प्रज्ञानंद कोण आहे? – R Praggnanandhaa – Second youngest Chess Grandmaster in World

प्रज्ञानंद कोण आहे? – R Praggnanandhaa – (प्रज्ञानानंद )

प्रज्ञानंद हा फक्त अठरा वर्षांचा मुलगा आहे ज्याने बुद्धिबळाच्या जगात कमाल करून दाखवली आहे.

ज्या वयात मुलांना आयुष्यात काय करावे हा प्रश्न पडलेला असतो त्या वयात आर प्रज्ञानंद याने ही कमाल केली आहे.

प्रज्ञानंद ह्या अठरा वर्षांच्या तरूणाने नुकताच बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत प्रवेश केला आहे.

प्रज्ञानंद याने टायब्रेक मध्ये जगात तिसरया क्रमांकावर असलेल्या बेबिआनो कारोआनोला ३-५,२-५ ने पराभुत करत हे यश प्राप्त केले आहे.

ही उपलब्धी प्राप्त करणारा प्रज्ञानंद जगातील दुसरा खेळाडु बनला आहे.याआधी हा रेकाॅड विश्वनाथन आनंद यांच्या नावावर होता.

Praggnanandhaa - Second youngest Chess Grandmaster
Praggnanandhaa – Second youngest Chess Grandmaster

आता फायनल मध्ये प्रज्ञानंद याचा सामना जगातील नंबर एक खेळाडू म्हणून ओळखले जाणारया मॅगनस कार्लसन यांच्यासोबत होणार आहे.

जर प्रज्ञानंदने हा सामना जिंकण्यात यश प्राप्त केले तर त्याला बक्षिसाच्या स्वरूपात ९१ लाख रोख रक्कम प्राप्त होईल.

प्रज्ञानंद हा आपल्या भारताचा ग्रॅड मास्टर आहे ज्याने बुदधीबळ फिडे वल्ड कपमध्ये २०२३ मधील टुर्नामेंट मधील शेवटच्या फेरीत प्रवेश केला आहे.

आर प्रज्ञानंद हा फिडे विश्वचषक २०२३ मधील उपांत्य फेरीत पोहोचणारा विश्वनाथन आनंद नंतरचा पहिला भारतीय आहे.

ही बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेची एकुण दहाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे.हे बुदधीबळ विश्वचषक अझरबेजानची राजधानी बाकु येथे होत आहे.

आतापर्यंत विश्वनाथन आनंद वगळता इतर कुठलाही भारतीय बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अखेरच्या चार टप्प्यांत पोहचण्यास यशस्वी ठरला नाहीये.

विश्वनाथन आनंद याने २००० अणि २०००२ मधील स्पर्धेच्या दोन आवृत्त्या जिंकल्या होत्या.

भारतीय ग्रँड मास्टर प्रज्ञानंद याने गुरूवारी १७ आॅगस्ट रोजी अहमदन अर्जुन अॅरीगेसीला टाय ब्रेकर मध्ये ५-४ ने पराभुत केले.अणि फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता.

अठरा वर्षांचा प्रज्ञानंद याने सेमीफायनल मध्ये अमेरिकेतील बेबियानो कारोआनाला देखील पराभुत केले आहे.आता पुढच्या वर्षी होत असलेल्या टुर्नामेंट करीता प्रज्ञानंद काॅलीफाय ठरणार आहे.

See also  Health insurance - कोणत्या आजारांचे कव्हरेज मिळत नाही ? Common Health Insurance Exclusions in Marathi