बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू – Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू – Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये एक नवीन भरती केली जात असल्याचे नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
या भरतीविषयी जाहीरात देखील प्रकाशित करण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांची या भरतीदरम्यान अंतिम निवड केली जाईल त्यांना मुंबई महाराष्ट्र येथे नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

सदर भरतीसाठी उमेदवारांना कुठलीही परीक्षा फी भरावी लागणार नाहीये.

भरती केल्या जात असलेल्या पदांचे नाव –

१)कर्णं चिकीत्सक-

२) वाक उपचार तज्ञ –

शैक्षणिक पात्रतेची अट –

सदर पदांसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून आॅडिओलाॅजी अणि स्पीच थेरपी ही पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

उमेदवाराकडे वाक श्रवण उपचार तसेच कर्णबधिर क्लिनिक मध्ये काम करण्याचा किमान एक वर्ष इतका अनुभव असणे आवश्यक आहे.

उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा तत्सम तसेच उच्चतम परीक्षेमध्ये किमान ५० टक्के गुण इतकी मराठी प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराने डिओएएससी सोसायटीचे सीसीसी किंवा ओ स्तर बी स्तर ए स्तर प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे तसेच त्याने महाराष्ट्र राज्य उच्च अणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आयटी किंवा जीईसीटीचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सुट देण्यासाठी उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी किंवा वापराबाबत मान्यताप्राप्त अभ्यासक्रम पूर्ण केला असावा.

नियुक्ती दरम्यान उमेदवाराकडे हे सर्टिफिकेट नसेल तर त्याने शासनाने विहित केलेली एम एस सी आयटी परीक्षा नेमणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत पास करणे आवश्यक आहे.अन्यथा त्या उमेदवाराची सेवा समाप्त केली जाऊ शकते.

See also  आयकर विभागामध्ये दहावी तसेच पदवी उत्तीर्ण ७१ उमेदवारांची भरती सुरू INCOME TAX RECRUITMENT 2023 IN MARATHI

वयोमर्यादा अट-

आधीपासून महानगरपालिकेच्या सेवेत नसल्यास उमेदवाराचे वय ३८ पेक्षा अधिक असु नये.

मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत ४३ पेक्षा अधिक असता कामा नये.

वेतन –

ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना ३५४०० ते ११२४००+ इतर अनुज्ञेय भत्ते देखील दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत –

जे उमेदवार इच्छुक अणि पात्र आहेत त्यांनी खालील दिलेल्या पत्यावर सदर भरतीसाठी आपापले अर्ज आॅफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.

अर्ज पाठवायचे ठिकाण –

प्रमुख वैद्यकीय अधिकारी सेठ एजेबी महानगरपालिका कान नाक घसा रूग्णालय महर्षी दधिची मार्ग फोर्ट मुंबई -४००००१

अर्ज करण्याची सुरूवात –

सदर भरतीसाठी अर्ज करायला १७/२/२०२३ पासुन सुरूवात झाली आहे.

भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व पात्र अणि इच्छुक उमेदवारांनी सदर भरतीसाठी १५ मार्च २०२३ च्या आत आपला अर्ज सादर करायचा आहे.

आॅफिशिअल वेबसाईट –

Https://Portal.Mcgm.Gov.In/Irj/Portal/Anonymous?Navigation%20Target=Navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

उमेदवाराने प्रमाणपत्र पडताळणी साठी उपस्थित राहायचे ठिकाण –

प्रमुख वैद्यकीय अधिकारी सेठ एजेबी महानगरपालिका कान नाक घसा रूग्णालय ७ महर्षी दधिची मार्ग फोर्ट मुंबई ४००००१

तारीख व वेळ –

५/४/२०२३ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत.

निवडीचे निकष –

मान्यताप्राप्त विद्यापीठाची आॅडिओलाॅजी तसेच स्पीच थेरपी पदवी -१० गुण

वाक उपचार तसेच कर्णबधिर क्लिनिक मध्ये काम करण्याचा किमान एक वर्ष अनुभव -१० गुण

एकुण गुण -२०

जर उमेदवारांना आॅडिआॅलाॅजी अणि स्पीच थेरपी अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षेत १००० पैकी ८०० गुण असतील तर तर त्यास दहापैकी आठ गुण दिले जाणार.

एक वर्षाच्या किमान अनुभवाकरीता गुण दिले जाणार नाही पण पुढील प्रत्येक वर्षासाठी दोन गुण जास्तीत जास्त दहा गुण दिले जाणार.