10th,12 The Pass Candidate Recruitment – सीमा सुरक्षा दलामध्ये दहावी बारावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू
सीमा सुरक्षा दलाच्या वतीने एक जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे.ज्यात असे दिले आहे की ए एस आय कंपोझिटर मशिनमन अणि एचसी इंकर अॅण्ड वेअर हाऊस इत्यादी पदासाठी सीमा सुरक्षा दलामध्ये भरती केली जात आहे.
सदर पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविणे देखील सुरू आहे.जे उमेदवार दहावी बारावी पासच्या बेसवर केंद्र सरकारची नोकरी प्राप्त करू इच्छित आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
ज्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल त्यांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
सर्व इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आॅनलाईन पद्धतीने सदर भरतीसाठी अॅप्लाय करायचे आहे.
अर्ज करण्याची सुरूवात –
ए एस आय कंपोझिटर मशिनमन अणि एचसी इंकर अॅण्ड वेअर हाऊस इत्यादी पदासाठी अर्ज करायला 4 फेब्रुवारी 2023 पासुन सुरूवात झाली आहे अणि ही अर्ज प्रक्रिया 6 मार्च 2023 पर्यंत चालणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख –
सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी 6 मार्च 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहे.
बीएस एफ आॅफिशिअल वेबसाईट –
HTTPS://BSF.GOV.IN/ ही बी एस एफची आॅफिशिअल वेबसाईट आहे.
भरती केल्या जात असलेल्या पदांचे नाव –
1)ए एस आय कंपोझिटर अॅण्ड मशिनमन -3 जागा
2) एचसी इंकर अॅण्ड वेअर हाऊसमॅन -2 जागा
एकुण पदसंख्या -5
शैक्षणिक पात्रतेची अट –
सदर भरतीसाठी उमेदवाराचे दहावी तसेच बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अणि त्याचा संबंधित क्षेत्रात डिप्लोमा देखील झालेला असावा.
ए एस आय कंपोझिटर अॅण्ड मशिनमन पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.त्याचा प्रिंटिंग क्षेत्रात किंवा इतर संबंधित ट्रेडमध्ये डिप्लोमा झालेला असावा.तसेच त्याने मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
एचसी इंकर अॅण्ड वेअर हाऊसमॅन पदासाठी अर्ज करणारया उमेदवाराचे किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.त्याला मुद्रण तंत्रज्ञानातील किमान तीन वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.
किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
वेतन –
ए एस आय कंपोझिटर अॅण्ड मशिनमन पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना किमान 29 हजार 200 रूपये ते जास्तीत जास्त 92 हजार 300 रूपये इतके मासिक वेतन दिले जाणार आहे.
एचसी इंकर अॅण्ड वेअर हाऊसमॅन पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 रूपये ते 81 हजार 100 रूपये इतके वेतन प्राप्त होणार आहे.
निवडप्रक्रिया –
सर्व पात्र उमेदवारांची अंतिम निवड ही शारीरिक मापन चाचणी, शारीरिक कार्यक्षमता चाचणी,लेखी परीक्षा डाॅक्युमेंट व्हेरीफिकेशन,अणि मेडिकल टेस्ट इत्यादींच्या आधारावर केली जाणार आहे.
अर्ज करण्याची फी शुल्क –
जे उमेदवार ओबीसी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना शंभर रुपये इतकी अर्ज फी भरावी लागणार आहे.जे उमेदवार एस सी एस टी कॅटॅगरी मधील आहेत त्यांना कुठलीही फी आकारण्यात येणार नाही.
वयोमर्यादा अट –
सदर पदांसाठी किमान वयाची अट 18 ठेवण्यात आली आहे तर कमाल वयोमर्यादा 25 वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.
आँनलाईन अर्ज करण्याची लिंक –
HTTPS://RECTT.BSF.GOV.IN/