असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी जे कार्य आपण करतो किंवा जे काही दान आपण करतो त्याचे अखंड फळ आपणास प्राप्त होत असते.
आजच्या लेखात आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या वस्तुचे दान केल्यावर आपणास कोणते अक्षय फळ प्राप्त होऊ शकते हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
असे म्हटले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण दही तसेच भाताचे दान केले तर आपल्या घरावर येणारी जी काही वाईट बाधा आहे संकट आहे ते दुर होत असते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे तर्पण केल्यास घरातील सर्व दारिद्र्य दुख गरीब नाहीशी होते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी जी व्यक्ती धान्याचे दान करते तिला अकालमृत्युचे भय राहत नाही.अशा व्यक्तीस अकाल मृत्यू येत नसतो.
अक्षय तृतीयेच्या दिवशी जे विद्यार्थी दही,ताक,दुधाचे दान करतात त्यांना करिअरमध्ये विद्या प्राप्तीमध्ये चांगले भरघोस यश प्राप्त होत असते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी गोरगरीबांना गरजु लोकांना वस्त्र दान केल्याने आपली सर्व रोगराई आजार दुर होत असतात.
अक्षय तृतीयेच्या दिवशी विवाहित महिलांनी कुंकु दान करायला हवे याने पतीला दीर्घायुष्य प्राप्त होत असते.समाजात त्यांच्या असलेल्या मान प्रतिष्ठा मध्ये अधिक वाढ होते.
ज्यांना राजकीय क्षेत्रात यश प्राप्त करायचे आहे अशा व्यक्तींनी ह्या दिवशी खाऊची नागीन तसेच विडयाची पाने दान करायला हवीत.
अक्षय तृतीयेच्या दिवशी गादी किंवा चटईचे दान केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते.
जे व्यक्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पायातील वाहन दान करतात त्यांना आपल्या सर्व पापांपासून मुक्ती प्राप्त होते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी नारळाचे दान केल्याने पितरांना मुक्ती प्राप्त करून देण्यास मदत होते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी फळांचे दान केल्याने आपणास आपल्या करिअर करत असलेल्या क्षेत्रात उच्च पदप्राप्ती होत असते.
ह्या दिवशी जल किंवा पानसुपारी दान केल्याने वैभव ऐश्वर्य प्राप्त होते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी गोरगरीबांना मिठाई लाडु इत्यादी गोड पदार्थ दान करणे शुभ मानले जाते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी गुरू दक्षिणा दिल्याने शिष्याला एकदम उच्च प्रतीचे ज्ञान प्राप्त होते.
अक्षय तृतीयेला गोरगरीबांना मातीचा माठ तसेच एखादे रांजण दान करणे शुभ मानले जाते.माठातील पाणी पिल्याने आरोग्य उत्तम राहते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवसापासून माठातील पाणी पिण्यास सुरुवात होत असते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी पापांपासून मुक्ती प्राप्त करायला गोरगरीबांना जवस दान केले जाते.हिंदु धर्मशास्त्रात सांगितले आहे की जवस हे कनक सोन्याच्या बरोबरीचे असते.अक्षय तृतीयेच्या दिवशी जवस दान केल्याने घरामध्ये सुख समृद्धी वैभव ऐश्वर्य येत असते.
पुराणात असे सांगितले आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी जी व्यक्ती जलदान पाण्याचे दान करते तिला अक्षय पुण्य प्राप्त होते.
अक्षय तृतीयाला जर आपण दाळ पीठ तांदुळ इत्यादी अन्न पदार्थाचे दान केले तर माता अन्नपूर्णा आपल्या घरावर प्रसन्न होत असते अणि आपल्या घरात कधीही अन्नाचा तुटवडा भासत नाही.
अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबे देखील दान केले जातात.उन्हाळा असल्याने आंब्याला खुप मागणी देखील असते हे एक आरोग्यदायी फळ आहे जे उन्हाळ्यात खायला मजा येते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या अंगणासमोर, मंदिराच्या अवतीभवती, रस्त्यांच्या दोन्ही बाजुला डोंगर माथ्यावर वृक्ष लागवड केल्याने अखंड पुण्याची प्राप्ती होते.हया लागवड केलेल्या झाडांची निगा राखल्यास आपले पुण्य कधीच संपत नसते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करू नये?
अक्षय तृतीयेच्या दिवशी कुठलेही कर्ज काढणे टाळावे कारण हे घेतलेले कर्ज अक्षय आपल्यावर राहते असे म्हटले जाते.हे कर्ज लवकर फीटत नसते.