डब्बा ट्रेडिंग कशाला म्हणतात? – What is Dabba Trading and How it Works? – अवैध

डब्बा ट्रेडिंग कशाला म्हणतात? What is Dabba Trading and How it Works

नॅशनल स्टॉक एक्सचेंज तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराकडुन गुंतवणुकदारांसाठी नुकतीच एक सुचना वाॅरनिंग देण्यात आली आहे.

ज्यात असे सांगितले आहे की गुंतवणुकदारांनी डब्बा ट्रेडिंग करणारयां पासुन सावध राहायला हवे.

ह्या डब्बा ट्रेडिंग अंतर्गत काही फसवणुक करणारे लोक गुंतवणुकदारांना निश्चित परतावा देण्याचे आश्वासन देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बाजारात हमीभाव देत असलेल्या अशा कुठल्याही व्यक्ती तसेच संस्था कडुन योजना उत्पादन खरेदी करू नये असे करणे बेकायदेशीर आहे असे एन एस ईने सर्व गुंतवणुक दारांना बजावले आहे.

आजच्या लेखात आपण हे डब्बा ट्रेडिंग काय असते हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

डब्बा ट्रेडिंग म्हणजे काय? याचे स्वरूप कसे असते?

डब्बा ट्रेडिंग हे शासनाकडुन परवानगी देण्यात न आलेले एक बेकायदेशीर शेअर बाजार असते.

डब्बा ट्रेडिंगचे प्रकार हे नकली शेअर बाजारात घडुन येत असतात.हया बाजाराची नियमावली देखील वेगळी असते.

डब्बा ट्रेडिंग अंतर्गत व्यवहार करणारे यांचे नाव सेबीकडे रेजिस्टर नसतात ज्यामुळे हे सेबी रेजिस्टर नसल्याने बेकायदेशीर मानले जाते.यात सर्व व्यवहार हे रोखीच्या स्वरूपात पार पाडले जातात.

यामध्ये शेअर मार्केट मध्ये रेजिस्टर झालेल्या कंपन्यांच्या खरेदी तसेच विक्रीचे व्यवहार पार पडत असतात.हे व्यवहार करणारा व्यक्ती आपणास तो शेअर्सची खरेदी विक्री करत असलेला दलाल असल्याचे सांगतो.

हे व्यवहार करणारे लोक आपले म्हणजेच गुंतवणक दारांचे पैसे शेअर बाजारात गुंतवत आहे असे सांगतात आणि मग स्वताच्या ट्रेडिंग बुकमध्ये याची नोंद करतात असल्याचे सांगितले जाते.मग गुंतवणुक दाराकडून याबदलयात पैसे उकळले जातात.

हा दलाल एजंट आॅफिशिअल शेअर बाजारात शेअर्सची गुंतवणुक करत असतो.त्यात होणारया नफा तोटयानुसार मग गुंतवणुक दाराला त्याचे पैसे देत असतो.

अणि समजा शेअर बाजारात एजंटला दलालाला तोटा झाला तर तो एजंट व्यवसाय बंद करून पळुन देखील जाण्याची शक्यता असते.

See also  आपल्या मुलांसाठी गुंतवणुक कशी करावी? - Investment plans for family welfare Marathi

म्हणजे यात गुंतवणूक दारांचे पैसे बुडण्याची दाट शक्यता असते.अणि गुंतवणुक केल्यानंतर व्यवहार पुर्ण होण्याची देखील कोणतीही हमी खात्री यात दिली जात नसते.

डब्बा ट्रेडिंग मधून जी गुंतवणूक केली जाते त्यातुन जे उत्पन्न नफा गुंतवणुक दारांना प्राप्त होतो त्यावर त्यांना कर आकारला जात नाही म्हणून गुंतवणुकदार यात गुंतवणूक करीत असतात.

यात जोखिम अधिक असते पण पैसेही विपुल प्रमाणात भेटण्याची शक्यता असते ह्यामुळे यात गुंतवणूकदार गुंतवणुक करीत असतात.

डब्बा ट्रेडिंग अंतर्गत जे काही व्यवहार पार पडत असतात हे शेअर बाजाराच्या आत घडुन येत नसतात त्याच्या बाहेर हे व्यवहार पार पडत असतात.

याचसोबत ही ट्रेडिंग खाजगी व्यक्ती तसेच संस्था मार्फत केली जात असते.हया व्यवहारांची कुठलीही नोंद सेबीकडे नसते.

त्यामुळे याची नियमावली देखील सरकारच्या नियमात न बसणारी खाजगी स्वरूपाची असते.म्हणुन डब्बा ट्रेडिंगला भारतात जुगार असे म्हटले जाते अणि बेकायदेशीर ठरवत मनाई करण्यात आली आहे.