फेस वाँश म्हणजे काय? कोणता वापरवा ? Best face wash information Marathi

फेस वाँश म्हणजे काय?  –  best face wash information Marathi

आज आपण प्रत्येकजण आपला चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी फेस वाँशचा वापर करत असतो.याच्या मागे आपले एकच उददिष्ट असते की आपला चेहरा नेहमी ताजा टवटवीत आणि फ्रेश दिसायला हवा.

फेस वाँश वापरण्याचे आपल्याला अनेक लाभ प्राप्त होत असतात.फेस वाँशने आपला रंग उजळत असतो.आणि त्वचादेखील कोमल बनत असते.म्हणुनच आज बहुतेक जण साबणाने चेहरा धुण्यापेक्षा फेस वाँशने चेहरा धुवणे अधिक पसंद करतात.

कारण साबण हा एक असा रासायनिक पदार्थ आहे ज्याचा अतिवापर केल्याने आपल्या त्वचेला हानी देखील होऊ शकते.तसेच साबणामुळे आपल्या त्वचेद्वारे ज्या नैसगिर्क तेलाची निर्मिती होत असते ते पुसले जात असते.ज्याचे परिणाम स्वरूप आपल्याला एखादा त्वचेचा आजार देखील जडण्याची दाट शक्यता असते.

पण फेस वाँशमुळे आपल्या त्वचेला असा कोणताही आजार जडत नसतो उलट याने आपली त्वचा मुलायम बनते.आपला रंग देखील उजळत असतो.

म्हणुन आजच्या लेखातुन आपण फेस वाँशविषयी सविस्तरपणे माहीती जाणुन घेणार आहोत.

फेस वाँश म्हणजे काय?

फेस वॉश  हे विशेषता आपल्या चेह चेहर्‍यासाठी तयार  केलेले असते . हे त्वचेवर  असलेल्या छिद्रां आत खोल जावून स्वच्छ करते, तसेच त्वचेवर असलेल्या धूळ, काजळी, आलेला  घाम आणि पूर्वी केलेला मेकअप आणि बाकी दुसर्‍या अशुद्धता चेहर्‍या वरुन साफसफाईल मदत कारते .

 फेस वॉश आपली त्वचा रीफ्रेश करते, आपली उजळ करण्यास मदत करते आणि आपली त्वचा सॉफ्ट आणि मुलायम ठेवते.

 आपण नेहमी आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी,आपला चेहरा ताजा फ्रेश आणि टवटवीत दिसावा यासाठी आपल्या दैनंदिन जीवणात रोज वापरत असतो.

  • फेस वाँश मुळे आपल्या चेहरावर बसलेली धुळ साफ होत असते.घामाने माखलेला चेहरा देखील ताजा फ्रेश आणि टवटवीत दिसत असतो.
  • थोडक्यात फेस वाँश हे एक असे प्रोडक्ट आहे जे आपल्या त्वचेच्या आरोग्यात वाढ करत असते.

आपण दिवसातुन किती वेळा आपला चेहरा धुवायला हवा?

 आपण दिवसातुन कमीत कमी दोन वेळातरी आपला चेहरा स्वच्छपणे धुवायला हवाच.दुपारी आणि रात्री बाहेरून आल्यावर कारण दिवसभरातुन आपण ये जा करताना,वाहतुकीतुन उन्हातान्हात गाडीने प्रवास करताना आपल्या चेहरावर धुळ बसत असते.तसेच थकव्याने घाम देखील येत असतो.ज्यामुळे आपला चेहरा काळवट दिसायला लागतो.

म्हणुनच आपण त्वचेवरील सर्व घाण,धुळ,घाम तसेच मळ पुसुन टाकण्यासाठी बाहेरून थकुन दमुन तसेच प्रवास करून आल्यावर फेस वाँशने आपला चेहरा स्वच्छपणे धुवायला हवा.

See also  भारतीय पंतप्रधानांच्या नावांची यादी (1947 ते आजपर्यंत )- Prime Minister Of India List

फेस वाँशचा आपल्या त्वचेवर काय परिणाम होत असतो?

 आज आपल्याला जर आपल्या त्वचेची घाण,सुक्ष्मजंतु,धुळ तसेच मळ यांपासुन रक्षा करायची असेल तर आपल्याला आपला चेहरा नियमितपणे स्वच्छ ठेवणे खुप गरजेचे आहे.

आणि फेस वाँश हे एक असे प्रोडक्ट आहे ज्याने आपण आपला चेहरा धुतला तसेच स्वच्छ केला तर आपली त्वचा खोलवर साफ होत असते.

आणि आपण जर फेस वाँशचा वापर नाही केला तर आपल्याला चेहरासंबंधी अनेक समस्या उदभवू शकतात ज्यात चेहरयावर चटटे येणे,काळे डाग तयार होणे अशा अनेक त्वचेच्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागु शकतो.

फेस वाँश वापरण्याचे कोणकोणते फायदे आपल्याला होत असतात?

 फेस वाँश वापरण्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात.आणि हे फायदे पुढीलप्रमाणे आहेत :

  • फेस वाँश वापरल्याने आपल्या चेहरयावरील घाण,तेल,मलबा,सुक्ष्मजंतु,धुळ इत्यादी निघुन जात असते.
  • फेस वाँशने आपला चेहरा धुवण्याचा अजुन एक फायदा हा आहे की फेसवाँशने आपण जर चेहरयाची मसाज केली तर आपल्या शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत असते.
  • नियमितपणे फेस वाँशने चेहरा धुतल्याने आपली त्वचा गुळगुळीत आणि कोमल राहत असते.
  • फेसवाँशमुळे आपल्या त्वचेमधील ज्या मृतपेशी असतात त्या निघून जातात.ज्याचा फायदा आपल्या त्वचेला होतो आणि आपली त्वचा जास्तीत जास्त आद्रता शोषुन घेण्यास सक्षम होत असते.

आपला चेहरा फेस वाँशने स्वच्छ धुवण्याचा Best Way कोणता आहे ?

 फेस वाँशने आपला चेहरा स्वच्छपणे धुवण्यासाठी आपण सर्वप्रथम आपले हातपाय धुवायला हवेत,मग कोमट पाण्याचा वापर करून आपली त्वचा थोडीफार ओली करून घ्यावी.मग आपल्या बोटाच्या टोकाने अलगदपणे फेसवाँश आपल्या चेहरयावर लावावा.

आणि मग कोमट पाण्याचा वापर करून लावलेला फेस वाँश स्वच्छपणे धुवून टाकावा.

सर्वोत्तम 10 फेस वाँशची कोणती आहे ?Best 10 face wash

आतापर्यत आपण फेसवाँशच वापरण्याचा उत्तम मार्ग,फेश वाँश वापरण्याचे फायदे,फेस वाँशचा आपल्या चेहरयावर होणारे परिणाम तसेच किती वेळा फेस वाँशने आपण चेहरा साफ करावा हे जाणून घेतले.

आज स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकालाच आज आपला चेहरा स्वच्छ धुवण्यासाठी फेस वाँशची आवश्यकता असते.

म्हणुन आपण जगातील टाँप 10 फेसवाँशची नावे आणि त्यांची वैशिष्टये जाणुन घेणार आहोत.जी आपण आपल्या दैनंदिन जीवणात चेहरा साफ करण्यासाठी वापर शकतो.

See also  मानवी शरीराचे अवयव - Human Body Parts In Marathi

 

सर्वोत्तम 10 फेसवाँशची नावे आणि त्यांची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत:

 

1)Himalaya Herbal Purified Nem Face Wash

2) Nivea Total Face Clean Up

3) Aroma Magic Face Wash With Neem,Tea Tree

4) Jovees Papaya Fash Wash

5) Cetaphil Gents Cean Cleanser

6) Liquid Neutrogena Pure Pure Mild Facial Cleanzer

7) Bio Tique Bio Hunny Gel Refreshing Foam Face Wash

8) Mamerth Ubtaan Face Wash With Turmeric Suffron

9) Wow Skin Science Apple Cider Vinegar Foaming Face Wash

10) Olay White Radiance Whitening Brightning Foaming Cleanzer

 

1)Himalaya Herbal Purified Neem Face Wash :

 हिमालय हर्बल ही एक अशा कंपन्यांमधील एक कंपनी म्हणुन ओळखली जाते.जिने हर्बल ब्युटी प्रोड्क्टसला जगभर प्रसिदध आणि लोकप्रिय केले होते.

जे व्यक्ती मुरूम आणि मुरूमामुळे चेहरयावर तयार होत असलेल्या डागामुळे ग्रासलेले आहेत त्यांनी हे फेस वाँश वापरणे अधिक उत्तम ठरेल.

2) Nivea Total Face Clean Up :

निविया टोटल फेस क्लीन अप हे फेस वाँश लावल्याने आपल्या चेहरयावरील काळे डाग कमी होतात.

निविया टोटल फेस क्लीन अप हे आपण एखाद्या फेसपँक प्रमाणे देखील वापरू शकतो.एवढेच नाही तर फेस स्क्रब तसेच फेस वा़ँश म्हणून त्वचेवरील सुक्ष्म जंतु काढण्यासाठी तसेच त्वचेवरील ब्लँकहेडस काढुन छिद्रे बंद करण्यासाठी देखील वापरू शकतो.

सगळयात महत्वाचे म्हणजे याने आपल्या त्वचेला कोणतीही इजा देखील पोहचत नसते.शिवाय आपल्याला याचा वापर करणे परवडते देखील.

3) Aroma Magic Face Wash With Neem,Tea Tree :

ज्यांची त्वचा तेलकट आहे अशा व्यक्तींनी हे फेस वाँश वापरायला हवे.हा फेसवाँश वापरण्याचे अनेक फायदे आहेत.

ह्या फेसवाँशचा कोणताही वास येत नसतो.ह्या फेसवाँशला कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशल कलर असलेला देखील आपल्याला दिसुन येत नाही.

आणि हा फेस वाँश एका रिझनेबल किंमतीत आपल्याला बाजारात उपलब्ध होतो.

4) Jovees Papaya face Wash :

जोविस पपया फेस वाँश आपल्या त्वचेवरील मृत पेशी तसेच कोरडे डाग काढुन टाकण्यास मदत करत असते.

यामध्ये पपईच्या फळातील एंजाईम असतात जे आपल्या चेहरयावरील काळे डाग,बारीक सुरकुत्या,मुरूम कमी करत असतात.

यामध्ये द्राक्षाच्या पानांचा अर्क देखील असतो जो आपली त्वचा स्वच्छ करण्याचे काम करतो.

See also  महात्मा फुले जयंतीच्या शुभेच्छा, संदेश - Mahatma Phule Jayanti Wishes Marathi, Quotes, Pictures

5) Cataphyll Gents Clean Cleanser :

सेटाफिल जेन्टस क्लीन क्लेंझर हे एक असे फेस वाँश आहे ज्याची शिफारस अनेक तज्ञांकडुन केली जाताना आपणास दिसुन येते.

जे लोक दिवसभरात जास्तीत जास्त प्रवास करतात त्या लोकांनी सेटाफिलचे जेन्टस क्लीन क्लेंझर वापरायला हवे कारण याने आपल्या त्वचेवरील सर्व साचलेली घाण,मळ,निघुन जातात.

आणि हे हायपो अँलर्जिक देखील आहे म्हणजेच याने त्वचेला अधिक प्रमाणात अँलर्जी देखील होत नसते.आणि याचा कोणताही वास आपल्याला येत नाही.

6) Liquid Neutrogena Pure Mild Facial Cleaner :

लिक्विड न्युट्रोजिना प्युअर माईल्ड फेशल क्लींझर हे एक असे फेस वाँश आहे ज्याने आपली त्वचा रोज स्वच्छ आणि निरोगी राहते.

याने आपल्या त्वचेवर कुठल्याही प्रकारचे छिद्र राहत नाही आपली त्वचा स्वच्छ राहते.

7) Bio Tique Bio Hunny Gel Refreshing Foam Face Wash :

बायो टिक बायो हनी जेल माँश्चराईज असलेले फोमी जेल मेक अप काढुन टाकत असते आणि आपल्या त्वचेला देखील मऊ करण्याचे काम करते.ज्यामुळे आपली त्वचा स्वच्छ आणि उजळदार अशी दिसत असते.

 

8) Mamerth Ubtaan Face Wash With Turmeric Saffron :

मामेरथ उबटान फेस वाँश हे आपल्याला असा दावा करताना दिसुन येते की उन्हाळयात आपल्या चेहरयाला जी हानी पोहचत असते ती देखील मामेरथ उबटाण फेस वाँश भरून काढते.

मामेरथ उबटान फेस वाँश वापरल्याने आपल्याला चमकदार त्वचा प्राप्त होत असते.कारण यातील हळद आपल्या चेहरयाला उजळुन टाकत असते.आणि गाजर हे चेहरयावरील टँन काढुन टाकत असते.

9) Wow Skin Science Apple Cider Vinegar Foaming Face Wash :

वाँव स्कीन अँपल सायडर व्हीनेगार हे एक असे फेस वाँश आहे ज्याची निर्मिती सिलिकाँन फेस ब्रशद्वारे एर्गोनाँमिक पदधतीने करण्यात आली आहे.

जे आपल्या चेहरयावरील छिद्र झाकून टाकते तसेच आपली स्वच्छ ठेवण्याचे काम करते.

ह्यात व्हिटँमिन बी आणि व्हिटँमिन ई समाविष्ट असते आपल्या त्वचेला तरूण आणि निरोगी ठेवण्याचे काम करते.

10) Olay White Radiance Whitening Brightening Foaming Cleanser :

ओले व्हाईट रँडियन्स व्हाईटनिंग ब्राईटनिंग फोमिंग क्लींजर हे आपल्या त्वचेला नैसगिर्क रीत्या चमकवण्याचे तसेच उजळवण्याचे काम करते.

हे फेस वाँश आपण रोज दैनंदिन जीवणात वापरावे असे आहे.तसेच आपण प्रवासात देखील वापरू शकतो.