भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2022 विषयी माहीती – Maharashtra Swadhar Yojana

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Table of Contents

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2022 विषयी माहीती -Maharashtra Swadhar Yojana

आपले महाराष्ट्र शासन राज्यातील विदयार्थ्यांच्या उज्वल भवितव्याकरीता नेहमी नवनवीन महत्वाच्या योजना सुरू करत असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही सुदधा महाराष्ट्र शासनाची अशीच एक महत्वाची योजना आहे.

आज आपण ह्या बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही शासनाकडून विदयार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक विशेष योजना आहे.ह्या योजनेच्या मार्फत विदयार्थ्यांना भोजन,निवास तसेच निर्वाह भत्ता दिला जात असतो.

एवढेच नव्हे तर विदयार्थ्यांना ह्या योजनेअंतर्गत शैक्षणिक सुविधा प्राप्त करण्यासाठी तसेच वर्षभराच्या खर्चासाठी विदयार्थ्यांना अनुदान देखील दिले जाते.

ही अनुदानाची रक्कम विदयार्थ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जात असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरूवात कधी करण्यात आली होती?

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरूवात २०१६-२०१७ साली करण्यात आली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना का सुरू करण्यात आली आहे?

महाविद्यालयांमध्ये अँडमिशन घेणारया मागासवर्गीय विदयार्थी वर्गाची दिवसेंदिवस संख्या ही वाढतच चालली आहे.अणि ह्याच मुळे होस्टेल सुविधेचा देखील तुटवडा भासत आहे.

See also  बी एड अणि डीएड मधील फरक | Difference between BED and DED in Marathi

ज्याचा अत्यंत वाईट परिणाम बाहेरगावी अँडमिशन मिळालेल्या मागासवर्गीय विदयार्थ्यांना भोगावा लागत असतो.काही गरीब विदयार्थी राहण्या खाण्याची सोय नही म्हणुन काँलेजमध्ये अँडमिशन घेणे टाळत असतात.

अशा गरजू गरीब मागासवर्गीय कुटुंबातील विदयार्थ्यांची राहण्या खाण्याची सोय व्हावी म्हणुन ही बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात आहे.

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ कोणाकोणाला घेता येईल?

अकरावी,बारावी पदवी तसेच पदव्युत्तर व्यासायिक बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसुचित जाती जमाती तसेच नवबौदध विदयार्थी ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बाबासाहेब आंबेडकर योजनेसाठी अर्ज कशापदधतीने करायचा आहे?

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थ्यांना आँनलाईन पदधतीने अर्ज डाउनलोड करायचा आहे.

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विदयार्थी स्वता आपल्या अँड्राईड मोबाइल तसेच लँपटाँप वरून योजनेच्या आँफिशिअल साईटवर जाऊन आँनलाईन अर्ज डाउनलोड करू शकता.म्हणजेच अर्ज घेण्यासाठी सरकारी कार्यालयात चक्रा मारण्याची आवश्यकता देखील विदयार्थ्यांना पडणार नहीये.

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा मुख्य हेतु काय आहे?

● असे गरजु गरीब मागासवर्गीय विदयार्थी जे आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी आपले गाव सोडुन दुसरया शहरात शिक्षणासाठी जातात अशा गरजवंत विदयार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी हे योजना सुरू केली गेली आहे.जेणेकरून त्या विदयार्थ्यांना आपल्या राहण्या खाण्याचा तसेच शिक्षणाचा बेसिक खर्च तरी स्वता करता येईल.

● विदयार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे.

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे मुख्य फायदे कोणते आहेत?

● बाबासाहेब आंबेडकर योजनेमुळे राज्यातील गरीब मागासवर्गीय कुटुंबातील विदयार्थी आत्मनिर्भर अणि सक्षम बनणार आहे.त्यांच्या जीवनमानात सुधारणा होऊन सामाजिक अणि शैक्षणिक विकास होणार आहे.

● घरची कौटुंबिक आर्थिक परिस्थिति कमकुवत असलेल्या मागासवर्गीय विदयार्थ्यांना आपले शिक्षण पुर्ण करण्याकरीता कोणावरही आर्थिकदृष्टया विसंबुन राहावे लागणार नाहीये.कारण ह्या योजनेमुळे त्यांना एक आर्थिक साहाय्य प्राप्त होणार आहे.

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विदयार्थ्यांना किती आर्थिक मदत दिली जाते?

