बुदध पौर्णिमा का साजरी केली जाते हया दिवसाचे महत्व काय आहे? Buddha Purnima 2023
बुदध पौर्णिमा हा बौदध धर्मातील लोकांचा अत्यंत महत्त्वाचा सण तसेच उत्सव आहे.
बुदध पौर्णिमा यास बौदध जयंती असे देखील म्हटले जाते.हा सण तसेच उत्सव भारत देशात तसेच परदेशात देखील वैशाख पौर्णिमेला साजरा करण्यात येत असतो.
बौदध धर्मातील लोकांसाठी हा दिवस खुप महत्वाचा मानला जातो कारण ह्याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता.
याचसोबत गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त होणे त्यांचे महापरिनिर्वाण होणे ह्या घटना हयाच दिवशी घडल्या होत्या म्हणून हा दिवस खुप महत्वाचा मानला जातो.
गौतम बुद्ध यांनी त्यांच्या मानवतावादी अणि विज्ञानवादी धम्म सिदधांतातुन जगाला अनेक महत्वाच्या शिकवणी संदेश दिले ह्यामुळेच गौतम बुद्ध यांना महापुरुष तसेच गुरूची उपाधी दिली जाते.
बौदध धर्मातील लोकांची संख्या असलेल्या अनेक देशात हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जात असतो.
ज्यात आपल्या भारत देशासोबत चीन, जपान, थायलंड, सिंगापूर, म्यानमार,श्रीलंका, सिंगापूर,व्हिएतनाम,मलेशिया कंबोडिया अमेरिका नेपाळ इंडोनेशिया इत्यादी देशांत हा सण साजरा केला जातो.
असे सांगितले जाते की १८० देशांतील बौदध लोक हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करतात.अनेक देशांमध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात येते भारत देशात देखील ह्या दिवशी सार्वजनिक सुट्टी पाळली जात असते.
जागतिक पासवर्ड दिवस २०२३: इतिहास, महत्व, थीम
बुदध पौर्णिमेच्या दिवसाचे महत्त्व –
वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्ध यांचा जन्म झाला होता.म्हणुन या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते.
जगातील दुख नाहीसे करण्यासाठी दुखाचे कारण जाणुन घेण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब केला.या कार्यात भगवान बुद्ध यांनी आपले घराचा त्याग करत अनेक वर्षे ध्यान तपश्चर्या केली.
अणि शेवटी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती.दुखाचे कारण काय आहे दुख दुर करण्याचा मार्ग कोणता आहे हे देखील सापडले होते.
याचदिवशी गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण देखील झाले होते.म्हणून वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी बुदध पौर्णिमा साजरी केली जाते.म्हणुन ह्या दिवसाला बौदध धर्मात विशेष महत्व देण्यात आले आहे.
हिंदु धर्मात देखील गौतम बुद्ध यांना विशेष महत्व प्राप्त होते.पौराणिक कथेत सांगितल्या नुसार वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू यांच्याशी संबंधित आहे.अणि भागवत पुराणात असे सांगितले गेले आहे की गौतम बुद्ध हे भगवान विष्णू यांचा नववा अवतार होते.
वैशाख पौर्णिमेला सत्यविनायक पौर्णिमा देखील म्हटले जाते.भगवान विष्णु यांनी सुदामाला त्याचे दुख दारिद्र्य दूर करण्यासाठी सत्य विनायकाचा उपवास करावयास सांगितले होते.
बुदध पौर्णिमेच्या दिवशी धर्मराजा चेही पूजन करण्यात येते असे केल्याने आपणास अकाली मृत्यू येत नसतो असे सांगितले जाते.
गौतम बुद्ध यांना चार सत्यांचा साक्षात्कार झाला होता.
पहिले सत्य म्हणजे आज जगात सगळीकडे भांडण तंटा वादविवाद कलह सुरू आहेत.म्हणजे सगळीकडे दुःख पसरलेले आहे हे प्रथम सत्य त्यांना लक्षात आले.
ह्या सर्व दुःखाचे कारण लोभ तृष्णा आहे हे देखील दुसरे सत्य त्यांच्या लक्षात आले.जेव्हा दोन व्यक्तींच्या मना मध्ये एकच वस्तू प्राप्त करण्यासाठी तृष्णा निर्माण होते तेव्हा त्यांच्यात वादविवाद भांडणे कलह होतात हे देखील बुदधांना कळले.
तिसरे सत्य म्हणजे ह्या सर्व दुखांना समुळ नष्ट करण्यासाठी ह्या दुखाचे कारण नष्ट करणे महत्वाचे आहे हे देखील सत्य बुदधांना कळले.
बौदध पौर्णिमा कशी साजरी करण्यात येते?
बौदध पौर्णिमेच्या दिवशी जगभरातील सर्व बौदध बांधव बौदधगया येथे एकत्र जमत असतात.सर्व मिळुन प्रार्थना वगैरे करतात.बौदध धर्मातील ग्रंथ वाचतात.या दिवशी गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित विविध स्थळांना भेट दिली जाते.
पहिली सार्वजनिक बौदध जयंती ही २ मे १९५० रोजी भारत देशात दिल्ली शहरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली होती.
२७ मे १९५३ रोजी बुदध पौर्णिमा हा दिवस सार्वजनिक सुटटीचा दिवस म्हणून शासनाने जाहीर केला होता.
भगवान बुद्ध यांचा जन्म नेपाळ येथील लुंबिनी येथे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला होता.भगवान बुदध यांचा जन्म इसवी सन पूर्व ५६३ मध्ये झाला होता.
भगवान बुद्ध यांचा जन्म एका राजघराण्यात झाला असल्याने त्यांना दुख म्हणजे काय हे माहीत देखील नव्हते.पण राज्यात एकेदिवशी फेरफटका मारत असताना त्यांना सर्वप्रथम दुखाचा अनुभव आला.यानंतरच त्यांनी संसाराचा त्याग केला होता.