सुर्यनमस्कार म्हणजे काय?सुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत? – 20 Benefits of Surya Namaskar

सुर्यनमस्कार म्हणजे काय?सुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत? –

20 Benefits of Surya Namaskar

मित्रांनो सुर्यनमस्काराविषयी आपण लहानपणी अनेक प्रौढ व्यक्तींच्या तोंडुन ऐकलेले असते.तसेच मोठे झाल्यावर आपण देखील हा व्यायाम करायला लागत असतो.

कारण डाँक्टर फिटनेस ट्रेनर,योगा टिचर देखील आपणास हा व्यायाम करायचा नेहमी सल्ला देत असतात.

कारण सुर्यनमस्कार करणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक चांगला व्यायाम मानला जातो.याचे आपणास अनेक शारीरीक तसेच मानसिक फायदे देखील प्राप्त होत असतात.

आजच्या लेखात आपण ह्याच सुर्यनमस्कारविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.

सुर्यनमस्कार म्हणजे काय?

सुर्य नमस्कार म्हणजे सुर्याकडे केलेली प्रार्थना होय.आज अनादी कालापासुन ही प्रथा चालु आहे की रोज सकाळी लोक लवकर झोपेतून उठतात.आणि सुर्याकडे प्रार्थना करत असतात.

आपण सुर्य नमस्कार कधी करायला हवा?

सुर्य नमस्कार आपण रोज सकाळी झोपेतुन उठल्यावर अनशापोटी करायला हवा तो ही उगवत्या सुर्यासमोर मोकळया पटांगणात करायला हवा.

रोज किती सुर्यनमस्कार घालावे?

ज्यांनी नवीनच सुर्यनमस्कार करायची सुरूवात केलेली असेल आणि त्यांना याआधी याची अजिबात सवय नाहीये त्यांनी दोन ते तीन सुर्यनमस्कार घालावे.

आणि आजारी नसलेल्या निरोगी व्यक्तीने नियमित सुर्यनमस्कार करणारया व्यक्तीने किमान 30 वेळा सुर्यनमस्कार घालावा.एका मिनिटाला दोन सुर्यनमस्कार केले तरी आपण पंधरा वीस मिनिटांत सर्व पुर्ण करू शकतो.

सुर्यनमस्कार करण्याचे 20 फायदे कोणकोणते आहेत?

सुर्यनमस्काराचे करण्याचे काही महत्वाचे 20 फायदे पुढीलप्रमाणे आहेत-

1)सुर्य नमस्कार केल्याने आपले आरोग्य नेहमी उत्तम राहत असते.आपल्याला कधीही कुठला विकार जडत नाही.

2) ज्या लोकांना लठठपणाचा त्रास जाणवत असेल त्यांनी जर नियमितपणे सुर्यनमस्कार केला तर त्यांची पोटाची चरबी देखील कमी होण्यास मदत होते.

See also  Term insurance आणि health insurance मध्ये काय फरक आहे? Difference between Term insurance and health insurance

3) जर आपण रोज सुर्यनमस्कार केला तर आपल्या पचन क्रियामध्ये देखील चांगली सुधारणा होऊ लागते ज्यांना बदधकोष्ठतेचा आणि अपचनाचा त्रास जाणवत असेल अशा व्यक्तींसाठी सुर्यनमस्कार करणे अत्यंत फायदेशीर ठरत असते.

4)जे व्यक्ती नियमितपणे सुर्यनमस्कार करतात त्यांचे शरीर लवचिक बनते.

5) जे व्यक्ती नियमित सुर्यनमस्कार करतात ते नेहमी तरुण दिसत असतात आणि त्यांच्या चेहरयावर देखील एक तेज उत्साह तसेच चमक दिसुन येत असते.

6) जे व्यक्ती नियमित रोज सकाळी सुर्यनमस्कार करत असतात त्यांची स्मरणशक्ती देखील चांगली राहत असते.

7) जर आपण नियमित सुर्यनमस्कार केला तर आपली सर्व ताणतणाव चिंता दुर होत असते.आणि आपणास एकदम शांत आणि हलके वाटु लागते.

8) सुर्यनमस्कार केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढत असते.

9) सुर्यनमस्कार केल्याने आपल्या एकाग्रतेमध्ये देखील वाढ होत असते.

10) नियमित सुर्यनमस्कार केल्याने आपली हाडे देखील मजबूत होत असतात.

11) रोज सुर्यनमस्कार केल्यास आपल्या शरीरात एक नवीन तसेच सकारात्मक उर्जा निर्माण होत असते.

12) जे आपले केस पांढरे होत असतात केसांमध्ये जी कोंडा तयार होण्याची समस्या आपणास जाणवते यापासुन आपले सुर्यनमस्कार केल्याने संरक्षण होत असते.

13) सुर्यनमस्कार केल्याने आपल्या शरीराला लवचिकता तर येतेच शिवाय आपल्या पाठीचा कणा देखील ताठ आणि मजबुत होत असतो.

14) सुर्यनमस्कार केल्याने आपणास ब्लडप्रेशर आणि हार्टशी संबंधित कुठलीही समस्या जाणवत नाही.

15) जर आपले सांधे दुखत असतील तर सुर्यनमस्कार केल्याने ते देखील दुखणे बंद होते.

16) जे व्यक्ती नियमित सुर्यनमस्कार करतात त्यांना झोपेची कुठलीही समस्या उदभवत नाही.

उदा, कमी झोप येणे,झोप पुर्ण न होणे.

17) गर्भवती महिलांना जाणवत असलेल्या मासिक पाळीच्या अनेक समस्या देखील सुर्यनमस्कार केल्याने दुर होत असतात.

18) जे व्यक्ती रोज सकाळी सुर्यनमस्कार करतात त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा हा सुरळितपणे होत असतो.

See also  व्हिनेगर म्हणजे काय? Vinegar meaning in Marathi

19) जर आपण सुर्यनमस्कार करून आपल्या दिवसाचा आरंभ केला तर आपले शरीर अणि मनासाठी हे उत्तम ठरते.

20) सगळयात महत्वाचे म्हणजे सुर्यनमस्कार केल्याने आपणास मानसिक शांतता देखील प्राप्त होत असते.