तलाठी भरती ४१२२जागांसाठी अर्ज करणे सुरू- Talathi bharti 2023 in Marathi

तलाठी भरती ४१२२जागांसाठी अर्ज करणे सुरू- Talathi bharti 2023 in Marathi


जे उमेदवार आतुरतेने तलाठी भरतीची वाढ बघत होते त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे.

२०२३ मध्ये एकुण ४ हजार १२२ तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे.हया भरतीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या वतीने मान्यता सुदधा देण्यात आली आहे.

या भरतीसाठी लवकरच नोंदणी प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे.या भरतीच्या राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी श्रीकांत मोहीते यांनी २९ नोव्हेंबर रोजी एक स्वतंत्र पत्र काढले होते.

यात तलाठी संवर्गामधील रिक्त होणारी ३१ डिसेंबर २०२२ तारखेची पदे १०१२ जागा अणि नवीनतम तयार केलेले ३११० पद असे एकुण ४ हजार १२२ पदांची भरती करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.

राज्यामधल्या विभागानुसार रिक्त पदांची माहीती प्राप्त करून त्यातील एम पी एससी अंतर्गत भरल्या जात असलेल्या पदांकरीता जानेवारी महिन्यात जाहीरात काढली जाणार आहे.

अणि ही सर्व पद भरली जाण्याची प्रक्रिया आयोगाच्या वतीने केली जाणार आहे.म्हणून याविषयी आयोगाकडे माहीती पाठविली जावी असा आदेश देखील काढण्यात आला आहे.

तलाठी किती पदांसाठी भरती होत आहे?

तलाठी संवर्गामधील एकुण ४ हजार १२२ पदांसाठी तलाठी भरती करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या विभागात किती पदे भरली जातील?

  • पुणे -७४६ जागा
  • नाशिक -१०३५ जागा
  • औरंगाबाद -८७४ जागा
  • नागपुर -५८० जागा
  • कोकण -७३१ जागा
  • अमरावती -१८३ जागा
See also  ICSIL Recruitment 2023 : डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती

निवड झालेल्या उमेदवारांना वेतन किती मिळणार आहे?

निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना सुरूवातीला पाच हजार दोनशे रुपये इतके वेतन दिले जाईल अणि हे वेतन पुढे २० हजार दोनशे रुपये महिना इतके करण्यात येईल.

तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेच्या अणि वयोमर्यादा विषयी अटी –

● सर्व उमेदवारांचे आपापल्या पदानुसार मान्यता प्राप्त बोर्ड तसेच विद्यापीठातुन किमान बारावी अणि पदवीचे शिक्षण झालेले असणे गरजेचे आहे.

● उमेदवारांला मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांचे उत्तम नाॅलेज असायला हवे.

● भरतीसाठी अर्ज करत असलेल्या उमेदवाराचे वय किमान अठरा अणि कमाल ३८ च्या आत असणे गरजेचे आहे.जे उमेदवार एस सी,एस टी, ओबीसी पीडबलयु डी ह्या कॅटॅगरी मधील आहेत त्यांना वयात काही विशेष सुट देण्यात आली आहे.

तलाठी भरतीसाठी लागणारी काही महत्वाची कागदपत्रे –

● दहावी बारावीचे मार्कशीट तसेच बोर्डाचे सर्टिफिकेट

● पदवीचे म्हणजेच ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट

● पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट

● शाळा सोडल्याचा दाखला (दहावी बारावी तसेच पदवी)

● वय अधिवास प्रमाणपत्र

● जात प्रमाणपत्र

● नाॅन क्रिमिलिअर

● जात पडताळणी प्रमाणपत्र

● ईडबलयु एस सर्टिफिकेट

● नॅशनॅलिटी सर्टिफिकेट

● आधार कार्ड

● लायसन

● दोन पासपोर्ट साईज फोटो

तलाठी भरतीसाठी अर्ज कोठे अणि कसा करायचा आहे?

सर्व इच्छुक उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज हा आॅनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रिंट काढुन घ्यायची आहे अणि मुलाखतीच्या दिवशी ती प्रिंट सोबत घेऊन जायची आहे.

भरतीसाठी आॅनलाईन अर्ज करण्यासाठी आपणास तलाठी भरतीसाठी आॅनलाईन अर्ज केल्या जात असलेल्या आॅफिशिअल वेबसाईटला rfd.maharashtra.gov.in ला व्हिझिट करायचे आहे.

तसेच आमच्या पोर्टलवर देखील लवकरात लवकर भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक देखील आपणास उपलब्ध करून दिली जाईल.

तलाठी परीक्षेचे स्वरूप अणि अभ्यासक्रम –

परीक्षेचा अभ्यासक्रम हा मराठी,इंग्रजी विषय जनरल नॉलेज अणि गणित असणार आहे.

See also  फ्रंटऑफिस एक्झिक्युटिव्ह कसे बनायचे?How to become front office executive

● मराठी भाषेमध्ये ५० गुणांकरीता २५ प्रश्न विचारले जातात.

● इंग्रजी भाषेमध्ये ५० गुणांकरीता २५ प्रश्न विचारले जातात.

● जनरल नॉलेज २५ प्रश्नांसाठी ५० गुण असणार आहे.

● बौद्धिक चाचणीला ५० गुणांसाठी २५ प्रश्न विचारले जातात.

म्हणजे परीक्षेत एकुण गुण दोनशे असतात अणि एकुण विचारले जाणारे प्रश्न शंभर असतात.

भरतीसाठी अर्ज प्रक्रियेची सुरुवात ही जानेवारी २०२३ मध्ये केली जाणार आहे.

निवड प्रक्रिया –

● उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क –

● ओपन कॅटॅगरी मधील उमेदवारांना अर्ज शुल्क ५०० रूपये असणार आहे.

● मागासवर्गीय अणि ईबीसी कॅटगरी मधील उमेदवारांना ३५० रूपये इतकी फी आकारण्यात येणार आहे.