दैनंदिन जीवनात मोबाइलचा वापर करताना ह्या गोष्टी आपण नक्की करायलाच हव्यात – Best Tips For Mobile Users In Marathi
मित्रांनो जेव्हा आपण एखादा नवीन मोबाइल विकत घेत असतो तेव्हा तसेच आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर करत असताना कधीही काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण नक्की करायला हव्यात.
● मित्रांनो जेव्हा आपण नवीन मोबाइल विकत घेत असतो.तेव्हा आपण जो मोबाईल विकत घेतला आहे त्या मोबाईलच्या खोक्यावर आय एम ई आय नंबर तसेच त्याची वाँरंटी डिटेल स्टीकरमध्ये दिलेली असती त्याचा आपल्या मोबाइल मध्ये एक फोटो आवर्जून काढुन ठेवायला हवा.
● कारण मोबाइल विकत घेतल्यानंतर त्याचा बाँक्स आपण घरातच कुठेतरी कानाकोपरयात ठेवून देतो अणि नंतर आवश्यकता पडल्यास शोधल्यावर तो आपणास लगेच सापडत देखील नसतो.
● सिम कार्ड टुल हे आपण जवळ ठेवायलाच हवे.किंवा ते व्यवस्थित एखाद्या किचन वगैरेला लावुन ठेवायला हवे.कारण जेव्हा आपल्याला काही कारणास्तव मोबाइलचे सिमकार्ड बाहेर काढायची वेळ येते आपण टाचन पिन वगैरेचा वापर सिम कार्ड काढायला करत असतो.ज्याने आपला मोबाइल डँमेज होण्याची दाट शक्यता असते.
● याचसोबत आपण आपल्या मोबाइल वरील लाँक स्क्रीन वर एमरजन्सी काँन्टँक्ट नंबर अणि नाव टाकुन ठेवायला हवे.म्हणजे आपला मोबाइल अकस्मातरीत्या हरवला अणि तो कोणा चांगल्या प्रामाणिक व्यक्तीला सापडला तर तो एमरजन्सी काँन्टँक्ट मधील नंबर वर संपर्क साधून आपल्याशी काँन्टँक्ट करेल अणि आपला मोबाइल आपल्याला परत मिळु शकेल.
● जेव्हा आपला मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तेव्हा आपण आय एम ई आय नंबरच्या आधारावर लगेच जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल करायला हवी.कारण आपल्या चोरीला गेलेल्या मोबाइल वरून काही गुन्हेगारी प्रवृत्ती घडली तर आपण अडचणीत येऊ शकतो कारण ते सिमकार्ड आपल्या नावावर रेजिस्टर असते म्हणुन आपण मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर त्याची एफ आय आर दाखल करायलाच हवी.
● आपण आपल्या मोबाइल मध्ये नेहमी फाईंड माय डिव्हाइस हे आँप्शन अँक्टीव्हेट करून ठेवायला हवे म्हणजे समजा आपला मोबाइल हरवला तर आपण आपल्या जीमेल अकाऊंटवर इतर कुठल्याही डेस्कटाँपवरून लाँग इन करून आपण आपल्या मोबाइलची लोकेशन बघु शकतो.
● तसेच मोबाईल हरवल्यावर तसेच चोरीला गेल्यावर आपण आपले मोबाइल मधील सेव्ह असलेले बँकेचे अकाऊंट पासवर्ड त्वरीत बदलायला हवे.कारण मोबाइल मध्ये आपली बँकेची महत्वाची अकाऊंट डिटेल असते.जिचा वापर करून कोणीही आपल्या अकाऊंटला रिकामे करू शकते.
● याचसोबत मोबाइल हरवल्यावर किंवा चोरीला गेल्यावर आपण टेलिकाँम कंपनीत फोन करून आपल्या सिमकार्डला देखील लगेच ब्लाँक करायला हवे.याने आपल्या मोबाइल नंबरचा कोणी गैरवापर करू शकणार नाही.
● सगळयात महत्वाचे म्हणजे आपण आपल्या मोबाइल वर अंक तसेच शब्दांचा एखाद्याच्या नावाचा पासवर्ड न ठेवता फेस लाँक किंवा फिंगर प्रिंट पासवर्ड ठेवायला हवा.कारण अंक अणि शब्दांचा पासवर्ड कोणीही अंदाज लावून गेस करून इंटर करू शकते.पण फेसलाँक अणि फिंगरप्रिंट आपले स्वताचे युनिक असते जिथे कोणीही आपला स्वताचा चेहरा दाखवून बोटाचे ठसे देऊन यात इंटर करू शकत नही.
आशा बाळगतो मित्रांनो आपल्याला आमच्या दिलेल्या ह्या काही महत्वपूर्ण टिप्सचा आपल्या दैनंदिन जीवणात मोबाइलचा वापर करताना नक्कीच फायदा होईल.