See also  भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड मार्फत विविध पदांकरीता भरती सुरू - BEL recruitment 2023 in Marathi

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत विदयार्थ्यांना ६० हजार पर्यतची आर्थिक मदत दिली जाते.प्रत्येक विदयार्थ्याला त्याच्या प्रवर्गानुसार यात अनुदान दिले जात असते.

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत?

● अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मुळ रहिवासी असणे गरजेचे आहे.

● अर्जदार अनुसुचित जाती जमाती मधील तसेच नवबौदध असणे आवश्यक आहे.

● योजनेचा लाभ घेण्याकरीता विदयार्थ्याला दहावी,बारावी पदवी तसेच पदविका परीक्षेमध्ये किमान ६० ट्क्के असणे अनिवार्य आहे.अणि दिव्यांग विदयार्थीना ही मर्यादा ५० टक्के इतकी ठेवण्यात आली आहे.

● विदयार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५ लाख यापेक्षा अधिक नसावे.

● विदयार्थी जिथे राहतो तिथेच शिक्षण घेत नसावा.तसेच तो आपल्या जिल्हयाच्या बाहेर शिक्षण घेत असावा.

● विदयार्थ्यांची निवड त्याची गुणवत्ता बघुन केली जाईल.

● विदयार्थी आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावा.

● विदयार्थीचे बँक खाते त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक असायला हवे.

● जो विदयार्थी शासकीय वसतिगृहात वास्तव्यास असेल त्याला ह्या योजनेचा लाभ प्राप्त होऊ शकत नही.

● जो विदयार्थी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी माहीती देईल बनावट कागपत्रे जमा करेल तसेच आपला शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण करणार नाही त्याला योजनेकरीता अपात्र ठरवले जाईल.

● जे विदयार्थी बीपीएल कुटुंब धारक आहे त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.

स्वाधार योजनेअंतर्गत क्षेत्रानुसार अनुदानाची रक्कम किती आहे?

  • जे विदयार्थी ठाणे,पुणे,नागपुर,मुंबई,नवी मुंबई,मुंबई उपनगर पिंपरी चिंचवड भागात शिक्षण घेत आहेत त्यांना भोजन भत्ता ३१ ते ३२ हजार पर्यत दिला जातो.
  • निवासभत्ता २० ते २१ हजार इतका अणि निर्वाह भत्ता ९ ते १० हजार दिला जात असतो.
  • उर्वरीत महसुल विभागा मधील शहरात तसेच क गट महापालिका क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विदयार्थी वर्गाला भोजनभत्ता २८ हजार निवासभत्ता १५ हजार,अणि निर्वाहासाठी ८ हजार दिले जातात.
  • बाकी क्षेत्रातील शिक्षण घेत असलेल्या विदयार्थी वर्गाला २५ हजार पर्यत भोजन भत्ता अणि बारा हजार पर्यत निवास भत्ता दिला जात असतो.अणि निर्वाहासाठी ६ ते ७ हजार दिले जातात.
  • जे विदयार्थी अभियांत्रिकी अणि वैद्यकीय शाखेत शिक्षण घेत आहे त्यांना दरवर्षी ५ ते ६ हजार दिले जात असतात.अणि इतर शाखेतील विदयार्थी वर्गाला दोन ते तीन हजार रूपये दिले जात असतात.
See also  इव्हेंट मॅनेजर कसे बनावे?How to become Event manager

 

बाबासाहेब आंबेडकर योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे?

ह्या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी विदयार्थीने आपल्या जिल्हयामधील समाज कल्याण विभागात जायचे तिथुन योजनेचा अर्ज घ्यायचा.

किंवा आपण योजनेच्या आँफिशिअल वेबसाइट वर जाऊन आँनलाईन देखील हा अर्ज डाउनलोड करू शकतो.

अर्जामध्ये विचारलेली सर्व माहीती व्यवस्थित भरायची त्याला आवश्यक ते डाँक्युमेंट जोडायचे अणि भरलेला फाँर्म समाज कल्याण विभागात जाऊन जमा करायचा आहे.

बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी लागणारे महत्वाचे डाँक्युमेंटस कोणते आहेत?

● अर्जाचा नमुना

● शाळा सोडल्याचा दाखला

● दहावी पास सर्टिफिकेट

● जन्म दाखला

● स्कुल लिव्हिंग सर्टिफिकेट एल सी

● कास्ट सर्टिफिकेट

● उत्पन्न दाखला

● आईवडीलांचे घोषणापत्र

● मुख्याध्यापकाचे सर्टिफिकेट तसेच शिफारस पत्र

● महाविद्यालयामधील उपस्थितीचे प्रमाण

● विदयार्थ्याने कुठल्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नाहीये असे शपथपत्र

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा