135+ मराठी अलंकारिक शब्द संग्रह | Alankarik Shabd in Marathi PDF Download

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

135+ मराठी अलंकारिक शब्द संग्रह | Alankarik Shabd in Marathi PDF Download

विद्यार्थीमित्रांनो आलंकारिक शब्द या टॉपिक वर स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे जर का तुम्ही महाराष्ट्र होणाऱ्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर खाली दिलेले आलंकारिक शब्द एकदा वाचून नक्की जा.

मराठी अलंकारिक शब्द संग्रह

शब्द अर्थ
खुशालचेंडू चैनखोर माणूस
अष्टपैलू सर्वगुणसंपन्न
गर्भश्रीमंत जन्मापासून श्रीमंत
अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस
गंगा-यमुना अश्रु
अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस
खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे
अकलेचा कांदा मूर्ख
अरण्यरुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य
गंडांतर भीतिदायक संकट
भाकडकथा बाष्कळ गोष्टी
भीष्मप्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा
मंथरा दुष्ट स्त्री
मायेचा पूत परक्रमी मनुष्य, मायाळू
मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम
गाजरपारखी कसलीही पारख नसलेला, मूर्ख
अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे
गुरुकिल्ली मर्म, रहस्य
गुळाचा गणपती मंद बुद्धीचा
अक्षरशत्रू निरक्षर, अडाणी
गोगलगाय गरीब निरुपद्रवी मनुष्य

Alankarik Shabd in Marathi

शब्द अर्थ
अमरपट्टा अमरत्वाचे आश्वासन
आग्या वेताळ अत्यंत रागीट मनुष्य
अक्षर शत्रू अडाणी
कुबेर खूप श्रीमंत माणूस
घर भेद्या गुप्त गोष्टी शत्रूला सांगणारा
कैकयी दुष्ट स्वभावाची स्त्री
घटकेचे घड्याळ क्षणभंगुर
ओनामा सुरुवात, प्रारंभ
उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा
घरकोंबडा घराबाहेर न पडणारा
उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू, क्वचित भेटणारा
चर्पटपंजरी निरर्थक बडबड
टोळभैरव कामात नासाडी करणारे लोक
काडी पहिलवान हडकुळा
कुंभकर्ण अतिशय झोपाळू
कूपमंडूक संकुचित वृतीचा
कोल्हेकुई निरर्थक लोकांची बडबड
त्रिशंकू धड ना इकडे, धड ना तिकडे
खडाजंगी मोठे भांडण
दगडावरची रेघ कधीही न बदलणारे
See also  इंस्टाग्राम डाऊनच्या समस्येमुळे युझर्स निराश - Instagram down problem in Marathi

Alankarik words in marathi

शब्द अर्थ
पर्वणी अतिशय दुर्मिळ योग
पाताळयंत्री कारस्थान करणारा
पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तु
ताटाखालचे मांजर दुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा
पांढरा परीस लबाड
पिकले पान म्हातारा
पोपटपंची अर्थ न कळता पाठांतर करणारा
बृहस्पती बुद्धिमान
बिनभाड्याचे घर तुरुंग
बोकेसंन्यासी धोंगी मनुष्य
बोलाचीच कढी केवळ शाब्दिक वचने
भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न
कर्णाचा अवतार उदार मनुष्य
चौदावे रत्न मार
कळसूत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
छत्तीसचा अकडा शत्रुत्व
जमदग्नीचा अवतार रागीट
कळीचा नारद कळ लावणारा
खडाष्टक जोरदार भांडण
देवमाणूस चांगला सज्जन
धोपट मार्ग सरळ, नेहमीचा मार्ग
नवकोट नारायण खूप श्रीमंत
नंदीबैल हो ला हो म्हणणारा

 

Figurative words in Marathi

शब्द अर्थ
बादरायण संबंध ओढून ताणून दाखविलेला संबंध
संगणकसाक्षर संगणकाचा वापर करण्याचे ज्ञान
सोन्याचे दिवस चांगले दिवस
सुळावरची पोळी जीव धोक्यात घालणारे काम
सांबाचा अवतार अत्यंत भोळा माणूस
चामुंडा भांडखोर व कजाग वृत्तीची स्त्री
दळूबाई भेकड माणूस
गाढव बेअकली माणूस
चालता काळ वैभवाचा काळ
सूर्यवंशी उशिरा उठणारा
लंकेची पार्वती अत्यंत गरीब स्त्री
रामबाण औषध अचूक गुणकारी
मुखस्तंभ मुद्दाम न बोलता उभा राहणारा
मेषपात्र बावळट
मृगजळ केवळ आभास
श्रीगणेशा प्रारंभ
शेजारधर्म शेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत
वाहती गंगा आलेली संधी
वाटाण्याच्या अक्षता नकार
लंबकर्ण बेअकली

अलंकारिक शब्द मराठी व्याकरण

शब्द अर्थ
स्मशान वैराग्य तात्कालिक वैराग्य
सव्यसाची डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
सिकंदर नशीब फार मोठे नशीब
सिकंदर भाग्यवान
शकुनी मामा कपटी मनुष्य
रुपेरी बेडी चाकरी
थंडा फराळ उपवास
घोरपड चिकाटी धरणारा
गप्पीदास थापा गप्पा मारणारा
खडास्टक भांडण
अंधेर नगरी अव्यवस्थित पद्धतीचा कारभार
अंडीपिल्ली गुप्त गोष्ट
हरीशचंद्र सत्यवचनी माणूस
वैष्णव विष्णूची उपासना करणारा
हरीचा लाल विशेष व्यक्ति
सत्तीचे वाण दृढनिश्चय
वाघ्या-मुरळी खंडोबाच्या नावाने सोडलेला पुरुष व स्त्री
वासुदेव रामप्रहरी रामाचे गाणे म्हणत सगळ्यांना जागे करणारा
याज्ञिक धर्मसंस्कार विधी करणारा
तारेवरची कसरत सावधगिरीने करावयाचे काम
सारथी रथ चालविणारा
जमीन अस्मानचे अंतर दोन विरोधी गोष्टी
टांगती तलवार सतत भीतीची जाणीव
भानामती जादू, जादूगारीण
लक्ष्मणरेषा मर्यादा, संयम
काळाबाजार खोटा व्यवहार
अंगठाछाप निरक्षर मनुष्य
सोंगाड्या वगनाट्यात विविध भूमिका करणारा
गळ्यातील ताईत अतिशय आवडती व्यक्ती
बत्तीशी दातांची कवळी
स्वल्पविराम क्षणभर विश्रांती
सांडणीस्वार उंटावरून टपाल पोहोचवणारा
शैव शंकराचा उपासक
हिंगाचा खडा त्रासदायक माणूस
शिरस्तेदार कचेरीतला अव्वल दर्जाचा कारकून
See also  हर घर तिरंगा हिंदी नारे- घोषवाक्ये - Har Ghar Tiranga HIndi slogans

Alankarik shabd in marathi pdf download

FAQ

Q. अलंकारिक शब्द म्हणजे काय | Alankarik Shabd mhanje kay

Answer: कोणतीही गोष्ट किंव्हा कोणतेही प्रसंग दर्शवण्यासाठी विशेष शब्दांची शब्दरचना केली जाते त्याला च अलंकारिक शब्द असे म्हंटले जाते, उदाहरणार्थ, भगीरथ प्रयत्न:आटोकाट प्रयत्न, कर्णाचा अवतार: उदार मनुष्य इत्यादी.

Also Read

Adverbs List In Marathi

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा