व्हिटॅमिन बी ३ विषयी माहीती – Vitamin b3 information in Marathi

व्हिटॅमिन बी ३ विषयी माहीती – Vitamin b3 information in Marathi

व्हिटॅमिन बी 3 काय आहे?

व्हिटँमिन बी 3 ला आपण सामान्यत नियासीन या नावाने ओळखतो.व्हिटँमिन बी ३ हे बी काँम्पलेक्स व्हिटँमिन्सपैकी एक व्हिटँमिन आहे.

हे एक पाण्यात विरघळणारे व्हिटँमिन असते.हे आपल्या शरीरात साठवले जात नसते म्हणुन आपणास याचा आपल्या शरीरासाठी आहारामधून पुरवठा करावा लागत असतो.

व्हिटँमिन बी ३ हे आपल्या शरीरात निर्माण होत नसते.म्हणुन आपणास आहाराच्या अन्न पदार्थांच्या माध्यमातुनच हे घेणे गरजेचे असते.

व्हिटँमिन बी ३ हे आपल्या त्वचेसाठी,पचन क्रियेसाठी,अणि उत्तम मानसिक आरोग्यासाठी खुप उत्तम असते.

व्हिटँमिन बी ३ चे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत?health benefits of vitamin b3 in Marathi

1) आपल्या शरीरातील हानीकारक कोलेस्टेरॉल एल डी एलला कमी करते –

एलडी एल low density lipoprotein हे एक आपल्या शरीरास हानीकारक ठरत असलेले कोलेस्टेराँल आहे.आपल्या शरीरातील हे घातक कोटेस्टेराँल कमी करण्याकरीता आपण व्हिटँमिन बी ३ चे सेवन करणे अधिक फायदेशीर ठरत असते.

आपल्या शरीरातील एल डी एलची पातळी अधिक वाढली तर काय होते?

समजा आपल्या शरीरातील एलडी एलची पातळी अधिक वाढली तर आपणास धमनी तसेच हदय विकाराशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता देखील असते.

जर आपण एनसीबीआयच्या वेबसाइटला व्हिझिट केले तर आपणास लक्षात येईल की तिथे प्रकाशित केलेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की जर आपण नियासीनचे सेवण केले तर आपल्या शरीरातील एल डी एल कोलेस्टेराँलची मात्रा किमान १० ते १२ टक्क्यांनी कमी होत असते.

See also  पंतप्रधान आणि राष्टपती या दोघांमध्ये काय फरक आहे? - Difference Between Prime Minister and President

म्हणुनच आपण आपल्या आहारात व्हिटँमिन बी ३ युक्त अन्न पदार्थांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.

2) आपल्या शरीरातील एचडी एल कोलेस्टेरॉलची पातळी वाढते-

आपल्या शरीरातील एच-डी-एल म्हणजेच हाय डेंसिटी असणारे कोलेस्टेराँल म्हणजेच शरीराला चांगले असणारे कोलेस्टेराँल वाढवण्याचे काम सुदधा हे व्हिटँमिन बी ३ करत असते.

एका संशोधनातुन असे समोर आले आहे की नियासीनचे सेवण केल्याने आपल्या शरीरातील एचडी एल कोलेस्टेराँलची पातळी १५ ते ३० टक्क्यांनी वाढत असते.

आपल्या शरीरातील एच डी एलची पातळी अधिक वाढली तर काय होते?

आपल्या शरीरातील एच डी एल कोलेस्टेराँलचे प्रमाण वाढल्याने आपणास धमनी हदय तसेच पक्षाघाताचा कुठलाही धोका संभवत नसतो.याने आपल्या शरीरातील खराब कोलेस्टेराँल देखील बाहेर निघण्यास मदत होत असते.

3)शरीरात उर्जा निर्माण होते –

व्हिटँमिन बी ३ चे सेवन केल्याने आपल्या शरीरातील उर्जेच्या पातळीत वाढ होत असते.व्हीटँमिन बी ३ मुळे आपल्या शरीरातील अशक्तपणा दुर होऊन उर्जेच्या पातळीत वाढ होत असते.

4) आपल्या शरीरातील ट्रान्सग्लीसराईडचे प्रमाण कमी करते –

व्हिटँमिन बी ३ हे ट्रान्सग्लीसराईड देखील कमी करण्याचे काम करते.ट्रान्सग्लीसराईड हे एक फँट आहे जे लोणी अणि तेलाचे पदार्थ खालल्याने आपल्या शरीरात निर्माण होत असते.

आपल्या शरीरातील ट्रान्सग्लीसराईड प्रमाणापेक्षा अधिक वाढले तर काय होते?

जर आपल्या शरीरातील ट्रान्सग्लीसराईडचे प्रमाण अधिक वाढले तर आपल्याला हदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो.म्हणुन आपण आपल्या शरीरातील ट्रान्सग्लीसराईडचे प्रमाण नेहमी संतुलित राखायला हवे.

एका संशोधनातुन असे समोर आले आहे की व्हिटँमिन बी ३ चे सेवन केल्याने ट्रान्सग्लीसराईडचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी कमी होत असते.म्हणुन आपण आपल्या शरीरातील ट्रान्सग्लीसराईडचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी व्हिटँमिन बी ३ युक्त आहाराचे सेवण करणे अत्यंत गरजेचे आहे.

5) मेंदुसाठी अधिक फायदेशीर –

व्हिटँमिन बी ३ हे आपल्या मेंदुसाठी देखील खुप फायदेशीर आहे.

See also  बुदध पौर्णिमा का साजरी केली जाते हया दिवसाचे महत्व काय आहे? - Buddha Purnima 2023

6) संधीवातासाठी सांध्यांसाठी देखील उपयोगी –

व्हिटँमिन बी ३ हे संधीवातासाठी देखील फायदेशीर ठरत असते.याने सांध्याची जळजळ कमी होण्यास मदत होत असते.

7)पचनक्रिया व्यवस्थित राहते-

व्हिटँमिन बी ३ चे सेवन केल्याने आपल्या पचनाशी निगडीत सर्व समस्या दुर होत असतात.

व्हिटँमिन बी ३ चे सेवन केल्याने आपल्या शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित कार्य करते.

8) स्त्रियांना गर्भधारणेसाठी उपयुक्त ठरते –

गर्भधारणेदरम्यान मध्यम प्रमाणात व्हिटँमिन बी 3 चे सेवन करणे फायदेशीर मानले जाते.याने महिलांचा गर्भपात होत नही.तसेच गर्भातील जे जन्मजात दोष असतात ते देखील कमी होत असतात.त्याचे निवारण होत असते.

9) त्वचेसाठी फायदेशीर –

आपल्या त्वचेसाठी देखील व्हिटँमिन बी 3 खुप फायदेशीर असतो.एका संशोधनातुन असे समोर आले आहे की नियासिनमाईड हे अँण्टीआँक्सीडंट म्हणुन कार्य करत असते.व्हिटँमिन बी 3 मुळे आपल्या त्वचेस एक लवचिकता निर्माण होत असते.त्वचेवर काळे डाग,सुरकुत्या येत नसतात.

10) केसांच्या उत्तम आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरते

व्हिटँमिन बी 3 चे सेवन करणे आपल्या केसांसाठी देखील खुप फायदेशीर असते.याने आपले केस गळणे देखील काही प्रमाणात कमी होत असते.

व्हिटँमिन बी 3 युक्त खाद्यस्त्रोत कोणते आहेत?vitamin b3 food sources in Marathi

आपल्या शरीराला ज्यातुन व्हिटँमिन बी 3 भेटते असे काही प्रमुख खाद्य स्त्रोत पुढीलप्रमाणे आहेत –

● मटण

● अंडी

● दुध

● मासे

● भुईमुग

● सोयाबिन

● तांदुळ

● मशरूम

● अवँँकँडो

● मटार

● बटाटा

● दही

● हिरवे वटाणे

● शेंगदाणे

● भोपळ्याच्या बिया

● सूर्यफूलाच्या बिया

● धान्य

● चीज

● पास्ता तसेच ब्रेड

तसेच प्रोटीनयुक्त इतर अन्न पदार्थ इत्यादी.

जर आपण व्हिटँमिन बी ३ चे सेवन नही केले अणि आपल्या शरीरात व्हिटँमिन बी ३ ची कमतरता राहीलेली असेल तर आपणास कोणता आजार जडतो?vitamin b3 deficiency in Marathi

See also  विल्यम शेक्सपियर यांच्या विषयी 15 रोचक तथ्ये - 15 amazing facts about William Shakespeare in Marathi

जर आपल्या शरीरामध्ये व्हिटँमिन बी ३ ची कमतरता असेल तर आपल्याला स्क्रीझोफेनिया सारखे अनेक मेंदुशी संबंधित तसेच मानसिक आजार जडु शकतात.

जर आपण व्हिटँमिन बी ३ चे सेवन नही केले तर आपल्याला पचनाशी संबंधित विविध समस्या देखील उदभवण्याची शक्यता असते.म्हणुन आपण व्हिटँमिन बी ३ चे सेवन हे करायलाच हवे.

पेलाग्रावर उपचार करण्यासाठी व्हिटँमिन बी ३ अधिक फायदेशीर आहे.जर आपल्या शरीरात व्हिटँमिन बी ३ ची कमतरता असेल तर आपल्याला पेलाग्रा हा व्हिटँमिनच्या कमतरतेमुळे उदभवणारा आजार जडु शकतो.म्हणुन हा आजार आपणास जडु नये म्हणुन आपण व्हिटँमिन बी 3 चे सेवण आवर्जुन करायला हवे.

काही अभ्यासातुन असे समोर आले आहे की व्हिटँमिन बी ३ च्या कमतरतेमुळे कँन्सर होण्याचा धोका वाढत असतो.

काहीवेळा, व्हिटॅमिन B3 च्या तीव्र कमतरतेमुळे स्मृतीभ्रंश,उन्माद,आणि चिंता,थकवा,अस्वस्थता, चिडचिड, खराब एकाग्रता, औदासीन्य, उदासीनता आणि वेळेवर उपचार न केल्यास व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

व्हिटॅमिन बी 3 किंवा नियासिनच्या कमतरतेमुळे हार्टनप रोग देखील होऊ शकतो ज्यामध्ये खवले लाल होणे पुरळ येणे चिडचिड होणे हे समाविष्ट असते.

व्हिटँमिन बी ३ ची काही प्रमुख कार्ये -vitamin b3 functions in Marathi

● व्हीटँमिन बी ३ हे आपल्या रक्तामधल्या खराब कोलेस्टेराँलची अणि ट्रान्सग्लीसराईडचे प्रमाण कमी करण्यात आपली महत्वाची भुमिका पार पाडते.

● व्हिटँमिन बी ३ चे सेवन केल्याने एल डी एल ची पातळी कमी होत असते.अणि एचडीएलचच्या प्रमाणात अधिक वाढ होण्यास अधिक मदत होत असते.

● व्हिटँमिन बी ३ हे शरीरातील पाचन क्रियेत सुधारणा घडवून आणते.अन्न शरीरात व्यवस्थित योग्य पदधतीने शोषुन घ्यायला मदत करत असते.

● आतडयांमधुन टाकाऊ पदार्थांचे उत्सर्जन करते.बदधकोष्ठतेचा त्रास कमी करते.

● आपल्या शरीरातील इष्टतम उर्जा चयापचय राखण्याकरीता एक महत्वपूर्ण भुमिका पार पाडत असते.

व्हिटँमिन बी ३ चा वापर अजुन कुठे अणि कशासाठी केला जातो?vitamin b3 other uses in Marathi

● पेलाग्राचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता अनेक शतकांपासुन विविध देशांमध्ये नियासिनचा म्हणजेच व्हिटँमन बी ३ चा वापर अन्नाच्या तटबंदीसाठी करण्यात येत आहे. नियासिनचा वापर करून फूड फोर्टिफिकेशन करून जास्तीत जास्त लोकांपर्यत पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात पोहोचवणे अधिक सहज आणि सोपे झाले आहे.