उसेन बोल्ट याची एकुण नेटवर्थ किती आहे?Usain Bolt net worth information in Marathi
फास्टेस्ट मॅन ऑफ अर्थ तसेच जगातील सर्वात वेगवान धावपटटु ह्या नावाने ओळखला जाणारा प्रसिद्ध ओल्मपियन खेळाडू उसेन बोल्ट याच्या एस एस एल कंपनी सोबत असलेल्या इन्वहेस्ट्मेंट अकाऊंट मधुन कोट्यावधीची खुप मोठी रक्कम लंपास झाली आहे.
असे म्हटले जाते आहे की उसेन बोल्ट याने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत जेवढाही पैसा कमवला होता रिटायर झाल्यावर जेवढीही रक्कम त्याला प्राप्त झाली होती.
तसेच जी काही सेव्हिंग त्याने केली होती ती सर्व ह्या चोरीमुळे एका क्षणात त्याने गमावली आहे.
उसेनच्या निदर्शनास हा प्रकार येताच उसेनने आपल्या वकिलाच्या मार्फत कंपनीकडुन त्याच्या गायब झालेल्या पैशांची मागणी केली आहे.
अणि जर कंपनीने उसेनला त्याची गायब झालेली रक्कम परत नाही केली तर तो सुप्रिम कोर्टात एस एस एल म्हणजेच स्टाॅक अॅण्ड सिक्युरीज लीमिटेड विरोधात धाव घेणार आहे.
आजच्या लेखात आपण उसेन बोल्ट हा कोण आहे?त्याची एकुण नेट वर्थ किती आहे इत्यादी महत्वाच्या बाबींविषयी अधिक सविस्तरपणे माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
उसेन बोल्ट कोण आहे?
उसेन बोल्ट हा एक जगातील सर्वात वेगवान गतीने धावणारा प्रसिद्ध धावपटटु आहे.उसेन बोल्ट हा एक माजी प्रोफेशनल जमैकन धावपटटु आहे.
उसेन बोल्ट याला आपण सर्वजण फास्टेस्ट मॅन ऑफ अर्थ तसेच लाईटनिंग बोल्ड म्हणजेच पृथ्वीवरील सर्वांत वेगवान व्यक्ती म्हणून ओळखतो.
उसेन बोल्ट याचे पुर्ण नाव काय आहे?
उसेन बोल्ट याचे पुर्ण नाव उसेन सेंट लिओ बोल्ट असे आहे.
उसेन बोल्ट याचा जन्म कधी अणि कोठे झाला होता?
उसेन बोल्ट याचा जन्म २१ आॅगस्ट १९८६ रोजी जमैका येथील शेरवूड ट्रेलाॅनी येथे झाला होता.
उसेन बोल्ट याचे कुटुंब –
उसेन बोल्ट याच्या वडिलांचे नाव वेलस्ली बोल्ट असे आहे.उसेन बोल्ट याच्या आईचे नाव जेनिफर बोल्ट असे आहे.
उसेन बोल्ट याच्या भावाचे नाव सादीकी बोल्ट असे आहे अणि बहिणीचे नाव शेरिना बोल्ट असे आहे.
उसेन बोल्ट याची उंची अणि वजन –
उसेन बोल्ट याची एकुण उंची १.९६ मी सहा फुट पाच इंच इतकी आहे.उसेन बोल्ट याचे वजन ९४ किलो ग्रॅम इतके आहे.
उसेन बोल्ट कधी निवृत्त झाला होता?
उसेन बोल्ट हा २०१७ मध्ये निवृत्त झाला होता.
उसेन बोल्ट याला आतापर्यंत संपूर्ण कारकिर्दीत प्राप्त झालेले महत्वाचे पुरस्कार अणि त्याने प्राप्त केलेले यश –
● उसेन बोल्ट याला आतापर्यंत चारदा वल्ड स्पोर्ट्स मॅन ऑफ द ईअर असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
● त्याने सहा वेळा आय ए एएफ मेल अॅथलिट आॅफ द ईअर हा पुरस्कार प्राप्त केला आहे.
● अनेक दिग्गज कंपनीचा ब्रॅण्ड अॅमबेसेडर म्हणून त्याने काम केले आहे.याचसोबत त्याचे स्वताची बोल्ड फाऊंडेशन नावाची एक संस्था अणि एक रेस्टॉरंट देखील आहे ज्याचे नाव ट्रॅक अणि रेकाॅर्ड असे आहे.
● उसेन बोल्ट याने २००२ मधल्या वल्ड ज्युनियर चॅम्पियन शिपमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.अणि असे करणारा सर्वात तरूण व्यक्ती म्हणून तो ओळखला जातो.
● २००३ मध्ये झालेल्या कार इफटा गेम्स मध्ये त्याला चार मेडल प्राप्त झाले.
● २००८ मधील समर आॅल्मपिक मधल्या शंभर मीटर स्पर्धा मुळे त्याने पहिले सुवर्णपदक पटकावले.
● २००९ मधल्या वल्ड चॅम्पियन शिपमध्ये सुदधा त्याने सुवर्णपदक प्राप्त केले होते.अणि २०१२ मध्ये पण त्याने सुवर्णपदक पटकावले होते.
● उसेन बोल्ट याने २००९ मधील आय ए एफ वल्ड चॅम्पियन शिपमध्ये शंभर मीटर धावण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.या पराक्रम करीता ९.८ सेक़ंद घेतले होते.
● उसेन बोल्टने 200 मीटर पुरुष ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सलग सर्वाधिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे.
● उसेन बोल्ट याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत दहा पेक्षा अधिक विक्रम नोंदविले आहे ज्यामुळे त्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आहे.
उसेन बोल्ट याचे एकुण नेटवर्थ किती आहे?
उसेन याचे एकुण नेटवर्थ जवळपास ९९ मिलियन डॉलर इतके आहे.अणि त्याचे कमाईचे साधन स्पोर्ट्स हे आहे.
उसेन बोल्ट याचे महिन्याचे उत्पन्न ५००००० डाॅलर इतके आहे.
सर्वात अधिक कमाई करणारया खेळाडुंच्या नावाच्या यादीत उसेन हा दितीय क्रमांकावर आहे.