आपणास पडणारी स्वप्रे त्यांचे अर्थ अणि त्यामागचे शुभ अशुभ संकेत – Dreams and their meaning and signs

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

आपणास पडणारी स्वप्रे त्यांचे अर्थ अणि त्यामागचे शुभ अशुभ संकेत – Dreams and their meaning and signs

1)स्वप्नात पुर दिसणे याचा काय अर्थ होत असतो?

जर आपणास स्वप्नात पुर दिसत असेल तर हे अशुभतेचे धोक्याचे लक्षण मानले जात असते.अशावेळी आपण कोणतेही काम करताना सजगता बाळगायला हवी.

2) स्वप्नात पाऊस पडताना दिसणे याचा काय अर्थ होत असतो?

स्वप्नात पाऊस पडताना दिसणे याचा अर्थ असा होत असतो की लवकरच भविष्यात काहीतरी शुभ कार्य घडणार आहे.

3) स्वप्रामध्ये स्वताला समुद्र पाहताना बघणे याचा काय अर्थ होत असतो?

जर आपणास स्वप्रामध्ये आपण समुद्राकडे पाहतो आहे असे दिसत असेल की तर हा संकेत असतो की आपण कुठेतरी चुकतो आहे आणि आपण आपली चुक लवकरात लवकर सुधारायला हवी.

4) स्वप्नात पाणी उकळताना दिसणे याचा काय अर्थ होतो?

जर आपणास स्वप्नात पाणी उकळताना दिसुन येत असेल तर हा संकेत असतो की लवकरच आपल्यावर काहीतरी संकट येऊ शकते.

5) स्वप्नात आपण नदी ओलांडतो आहे असे दिसणे याचा काय अर्थ होत असतो?

जर आपणास स्वप्नात असे दिसत असेल की आपण एखादी नदी ओलांडतो आहे तर समजुन जावे की संकेत आहे की लवकरच आपला भाग्योदय होणार आहे.

6) स्वप्नात कच्चा आंबा दिसुन येणे याचा काय अर्थ होत असतो?

जर आपल्याला स्वप्नात कच्चा आंबा दिसुन येत असेल तर हा संकेत आहे की लवकरच आपल्यावर पैशांची उधळण होणार आहे.आपल्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे.

7) गरोदर महिलेस स्वप्नात आंबा दिसणे याचा काय अर्थ होत असतो?

जर एखाद्या गरोदर महिलेस स्वप्रांमध्ये आंबा दिसत असेल तर तिला पुत्ररत्न प्राप्त होण्याचा हा संकेत असतो.

8) स्वप्नात सोने दिसणे याचा काय अर्थ होत असतो?

स्वप्नात सोने दिसणे हा लवकरच आपणास धनप्राप्ती होणार असल्याचा संकेत असतो.

See also  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ फोटो - Babasaheb Ambedkar Jayanti 2023- Dr. Babasaheb Ambedkar Jayanti rare Images Download

9) स्वप्नात मुंग्या दिसणे याचा काय अर्थ होत असतो?

जर आपणास स्वप्नात मुंग्या दिसुन येत असतील तर हा देखील एक शुभ संकेत आहे.याचा अर्थ लवकरच आपल्याला धनप्राप्ती होणार आहे.

10) स्वप्रामध्ये गाय दिसुन येणे याचा काय अर्थ होत असतो?

स्वप्नात गाय दिसुन येणे याचा अर्थ असा होतो की लवकरच आपणास सुख समृदधी आणि धनाची प्राप्ती होणार आहे.

11) स्वप्नात बिबटयाचे दिसणे याचा काय अर्थ होत असतो?

जर आपणास स्वप्नात बिबटया दिसुन येत असेल तेव्हा याचा अर्थ असा होतो की लवकरच आपल्याला यशाच्या एका उंच शिखराला गाठता येणार आहे.

12) स्वप्नात साप दिसणे याचा काय अर्थ होत असतो?

समुद्रशास्त्रानुरूप स्वप्नात साप दिसणे हे शुभ असते.लवकरच आपल्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दुर होणार आहे.आपल्या कार्यक्षेत्रात लवकरच यशाची प्राप्ती होणार आहे असा संकेत यामागे असतो.

13)स्वप्नात गणपती दिसुन येणे याचा काय अर्थ होत असतो?

जर आपणास स्वप्नात गणपती दिसुन येत असेल तर याचा अर्थ होतो की आपल्याला लवकरच एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे.किंवा घरात एखादे मंगलकार्य घडणार आहे.

14) स्वप्नात लहान बाळ दिसण्याचा काय अर्थ होत असतो?

स्वप्नात लहान मुल दुध पिताना दिसणे हा एक शुभ संकेत मानला जातो.याचा अर्थ असा होत असतो की लवकरच आपल्या सर्व ईच्छा पुर्ण होणार आहेत.

स्वप्नात एकाच वेळी खुप मुले खेळताना दिसणे याचा अर्थ होतो देवाने आपणास वरदान दिले आहे.

15) स्वप्नात स्वताचे लग्न होताना दिसुन येणे याचा काय अर्थ होत असतो?

स्वप्नात जर आपल्याला आपले लग्न होत असल्याचे दिसुन येत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या नवीनतम तसेच वैवाहिक जीवणाचा विचार करीत आहे.ज्यात जाँब,करिअर,मँरेज इत्यादींचा समावेश होत असतो.

16) स्वप्रामध्ये मंदिर दिसुन येणे याचा काय अर्थ होत असतो?

See also  नारळी भात कसा बनवतात? - Narali Bhaat- Sweet Coconut Rice

स्वप्नात मंदीर दिसून येणे हा एक शुभसंकेत मानला जातो.स्वप्नात जर आपणास मंदिरातील कलश दिसुन येत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये लवकरच लक्ष्मीचा वास होणार आहे.

17) स्वप्रामध्ये शिवलिंग दिसणे याचा काय अर्थ होत असतो?

स्वप्रामध्ये शिवलिंग दिसुन येणे हा एक शुभ संकेत मानण्यात येतो.याचा अर्थ लवकरच आपली प्रगती होणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा