फुलांची माहीती – Flowers information in Marathi
फुलांचा वापर हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात नेहमी करत असतो.कधी देवाला हार बनवण्यासाठी तर कधी गजरा तयार करून केसात गुंफण्यासाठी आपण फुले वापरत असतो.
फुले ही सुगंधीत आणि सुवासिक असतात.त्यांच्या सहवासाने आपण मंत्रमुग्ध होऊन जात असतो.फुले ही माणसालाच नव्हे तर देवाला देखील अतिप्रिय असतात म्हणुन आपण देवाला त्यांची पुजा करताना फुले अपर्ण करत असतो.आणि धार्मिक दृष्टीने देखील फुलांना खुप महत्व आहे.
आज आपण ह्याच विविध जातीच्या फुलांविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.
विविध फुलांची नावे आणि त्यांच्या विषयी माहीती : Flowers information in Marathi
1)गुलाबाचे फुल : Botanical Name: Rosa -Indian Name: Gulab
गुलाबाचे फुल हे सर्व फुलांमध्ये अत्यंत प्रसिदध फुल आहे.ह्या फुलाचा वापर हा परफ्युम तयार करण्यासाठी देखील केला जातो.गुलाबाचे फुल हे प्रियकर तसेच प्रेयसी एकमेकांना आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी देत असतात.गुलाब ह्या फुलाचे वैज्ञानिक नाव हायब्रिडा असे आहे.गुलाबाची लागवड ही भारतात व्यवसायासाठी देखील केली जाते.
2) कमळाचे फुल : Botanical Name: Rosa Nelumbo nucifera
कमळ हे भारताचे राष्टीय फुल आहे.कमळ ही एक जल वनस्पती आहे जिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा असे आहे.कमळ ही एक औषधी वनस्पती आहे जिचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी देखील केला जातो.हिंदु धर्मात कमळ ह्या फुलाला धार्मिकदृष्टया देखील उच्च स्थान दिले जाते.
3) झेंडुचे फुल : Botanical Name: Tagetes-Indian Name: Zendu Genda
झेंडुच्या फूलाचा आकार हा गोल असतो.आणि ह्या फुलात भरपुर पाकळया असतात.झेंडुच्या फुलापासुन वनस्पती देखील तयार केली जाते.झेंडुच्या फूलांची चव तिखट,तुरट आणि कडवट अशी असते.कान दूखत असल्यास याचा रस आपण कानात देखील टाकु शकतो.
4) चमेली फुल : Botanical Name: Jasminum– Indian Name: Chameli
चमेली ह्या फुलाला देवाची देणगी असे देखील संबोधिले जाते.परशियन भाषेत चमेली ह्या फुलाला यास्मीन असे म्हणतात.हे फुल हिमालयामध्ये दक्षिणेला किंवा पश्चिमेला उगवत असते.ह्या फुलाची उत्पत्ती ही पश्चिम चीन मध्ये स्थित असलेल्या हिमालयात झालेली आपणास आढळुन येते.
5) रजनीगंधा,निशिगंधा फुल : Botanical Name – Polianthes tuberosa आणि Epiphyllum oxypetalum
निशिगंधा ही एक सुगंधित फुले असलेली वनस्पती आहे.ज्याला हिंदीत रजनीगंधा म्हणतात.निशी गंधाचे फुल हे रात्रीच्या वेळेस फुलत असते म्हणुन आपण निशिगंधा असे म्हणत असतो.ह्या वनस्पतीची उंची साधारणत एक किंवा दीड मीटर इतकी असते.
6) सुर्यफुल :
सुर्यफुल ह्या फुलाचा उदय सर्वप्रथम अमेरिका या देशात झाला होता.सुर्यफुलाच्या पाकळया नारंगी तसेच पिवळया रंगाच्या असतात आणि ह्या पाकळयांच्या मध्यभागी तपकिरी रंग असलेले वर्तुळ देखील असते.
7) कनेर Nerium oleander – कनेर -Kaner_
कनेरची फुले ही पांढरी,तांबडया,पिवळया तसेच फिक्कट गुलाबी रंगाची असतात.कनेरच्या फुलाची पाने लांब,जाड आणि हिरव्या रंगाची असतात.
8) चाफा :चाफा ही एक अशी वनस्पती असते जी आपल्याला सुंगधीत फुल देते.चाप्याच्या फुलाच्या विविध जाती असतात.त्याचे प्रत्येक फुल हे वेगवेगळया रंगाचे तसेच प्रकारचे असते.तसेच यांचा सुगंध देखील एकमेकांपेक्षा भिन्न स्वरुपाचा असतो.
9) जास्वंद :जास्वंद ही एक बहुवार्षिक वनस्पती आहे.जी आपल्याला फुले देत असते.जास्वंदीच्या फुलांना सुंगध नसतो पण ही वनस्पती खुप लोकप्रिय असलेली आपणास दिसुन येते.ही फुले मधमाशी,फुलपाखरे तसेच इतर पक्ष्यांना देखील आपल्याकडे आकर्षुन घेत असतात.पण हे फुल फार काळ टिकुन राहत नसते.
10) जाई :जाईच्या फुलापासुन आपल्याला सुगंधीत तेल तयार करता येत असते.जाईचे फुल आपण देवपुजेसाठी देखील वापरत असतो.जाईची फुले ही एक इंच इतकी असलेली आपणास आढळुन येतात.जाईची फुले ही संध्याकाळच्या वेळेस उमजत असतात आणि रात्री लवकर कोमेजत असतात.आपण अत्तर तयार करण्यासाठी देखील जाईचा वापर हा करत असतो.
11) जुई :
जुईच्या फुलाच्या संपुर्ण जगात दोनशे पेक्षा अधिक जाती असलेल्या आपणास आढळुन येते.जुईचे रंग हे पांढरे असते.जुईच्या फुलामध्ये आपल्याला पाच पाकळया दिसुन येते.जुईचे फुल हे हिमालय पर्वतावर उगवत असते आणि हे फुल एक इंच एवढे लांब असते.जुईचे फुल सुकवुन आपण त्याच्यापासुन चहा देखील बनवू शकतो.असे देखील म्हणतात की जुईचा रस पिल्याने आपले सर्व रोग दुर होत असतात.जुईच्या फुलांची लागवड ही दक्षिण भारतामध्ये अत्यंत विपुल प्रमाणात केली जात असते.
12) मोगरा – Botanical Name –Jasminum Sambac
:मोगराचे फुल हे पांढरे असते.त्याला कुठल्याही प्रकारच्या बिया नसतात.हे फुल आपल्याला तीन सेंटिमीटर असलेले दिसुन येते.मोगरा ह्या फुलाचा वापर आपण अत्तर तयार करण्यासाठी देखील करत असतो.
13) गोकर्ण :गोकर्णाची पांढरी फुले ही आपण औषध म्हणुन देखील वापर शकतो.गोकर्णाच्या फुलामध्ये कँल्शिअम मँग्नेशिअम तसेच पोटँशिअम चे प्रमाण देखील मोठया प्रमाणात असते.गोकर्णाच्या फुलाचा रस पिल्याने आपल्या शरीरातील कृमी देखील नष्ट होत असतात.गोकर्णाची फुले डोळयांसाठी अत्यंत उपयोगी असतात.
14) सोनचाफा : सोनचाप्याचे शास्त्रीय नाव मायकेलिया चंपका असे आहे.सोनचाफा हा चाप्याच्या फुलांचाच एक प्रकार आहे.सोनचाफयाच्या फुलामध्ये एकुण पंधरा किंवा वीस पाकळया असतात.ह्या फुलांचा सुगंध ताजे असल्यावर तसेच सुकल्यानंतर देखील येत असतो.सोनचाप्याची फुले छातीतील जळजळ आणि पोटातील मळमळ यावर देखील उपयोगी ठरतात.
15) शेवंती :शेवंती ह्या फुलाला फुलांची राणी असे संबोधिले जात असते.शेवंतीचे शास्त्रीय नाव हे क्रिसँथँअम इंडिकम असे आहे.शेवंतीच्या फुलाचा वापर हा फुलांच्या गुच्छ मध्ये तसेच हार बनवण्यासाठी केला जातो.आणि शेवंतीच्या फुलाच्या ४० जाती असतात.शेवंतीची फुले ही विविध रंग असलेली तसेच विविध आकार असलेली असतात.
16) तगर :तगरची फुले ही दोन प्रकारची असतात एक म्हणजे एकेरी पाकळया असलेली आणि दुसरी गुच्छात येत असलेल्या पाकळयांची.तगरची फुले ही पांढरी आणि नळीसारख्या आकाराची आणि पसरट देखील असतात.
17) बकुळ :बकुळ ही वनस्पती भारतात आढळुन येणारी वनस्पती आहे.जी आपल्याला सुगंधी फुले देण्याचे देखील काम करते.बकुळीची फुले ही खुपच नाजुक असतात.बकुळीच्या फुलांना कोणताही रंग असलेला आपणास दिसुन येत नाही.बकुळीच्या फुलांचा वास हा ती सुकल्यानंतर पण काही कालावधी साठी येत असतो.
18) सुरंगी :सुरंगीच्या फुलांचा वास मंत्रमुग्ध करणारा असतो.आणि हा वास स्त्रियांना आपल्याकडे आकर्षुन घेत असतो.ह्या फुलांचा गजरा करून केसात माळल्यानंतर तर हा वास राहतोच याचसोबत ह्या फुलांचा वास केसातुन गजरा काढुन झाल्यावर देखील दरवळत असतो.सुरंगीचे शास्त्रीय नाव ममिया सुरिगा असे आहे.
19) पारिजातकाचे फुल : Night Flowering Jasmine – पारिजात Night-Jasmine किंवा Night Blooming Jasmine
परिजातकाची फुले हदयासाठी खुप चांगली असतात.यांचा रस करून पिल्याने आपल्याला हदयरोगापासुन मुक्ती मिळत असते.परिजातकाची फुले जर आपण कुटुन मधात मिसळुन त्याचा रस पिला तर आपला खोकला देखील जात असतो.
पारिजातकाच्या फुलापासुन आपण हर्बल तेल तयार करू शकतो.परिजातकाच्या फुलांची हरसिंगार,शेफालिका,नालकुंकुमा,रागपुष्पी ह्या नावांनी देखील आपण ओळखतो.पारिजातकाच्या फुलाच्या एकुण फक्त पाच प्रजाती असलेल्या आपणास आढळुन येतात.
परिजातकाचे फुल हे देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे फुल आहे.असे म्हणतात हे फुल देवीला अपर्ण केल्याने देवी प्रसन्न होऊन आपल्याला आशिर्वाद देत असते.
20) अबोली :अबोलीच्या फुलाला चार किंवा पाच पाकळया असतात.हे फुले फार नाजुक देखील असतात.ह्या फुलांचा वापर केसात माळण्यासाठी जे गजरे तयार केले जातात त्यात केला जात असतो.
21) आँकिर्ड :आँकिर्डच्या फुलांच्या जवळजवळ पंचवीस ते तीस हजार इतक्या प्रजाती असतात.आँकिर्डच्या प्रत्येक प्रजतीतील फुलात रंग आणि आकार यात विविधता असलेली आपणास दिसुन येते.आँकिर्डची फुले कमीत कमी तीन महिने झाडावर राहुन सुदधा टवटवीत राहत असतात.