जागतिक पशुवैद्यकीय दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे? – world veterinary day

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

जागतिक पशुवैद्यकीय दिवस का साजरा केला जातो? ह्या दिवसाचे महत्त्व काय आहे?

प्राण्यांच्या विरोधात होत असलेल्या क्रुरतेला आळा घालण्यासाठी आज जागोजागी पशुवैद्यकीय संघटना कार्यरत आहे.

ह्या पशुवैद्यकीय संघटनेच्या वतीने हा दिवस आयोजित करण्यात आला आहे.जागतिक पशुवैद्यकीय दिवस हा दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरच्या शनिवारी साजरा केला जात असतो.

ह्या वर्षी २९ एप्रिल रोजी शनिवारच्या दिवशी हा जागतिक पशुवैदयकीय दिवस साजरा केला जाणार आहे.

जागतिक पशुवैद्यकीय दिवस का साजरा केला जातो?

प्राण्यांची आपल्या मानवी जीवनात खुप महत्वाची भुमिका आहे.प्राण्यांमुळे आपणास मानव प्राण्यास अनेक कामात खुप हातभार प्राप्त होत आहे.शेतीच्या कामात तसेच इतर अनेक बाबतीत आज आपण प्राण्यांवर अवलंबून आहे.

म्हणुन प्राण्यांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.आपण प्राण्यांच्या आरोग्याची देखभाल करणे आवश्यक आहे.

प्राण्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी हा पशुवैद्यकीय दिवस दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी साजरा केला जातो.

ह्या दिवशी प्राण्यांच्या पासुन होत असलेल्या आजारांना रोखण्यासाठी विविध उपाययोजना देखील केल्या जातात.प्राण्यांच्या आरोग्य सेवा विषयी समाजात जागृती केली जाते.

प्राण्यां सोबत केल्या जात असलेल्या क्रुरतेला आळा घालण्यासाठी पावले उचलण्याचा हा महत्त्वाचा दिवस असतो.

जागतिक पशुवैद्यकीय दिनाचा इतिहास –

इंग्लंड देशामधल्या प्रा जाॅन गमजी यांनी जर्मनी ह्या देशात यूरोप मधील पशुवैद्यकांची एक बैठक आयोजित केली होती.

ही बैठक १४ जुले ते १८ जुलै ह्या कालावधी दरम्यान आयोजित करण्यात आली होती.हया घेतलेल्या बैठकीत जागतिक पशुवैद्यकीय काॅग्रेस स्थापित केले जाईल असा ठराव करण्यात आला होता.

पुढे ह्याच पशुवैद्यकीय काॅग्रेसचे रूपांतर पशुवैद्यकीय संघटनेमध्ये करण्यात आले होते.हया संघटनेकडुन ९० राष्ट्रीय अणि बारा जागतिक पशुवैद्यकीय संघटनाचे नेतृत्व केले जाते.

See also  युपीआय दवारे पैशांची देवाणघेवाण करणारयांना आता 2000 पेक्षा अधिक व्यवहाराकरीता पीपीआय चार्ज भरावा लागेल - prepaid payment instrument fees

ह्या पशुवैद्यकीय संघटनेच्या वतीने पशुवैद्यकीय क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावण्यासाठी पशुवैद्यकांना विशेष असा गुणवत्ता अवाॅर्ड प्रदान करण्यात येत असतो.

२०२३ ची पशुवैदयकीय दिवसाची थीम काय आहे?

ह्या वर्षांची थीम पर्यावरण आरोग्याचा महत्वपूर्ण घटक अशी आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा