रशियाचे लुना २५ मिशन अयशस्वी होण्याचे,क्रॅश होण्याचे कारण काय आहे?Why Luna 25 crashed in Marathi
नुकतेच एक बातमी समोर आली आहे की रशियाचे लुना २५ हे यान लॅडिग करण्याच्या आधीच क्रॅश झाले आहे.ज्यामुळे हे यान संपर्काच्या बाहेर गेले आहे.
ह्या क्रॅश मुळे भारताच्या चंद्रयान ३ च्या अगोदर चंद्रावर आपले प्रथम पाऊल टाकण्याचे रशियाचे स्वप्न देखील भंग पावले आहे.
भारताच्या चंद्रयान ३ च्या दोन दिवस आधी हे यान २१ आॅगस्ट २०२३ रोजी चंद्रावर आपले पाऊल टाकत साॅफ्ट लॅडिंग करणार असे वाटत होते.
पण अचानक लॅडिग करण्याच्या आधीच लुना २५ यान क्रॅश झाले अणि रशियाच्या ह्या मोहीमेस खुप मोठा धक्का बसला आहे.
लुना २५ हे यान रशियाच्या स्पेस स्टेशनच्या संपर्कात देखील सध्या नाहीये.असे स्पेस स्टेशनकडुन कळविण्यात आले आहे.
आपल्या निर्धारित मार्गावरून भरकटले अणि चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन धडकल्याचे सांगितले जात आहे.
मध्यरात्रीच्या वेळी यानात काही तांत्रिक बिघाड झाला होता हा बिघाड संशोधकांना खुप प्रयत्न करूनही दुर करण्यास अपयश आले होते.
काही तांत्रिक बिघाडामुळे लुना २५ यान क्रॅश झाल्याने रशियाला भारताच्या अगोदर चंद्रावर साॅफ्ट लॅडिंग करता आलेली नाहीये.
लुना २५ हे रशियाचे यान दक्षिण ध्रुवावर चंद्रयान ३ च्या आधी उतरणार होते.चंद्राच्या एका भागावरील माहीती प्राप्त करायला लुना २५ हे यान सोमवारी २१ आॅगस्ट रोजी चंद्रावर उतरणार होते.
लुना २५ हे यान चंद्रावर गोठलेल्या पाण्याचा अणि किंमती तत्वांचा शोध घेण्यासाठी उतरणार होते.तब्बल ५० वर्षांनी रशियाने ही मोहीम पार पाडण्यासाठी हाती घेतली होती.
पण रशियाच्या लुना २५ यानाला अचानक आपात्कालीन स्थितीला सामोरे जावे लागल्याने रशियाचे राष्ट्रपती यांची चंद्रयान ३ च्या आधी चंद्रावर पाऊल टाकत रशियाला अंतराळातील महासत्ता बनविण्याची योजना अपयशी ठरली आहे.
रशियाचे लुना २५ यान क्रॅश झाल्याची माहिती रशियातील अंतराळ संशोधन संस्था रोॅसकोसमाॅसने दिली आहे.
याआधी १० आॅगस्ट १९७६ रोजी रशियाने आपले लुना २४ यान पाठविले होते.यानंतर पाच दशकांच्या नंतर पहिल्यांदाच लुना २५ हे यान रशियाने अंतराळात पाठविले होते.
तब्बल ११ दिवसात २१ आॅगस्ट २०२३ रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते.पण रशियाचे लुना २५ क्रॅश झाल्याने सर्व जगाचे लक्ष भारताच्या चंद्रयान ३ मिशन कडे लागलेले आहे.
११ आॅगस्ट २०२३ रोजी लुना २५ चे प्रक्षेपण करण्यात आले होते.यानंतर लुना २५ अवघ्या चार ते पाच दिवस एवढ्या कालावधी मध्ये चंद्राच्या कक्षेत पोहचले होते.सध्या हे भारताच्या चंद्रयान ३ सोबत चंद्राच्या कक्षेमध्ये आहे.