे प्रेसेडिंसी मध्ये झाला होता.
सुधीर नाईक यांनी भारतीय क्रिकेट टीमसाठी एकदिवसीय सामन्यात पहिला चौकार लगावला होता त्यांच्या ह्या विक्रमामुळे देखील सुधीर नाईक यांना ओळखले जाते.
सुधीर नाईक यांनी आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाकरीता दोन वन डे मॅच अणि तीन टेस्ट मॅच खेळल्या आहेत.यात त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व देखील केले होते.
सुधीर नाईक यांनी १९७४ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात दुसरया डावामध्ये एकुण ७७ रण केले होते.
सुधीर नाईक यांनी आपला शेवटचा कसोटी सामना हा १९७५ मध्ये वेस्ट इंडीज संघाविरुद्ध ईडन गार्डन ह्या पीचवर खेळला होता.सुधीर नाईक हे मुंबईचे माजी कर्णधार म्हणून ओळखले जातात.
भारतीय क्रिकेट संघाने १९७४ मध्ये आपली पहिले वन डे मॅच इंग्लंड ह्या टीमविरूदध खेळली होती.हया सामन्यात सुधीर नाईक यांनी सुनिल गावसकर यांच्या समवेत भारताच्या डावास आरंभ केला होता.
ह्याच डावात भारतीय क्रिकेट संघाकडुन पहिला चौकार मारण्याचा विक्रम देखील सुधीर नाईक यांनी नोंदविला होता.
सुधीर नाईक यांची क्रिकेट मधील कामगिरी –
सुधीर नाईक यांनी आतापर्यंत तीन टेस्ट मॅच खेळल्या ज्यात त्यांनी ६ डावांमध्ये अर्धशतक लगावत १४१ धावा केल्या होत्या.त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ही ७८ रण ही होती.
सुधीर नाईक यांनी दोन एकदिवसीय सामने खेळले ज्यात त्यांनी ३८ रण केले.यात त्यांची सर्वोत्तम धावसंख्या २० ही होती.
सुधीर नाईक यांनी यांनी पाच अ श्रेणी सामन्यात ८० धावा देखील केल्या होत्या.याचसोबत सुधीर नाईक यांनी ८५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २७ अर्धशतक अणि ७ शतके लगावत ४३७५ धावा केल्या होत्या.
याचसोबत सुधीर नाईक यांना रणजी ट्रॉफी विजेता कर्णधार म्हणून ओळखले जाते.कारण त्यांच्या कर्णधार पदामध्ये मुंबई क्रिकेट संघाने रणजी ट्रॉफी पटकावण्यात यश मिळविले होते.
अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे तेव्हा मुंबई संघात सुनील गावस्कर,अजित वाडेकर,दिलीप सरदेसाई यांसारखे कुठलेही दिग्दज खेळाडु तेव्हा संघात नव्हते.तरी देखील हा विक्रम मुंबईने नोंदवला होता अणि हे सर्व सुधीर नाईक यांच्या नेतृत्वाखाली शक्य झाले होते.