मार्च महिन्यामध्ये तब्बल १३ दिवस बँकेला सुटटी असणार आहे.
म्हणुन पुढील महिन्यात आपापल्या बँकेतील शाखेत कुठल्याही कामाकाजासाठी जाण्याअगोदर आपल्याला पुढील महिन्यात किती दिवस आणि केव्हा बँक बंद राहणार आहे हे जाणुन घेणे फार गरजेचे आहे.
जेणेकरून आपली विनाकारण बँकेत जाऊन कुठलीही फजिती होणार नाही.आपला अमुल्य वेळ वाया जाणार नाही.
रिझर्व बँकेकडुन या सुटटीबाबत एक यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे.ज्यात असे दिले आहे की आरबीआयच्या हाँलिडे कँलेंडर यादीनुसार तेरा दिवस सर्व बँका बंद राहणार आहे.आणि यातील उरलेले दिवस शनिवार रविवारचे आहेत.
संपुर्ण देशात एकाच वेळेला बँक बंद राहणार नसुन अलग अलग राज्यात वेगवेगळया दिवशी सुटी असणार आहे.
चला तर मग जाणुन घेऊया मार्च महिन्यात कुठे आणि कधी बँक बंद राहणार आहे.
Bank holiday list -march 2022 – बँकेच्या सुट्ट्या मार्च 2022
१ मार्च -महाशिवरात्री
(दिल्ली,कोलकत्ता,पटणा,आगरतळा,चेन्नई,पणजी,गुवाहाटी,गंगटोक,आईजोल,शिलाँग इंफाळ येथील बँक सोडुन संपुर्ण भारतातील बँक बंद राहणार आहे.
आणि महाराष्ट,उत्तर प्रदेश,पंजाब,मध्य प्रदेश,राजस्थान,छत्तीसगड,उत्तराखंड,केरळ आणि कर्नाटक इत्यादी ठिकाणी सुटटी असणार आहे.
३ मार्च -लोसार (गंगटोक येथील बंँका बंद राहणार आहे)
४ मार्च -चपचार कुट (आयझाँल येथील बँक बंद राहतील)
५ मार्च -पंजायती राज दिवस (ओडिसा)
६ मार्च -रविवार आहे (देशभरातील बँकेचा सुटटीचा दिवस)
१२ मार्चला देखील आठवडयाचा दुसरा शनिवार असल्या कारणाने सर्व बँक बंद राहणार आहे.
१३ मार्च रोजी रविवारची साप्ताहिक सुटटी असणार आहे.
१७ मार्च -होलिका दहन
(रांची,कानपुर,देहरादुन,लखनौ येथील बँक बंद राहतील)
१८ मार्च – धुलिवंदन
(चेन्नई,बँगलोर,कोलकत्ता,थिरूवंतपुरम,इंफाळ,भुवनेश्वर आणि कोची ह्या ठिकाणी सोडुन अन्य सर्व ठिकाणी बँक बंद राहणार आहे.
१९ मार्च -होली तसेच याओसंग असल्याने पाटणा,इंफाळ,भुवनेश्वर येथील बँका देखील बंद राहणार आहे.
२० मार्च -रविवारची सुटटी असेल
२२ मार्च -बिहार दिवस रोजी पटणा येथील बँका बंद राहतील.
२६ मार्च रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याकारणाने सर्व बंँका बंद राहतील.
२७ मार्च -रविवारची सुटटी