रामसे हंट सिंड्रोम विषयी माहीती – Ramsay hunt syndrome information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Table of Contents

रामसे हंट सिंड्रोम विषयी माहीती Ramsay hunt syndrome information in Marathi

मित्रांनो अत्यंत सुप्रसिद्ध गायक म्हणून ओळखल्या जात असलेल्या जस्टीन बिबर याने नुकताच काही दिवसापुर्वी सोशल मीडियावर आपला एक व्हिडिओ शेअर केला होता.

ज्यात त्याने असे सांगितले आहे की त्याला एक आजार झाला आहे ज्याचे नाव रामसे हंट सिंड्रम असे आहे.

आपल्या टविटर अकाऊंट वरून टविट करत जस्टिनने आपल्या चाहत्यांना असे कळविले आहे की त्याला अधार्गवायु झाला आहे.

मी लवकर ह्या आजारातुन बरे होण्यासाठी सर्व चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना करावी अशी विनंती देखील टविट करत त्याने आपल्या चाहत्यांना केली.

याचकरीता जस्टिन बीबरने त्याचे इतर कार्यक्रम देखील काही दिवसांसाठी रदद करण्याचे ठरवले आहे.

म्हणुन ह्या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन याविषयीची सर्व महत्वाची माहीती प्राप्त करणे आपल्यासाठी फार गरजेचे झाले आहे जेणेकरून आपल्यापैकी कोणाला जर हा आजार जडला तर आपण वेळ असता यावर उपचार करू शकतो.

चला तर मग जाणुन घेऊया ह्या आजाराविषयी अधिक सविस्तरपणे.

See also  बिलिरूबीन टेस्ट म्हणजे काय?bilirubin test information

रामसे हंट सिंड्रम काय आहे?

रामसे हंट सिंड्रम हा एक न्यूराँलाँजिकल पदधतीचा विकार आहे.

रामसे हंट सिंड्रम हा विकार कोणत्या विषाणुमुळे जडतो?

रामसे हंट सिंट्रम हा विकार आपणास व्हीझेड व्ही नावाच्या एका विषाणुमार्फत जडत असतो.

रामसे हंट सिंड्रम आजार जडल्यावर लहान मुलांना याचा काय त्रास होत असतो?

रामसे हंट सिंड्रम हा एक असा आजार आहे जो जडला की लहान बालकांना कांजिण्य होत असते.

रामसे हंट सिंड्रम आजार जडल्यावर मोठया माणसांवर याचा काय परिणाम होत असतो?त्यांना याच्यामुळे काय त्रास होत असतो?

रामसे हंट सिंड्रम आजार जडल्यावर मोठया माणसांच्या त्वचेवर याचा परिणाम होत असतो.त्यांच्या त्वचेवर चटटे येत असतात.कान आणि चेहरयाच्या अवतीभोवती पुळया झाल्याने रुग्णास अस्वस्थ वाटु लागते.

रामसे हंट सिंड्रम ह्या आजाराची प्रमुख लक्षणे कोणकोणती आहेत?

● हा आजार जडलेल्या रूग्णाच्या कानात जोरजोरात वेदना होत असतात.

● हा आजार जडलेल्या रूग्णाच्या समस्त चेहरयावर कातडीवर पुळया येऊ लागतात.याचसोबत त्याच्या जिभेवर देखील फोड,पुळया येऊ लागतात.

● कानामधील पडद्यामध्ये तसेच कानातील इतर पेशींत देखील पुळया येऊ लागतात.

● हा आजार जडल्यावर रूग्णास एका कानाने ऐकायला अडथळा होत असतो.चक्कर आल्यासारखे वाटु लागते.

● हा आजार जडलेल्या व्यक्तीच्या चेहरयाची एक बाजु ही सुजल्यासारखी वाटते

● डोळे देखील दुखत असतात.

रामसे हंट सिंड्रम ह्या आजाराविषयी तज्ञांचे काय मत आहे?

रामसे हंट सिंड्रम विषयी सांगताना तज्ञ म्हणाले आहे की हा विकार जडलेल्या व्यक्तीस काय त्रास होत असतो.त्याच्या कुठल्या अवयवावर काय परिणाम होताना दिसुन येतो?ह्या आजाराची लक्षणे कोणकोणती असतात हे आपणा सर्वास माहीती असणे फार आवश्यक आहे.

ह्या आजाराविषयी जस्टिन बिबरला जो काही त्रास झाला आहे त्याचे त्याने तज्ञांना स्पष्टीकरण देखील दिले आहे.

रामसे हंट सिंड्रम हा आजार किती गंभीर स्वरूपाचा आहे?

● ह्या आजाराचे विषाणु आपल्या मज्जातंतुला हानी पोहचवत असतात.आपल्या चेहरयाला लकवा येत असतो.

See also  Surrogacy म्हणजे काय ? प्रक्रिया,आव्हानं व फायदे - Surrogacy detailed information in Marathi

● ह्या आजारात आपल्या शरीराचा डावा भाग बधिर पडल्यागत होत असतो.

● कानाला दुखापत होते आणि बहिरेपणा देखील येत असतो.

पण जर ह्या आजारावर योग्य वेळी म्हणजेच तो नियंत्रणाच्या बाहेर जाण्या अगोदर उपचार केले तर हा आजार बरा देखील होत असतो.आणि वेळ असता यावर उपचार केले गेले नाहीतर तर हा आजार नियंत्रणाबाहेर देखील जाऊ शकतो.अणि आपण कायमचे बहिरे देखील होऊ शकतो.

रामसे हंट सिंड्रम हा आजार किती वयोगटातील लोकांना होण्याची अधिक शक्यता असते?

रामसे हंट सिंड्रम हा आजार साधारणत ज्यांचे वय साठ पेक्षा अधिक आहे अशा वयोगटातील लोकांना होण्याची अधिक शक्यता असते.

रामसे हंट सिंड्रम हा आजार जडल्यास डाँक्टरांकडे उपचारासाठी रूग्णाने कधी जायला हवे?

रामसे हंट सिंड्रम आजार झाल्यास आपल्या चेहऱ्यावर अर्धांगवायू झाल्यासारखे होते आणि चेहरयावर देखील पुरळ दिसू लागतात अशावेळी आपण लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

आजार जडल्यानंतर पहिल्या तीन दिवसांच्या आत जर यावर उपचार घेतला गेला तर ह्या आजाराचा दीर्घकाळ टिकणारा परिणाम दूर होत असतो.

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा