युटयुबने माॅनिटाईझेशन पाॅलिसी मध्ये केले बदल आता नवोदित युटयुबर्सला युटयुब वरून पैसे कमविणे होणार अधिक सोप्पे -YouTube monetization policy change

युटयुबने माॅनिटाईझेशन पाॅलिसी- YouTube monetization policy change

ज्या कंटेट क्रिएटरला युटयुब वर व्हिडिओ कंटेट तयार करून आॅनलाईन पैसे कमवायचे आहे युटयुब मध्ये आपल्या करिअरला सुरुवात करायची आहे अशा सर्व युटयुबर्स करीता एक महत्वाची बातमी आहे.

ज्या युटयुबर्सने नुकतेच आपल्या युटयुब वरील करिअरला प्रवासाला सुरुवात केली आहे.त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे युटयुबने आपल्या माॅनिटाइझेशन पाॅलिसी मध्ये काही बदल केले आहेत.

कंपनी लवकरच युटयुब पार्टनर प्रोग्राम अंतर्गत आपल्या माॅनिटाइझेशन पाॅलिसी मध्ये काही विशेष बदल केला आहे.

हा माॅनिटाइझेशन पाॅलिसी मधील करण्यात आलेला बदल अजुन भारतात लागु करण्यात आला नाहीये पण अमेरिका, कोरिया,युके, कॅनडा तायवान ह्या इतर देशांसोबत लवकरच हा बदल भारतात देखील लागु केला जाईल.

ज्यामुळे आता नवीन युटयुबर्सला देखील युटयुब वरून लवकरात लवकर पैसे कमविता येणार आहे.असे सांगितले जाते आहे की नवोदित युटयुबर्सला प्रोत्साहन देण्यासाठी युटयुबने हे बदल घडवून आणले आहेत.

आधी युटयुबर्सला युटयुब दवारे पैसे कमविणे सुरू करण्यासाठी आपले युटयुब चॅनल मोनिटाईज करण्यासाठी काही ठाराविक eligibility criteria आहे ज्या पुर्ण कराव्या लागत होत्या.

YouTube monetization policy change
YouTube monetization policy change

युटयुबच्या माॅनिटाइझेशन पाॅलिसी मध्ये कोणकोणते बदल घडुन येणार आहे?

याआधी युटयुब चॅनलला माॅनिटाईझ करण्यासाठी युटयुबर्सला हजार सबस्क्राईबर पुर्ण करणे आवश्यक असायचे.तेव्हाच नवीन युटयुबर्सला आपले चॅनल मोनिटाईज करता यायचे.

पण आता नवीन माॅनिटाइझेशन पाॅलिसी मुळे नवोदित युटयुबर्सला आपले युटयुब चॅनल मोनिटाईज करण्यासाठी फक्त ५०० सबस्क्राईबर पुर्ण करावे लागणार आहे.

याआधी युटयुबर्सला आपले चॅनल मोनिटाईज करण्यासाठी चार हजार तासांचा वाॅचटाईम पुर्ण करणे देखील आवश्यक होते.

See also  अमेझॉन च्या भयानक जंगलात ४ मुलांनी दिली तब्बल ४० दिवस मृत्यूशी झुंज - Amazon forest rescue in Marathi

पण आता नवीन माॅनिटाइझेशन पाॅलिसी नुसार युटयुबर्सला फक्त ३ हजार तासांचा वाॅच टाईम आपले युटयुब चॅनल मोनिटाईज करण्यासाठी पुर्ण करावा लागेल.

युटयुबने शाॅर्ट व्हिडिओच्या अहर्तेत कोणते बदल केले आहे?

युटयुबने शाॅर्ट दवारे युटयुब चॅनल माॅनिटाईझ करण्यासाठी १० मिलियन वरून ३ मिलियन केले आहे.

नवोदित युटयुबर्सला याचा काय फायदा होणार –

ज्या युटयुबर्सला हजार सबस्क्राईबर अणि चार हजार वाॅच टाईम पुर्ण होईपर्यंत माॅनिटाइझेशन करण्यासाठी वाट पाहावे लागायचे.त्यांना फक्त ५०० सबस्क्राईबर अणि तीन हजार वाॅच टाईम पुर्ण करून लवकरात लवकर आपले चॅनल मोनिटाईज करून युटयुब वरून पैसे कमवायला सुरूवात करता येणार आहे.