पुस्तक परीक्षण – ईकिगाई – Book Review of Ikigai in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

पुस्तक परिचय – ईकिगाई – Book Review of Ikigai in Marathi

जपान देशाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि तुम्हाला हे देखील माहीत असेल की,जपान मधली माणसे बाकीच्या देशाच्या मानाने जास्त काळ जगतात.एवढंच नव्हे तर जपानी लोक आनंदी देखील असतात.काही रिसर्च मध्ये असे आढळून आले की जपानी लोक इकिगाई फॉर्म्युला नुसार आपला पॅशन निवडतात आणि त्याचा पाठलाग करतात व यशस्वी होतात.इकिगाई हा जपानी शब्द आहे ज्याचा मराठी अर्थ ‛कोणत्या गोष्टीसाठी आपण जन्म घेतला याचा शोध लावणे’हा आहे.

  • जपान मध्ये ओकिनावा नावाचे बेट आहे.जिथे साधारण प्रत्येक व्यक्ती 100 च्या पुढे जगतो.
  • त्या बेटावरील 70,80 वयाची व्यक्ती देखील सकाळी उठल्यावर उत्साहाने काम करते.
  • ओकिनावा बेटावरील लोक इकिगाई फॉर्म्युला चा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करतात आणि त्या फॉर्म्युला नुसार आपल्याला कोणती गोष्ट करायला आवडते याचा शोध घेतात.

आयुष्याचा अर्थ

Book Review of Ikigai in Marathi
जगभरातील लाखो लोकांनी गौरविलेले बेस्ट अर्थपूर्ण पुस्तक .जपानी लोकांचा असा समज असतो की, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच.

 

  • जपानी लोकांच्या मते प्रत्येक व्यक्ती कोणतीतरी मोठी गोष्ट करण्यासाठी जन्माला आली असते.
  • ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद आहे ती गोष्ट करण्यामध्ये मज्जा येते.पण आपण जिथे पैसे जास्त मिळते ती गोष्ट करायला बघतो.
  • काही लोकांना तर हे देखील कळत नाही की;आपल्याला कोणती गोष्ट करताना आनंद वाटतो ??
  • त्यांचे निम्मे वय संपले तरी त्यांना ह्या प्रश्नाचे समाधान सापडत नाही.

तुम्हाला अजूनही ह्या प्रश्नाचे उत्तर सापडले नसेल तर इकिगाई पुस्तक तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर शोधायला मदत करेल आणि इकिगाई पुस्तकात दिलेल्या फॉर्म्युला तुम्ही जर दैनंदिन जीवनात वापरला तर तुम्ही तुमचे पुढचे जीवन आंनदी जगू शकता.आपण या लेखामध्ये इकिगाई पुस्तकाचा review पाहणार आहोत.

See also  ईस्टर डे निमित्त WhatsApp Status, images, Facebook Messages | Happy Easter Day 2023 Wishes In Marathi

आपण जेव्हा आपले शिक्षण पूर्ण करतो आणि जॉब शोधतो तेव्हा;आपल्या पूढे सर्वात मोठा प्रश्न हा असतो की,आपल्याला पुढे काय करायचे आहे ? काही लोक तुम्हाला म्हणतील ,ज्या गोष्टीत तुम्हाला आवड आहे ती गोष्ट करा ,

काही लोक म्हणतील,जी गोष्ट तुम्हाला चांगली जमते ते काम करा,काही लोक म्हणतील,ज्या कामामध्ये पैसे जास्त मिळतात, ते काम करा,तर काही लोक म्हणतील,पृथ्वीला किंवा जगणाऱ्या जिवांना ज्या कामाची गरज आहे ते काम करा.

इकिगाई फॉर्म्युला नुसार वरील पर्यायामध्ये एका पर्यायाला निवडणे चुकीचे आहे;कारण आपल्याला आनंदी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी वरील चारी  गोष्टी असणारे काम करायला हवे.

चार वर्तुळ

तुम्हाला हा मुद्दा पटकन समजावा म्हणून  इकिगाई पुस्तकामध्ये हा मुद्दा चार वर्तुळाद्वारे समजवला आहे.

  • पहिल्या वर्तुळात तुम्हाला कोणती गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो,
  • दुसऱ्या वर्तुळामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही पटाईत आहात,
  • तिसऱ्या वर्तुळामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये जास्त पैसा आहे आणि
  • चोथ्या म्हणजे शेवटच्या वर्तुळात कोणत्या गोष्टींची गरज मानवाला पडते.

चारी वर्तुळात सामायिक असे जर एखादे काम असेल तर तो तुमचा इकिगाई झाला.

इकिगाई चे उदाहरण:

  • तुम्हाला ब्लॉगिंग करायला आवडते आणि
  • ब्लॉगिंग करण्यामध्ये तुम्ही पटाईत आहात.
  • ब्लॉगिंग ची बाकीच्या लोकांना देखील गरज आहे आणि
  • ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला पैसे देखील मिळतो.

या उदाहरणावरून ब्लॉगिंग तुमचा इकिगाई झाला.असे तुम्ही काम शोधले पाहिजे ज्यात चारी वर्तुळातील कामे होत असतील.ते काम तुमचा इकिगाई असेल आणि एकदा का तुम्हाला तुमचा इकिगाई समजला तर तुम्हाला कधीही स्ट्रेस येणार नाही.

पुस्तक परीक्षण – अवेकन द जायांट विदिन –

आपण अजून एक उदाहरण पाहू:

  • सचिन तेंडुलकर ला क्रिकेट खेळण्यात आंनद वाटतो आणि
  • तो क्रिकेट खेण्यामध्ये माहिर देखील आहे.त्याला
  • क्रिकेट मधून पैसे मिळतात आणि
  • उत्तम खेळाचा आनंद प्रेक्षक ही घेतात

इकिगाई फॉर्म्युला नुसार क्रिकेट हा सचिनचा इकिगाई झाला.प्रत्येक यशस्वी व्यक्तींनी आपला इकिगाई शोधलेला असतो.

See also  80 Daily Use of English Sentences in Conversations with family and friends Neighbors

तुम्ही जर इकिगाई नियमानुसार जीवन जगायला सुरवात कराल तेव्हा तुम्हाला कोणतेही व्यसन डिस्ट्रक्ट करणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामामध्ये मग्न व्हाल.

तुम्हाला तुमचा ईकगाई लगेच नाही मिळणार पण तुम्ही जर तो शोधायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तो नक्की मिळेल.इकिगाई शोधताना तुम्हाला इकिगाई पुस्तक खूप मदत करेल;जे की ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती उपलब्ध आहे.

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा