आँटिस्टिक प्राईड डे विषयी माहीती – Autistic Pride Day in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

आँटिस्टिक प्राईड डे विषयी माहीती Autistic Pride Day in Marathi

मित्रांनो आजच्या लेखात आपण एका अशा खास दिवसाविषयी माहीती जाणुन घेणार आहोत ज्याचे नाव आँटिस्टिक प्राईड डे असे आहे.

आँटिस्टीक प्राईड डे हा असा दिवस आहे जो आँटिस्टिक मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी,त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जनतेत अशा रूग्णांविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी,स्वताविषयी अशा रूग्णांमध्ये अमिमान निर्माण व्हावा यासाठी दरवर्षी साजरा केला जात असतो.

चला तर मग जाणुन घेऊया ह्या दिवसाविषयी अधिक सविस्तरपणे.

आँटिस्टीक म्हणजे काय?

आँटिस्टीक म्हणजे स्वमग्न,नेहमी स्वताच्या वेगळया विश्वात मग्न असणारा.स्वताच्या विचारात नेहमी गुंग असलेला.

आँटिस्टिक प्राईड डे कधी साजरा केला जातो?

आँटिस्टिक प्राईड डे दरवर्षी 18 जुन रोजी साजरा केला जात असतो.

आँटिस्टिक प्राईड डे का साजरा केला जात असतो?

जगभरातील लोकांत स्वमग्नेतेबददल जागृकता अभिमान निर्माण करण्याकरीता हा दिवस साजरा केला जात असतो.आँटीझमने ग्रस्त असलेली मुले ही रोगी नसतात तर ते दिव्यांग असतात.हा संदेश समाजापर्यत पोहचवण्यासाठी दरवर्षी 18 जुन रोजी हा दिवस साजरा केला जात असतो.

ज्या बालकांना आँटिझम आहे अशी बालके वेगवेगळयात कलेत निपुन असलेले उत्तम कलाकार असतात.कंप्युटर आँपरेट करण्यात एक्सपर्ट असतात.अशी बालके गणितात देखील पारंगत असतात.हे समाजाला पटवून देण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जात असतो.

See also  फक्त बोलण्याच्या शैलीवरुन‌ एखाद्या व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीमत्व कसे जाणुन घ्यायचे? - How to know the personality of a person from the style of speaking?

आँटिस्टीक प्राईड डे हा सर्वप्रथम कधी साजरा करण्यात आला होता?ह्या दिवसाचा इतिहास काय आहे?

आँटिस्टिक प्राईड डे हा सर्वप्रथम 2005 सालामध्ये एका आँनलाईन गृपकडुन साजरा करण्यात आला होता.

2005 मध्ये हा दिवस सगळयात पहिले Aspies for Freedom नावाच्या एका गटाने साजरा केला होता.

अँस्पिस फाँर फ्रिडम हे एका अशा गृपचे नाव आहे जो विशेषकरून ऑटिस्टिक मुलांसाठी कार्य करतो आणि यासाठीच हा तयार केला गेला आहे.

आँटिझम म्हणजे काय?

आँटीझम हा एक आजार आहे ज्यात मुलांच्या मेंदुचा पाहिजे तेवढा विकास होत नसतो.असा आजार जडलेली मुले सर्वापासुन दुर राहणे अधिक पसंद असतात.

आँटिझम हा आजार जडण्याची कारणे कोणकोणती असतात?

● आनुवांशिकता हे आँटिझम आजार जडण्याचे प्रथम कारण असु शकते.

● 26 आठवडे पुर्ण होण्याच्या आधी बाळंतपण होणे,

● कमी वजन असलेले बालक

● गर्भवती स्त्रीचे वय अधिक असणे.

● थाँलीडोमाईड व्हँलप्रोईक सारखी औषधे गर्भवती असताना घेणे

आँटिझम ह्या आजाराची लक्षणे कोणकोणती असतात?

आँटिझम ह्या आजाराची काही प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत –

1)आँटिझम आजार जडलेली मुले कोणाच्याही सोबत नजरेला नजर मिळवून बोलत नाही.अशी मुले आपल्याच एका वेगळया हरवलेली रमलेली असतात.

2) अशा मूलांना कुठलीही भाषा शिकताना अडचण येत असते.

3) आँटीझमने ग्रस्त असलेली बालके इतर बालकांपेक्षा अलग असतात.

4) कोणाचाही आवाज ऐकल्यावर त्याला ही मुले झटकन प्रतिक्रिया देऊ शकत नसतात.

5) अशी मुले नीट कुठल्याही गोष्टीत कामात लक्ष देऊ शकत नसतात कोणाशी हसत हसत तसेच बोलत नसतात.

आँटिझम ह्या आजारावर कोणकोणते उपचार केले जात असतात?

आँटिझम हा आजार जडलेल्या मुलाची अवस्था बघुन त्याच्यावर कोणते उपचार करायचे हे डाँक्टरांकडुन ठरवले जात असते.

अशा आजाराने ग्रस्त मुलांवर पालकांनी विशेष लक्ष द्यायला हवे असते.अशा बालकांवर पुढीलप्रमाणे वेगवेगळया थेरपींदवारे उपचार केले जात असतात –

See also  ब्राह्मण भुषण पुरस्काराचे स्वरूप काय असते?हा पुरस्कार कोणाला दिला जातो? Brahman Bhushan Puraskar To Marathi Actor Prashant Damle

1)आँक्युपेशन थेरपी :

2) बिव्हेव्हीरल थेरपी :

3) स्पीच थेरपी :

4) आय काँन्टँक्ट थेरपी :

5) म्युझिक थेरपी :

6) प्ले थेरपी :

आँटिझम हा आजार जडलेल्या मुलांची आपण कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी?

● अशा मुलांना वेगवेगळया अँक्टिव्हीटी करण्यामध्ये मग्न ठेवावे.

● त्यांच्या छंदांना वाव देत त्यांना प्रोत्साहित करायला हवे.त्यांच्या कलागुणांना वाव द्यायला हवा.

● अशा मुलांशी नेहमी प्रेमाने आपुलकीने वागावे.

● सहानुभूति व्यक्त करण्यापेक्षा त्यांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करावा.त्यांना प्रेरित करायला हवे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा